You are currently viewing आहारातील फळांचे महत्त्व | The Importance of Fruits in a Healthy Diet Plan 
Importance of fruits in diet plan 

आहारातील फळांचे महत्त्व | The Importance of Fruits in a Healthy Diet Plan 

आहारातील फळांचे महत्त्व | The Importance of Fruits in a Healthy Diet Plan  

माणसाला ज्ञात असलेल्या अन्नातील सर्वांत जुना प्रकार म्हणजे फळे होत. ऍडमने प्रथम स्वर्गातील सफरचंद खाल्ल्यची कथा बायबलमुळे अनेकांना माहीत आहे. प्राचीन साहित्यात फळांचे फळांचे अनेक संदर्भ आहेत. वेदांतही फळे हा देवांच्या अन्नाचा मूळ आधार असल्याचे उल्लेख आहेत. कुराणात द्राक्षे, खजूर, अंजीर, ऑलिव्ह, व डाळिंब हि देवाने दिलेली फळे असून, देवाकडून ती माणसाला देणगी मिळाल्याचे वर्णन आहे. प्राचीन काली लोक फळांत दैवी या जादूचे गुणधर्म असल्याचे मानीत. ते फळांना पवित्र मानून देवदेवतांना अर्पण करीत. देवळे, घरे, वस्त्रे, व काही खास भांडी यावर फळांची नक्षी काढीत. फळांनी या वासू सुशोभित करीत. 

ताजी फळे व सुका मेवा हे माणसाचे नैसर्गिक पौष्टिक पूर्णान्न आहे. फळे सहज पचतात, रक्त सहज शुद्ध करतात व पचनमार्ग स्वच्छ ठेवतात. आहारात फळांचे महत्त्व फार आहे. मानवी शरीरयंत्रणेला फलाहाराने फायदाच होतो. फळांचे मुख्य कार्य याप्रमाणे असते: 

फळे किंवा फळांचा रस घेणे हि शरीराची आद्रता कायम ठेवण्याचा योग्य उपाय आहे. या प्रकारे शरीराने सेवन केलेल्या द्रव पदार्थाद्वारे शरीराला ऊर्जेसाठी आवश्यक असणारी साखर व खनिजे यांचाही पुरवठा होतो. 

आहारातील फळांचे महत्त्व | The Importance of Fruits in a Healthy Diet Plan 

शरीरांतर्गत स्वच्छतेसाठी: 

वैद्यकीय संशोधन असे सांगते की, फळातील पोटेशियम, मॅग्नेशिअम, सोडियम, यामुळे मूत्रविसर्जनाची प्रवृत्ती वाढते. कारण शरीरात फळांच्या रसांनी पाणी वाढते. त्यामुळे अंतर्गत अवयव, आतडी व पचनमार्ग स्वच्छ होतात. मूत्रचित्यामुळेच क्षारहिन अन्न घेण्यास सांगितल्यावर फळे खाणे हा उत्तम आहार ठरतो. 

खनिजांचा परिणाम: 

फळे शरीराला अनेक खनिजे पुरवतात. जर्दाळू, मनुका, खजूर, यांसारखी सुकी फळे कॅल्शिअम व लोह यांनी स्मुर्द्ध असतात. हि खनिजे हाडे मजबूत करण्यासाठी व चांगल्या रक्तासाठी आवश्यक असतात. तुम्हांला माहित आहे का? पेर किंवा सीताफळ यांतून प्रत्येकी ८०० मिलिग्रॅम इतके कॅल्शिअम मिळू शकते. 

सारक परिणाम: 

फळातील तंतुमय भाग म्हणजे cellulose पचनसंस्थेतून अन्नाचा सहज प्रवास करण्यास व टाकाऊ पदार्थ एकत्र करून मलाशयात नेण्यास उपयुक्त ठरतो. त्यातीळ साखर व फलजन्य आम्ले हीही सारक परिणाम म्हणून काम करता. म्हणून नित्य फळ खाल्याने मलावरोध होत नाही, व असल्यास तो बारा होतो. 

पोषक परिणाम: 

फळांतून निश्चितच जीवनसत्त्वे मिळत असल्याने ती शरीरास पौष्टिक ठरतात. पेरू, सीताफळ व इतर आम्लधर्मी म्हणजे लिंबू, संत्रे, यांसारखी फळे म्हणजे ” Vitamin C ” व्हिटॅमिन क जीवनसत्त्वाचा साठाच होत. हि फळ बहुधा पिकलेली, जशीच्या तशीच ताजी खावीत, त्यामुळे आपल्या शरीराला पूर्ण जीवनसत्त्वे मिळतात. 

अनेक फळांत ” Vitamin A”  अ जीवनसत्त्वे परिपूर्ण असणारे Karetin कॅरेटिन असते. जेवणापेक्षा दुधाबरोबर फळे घेणे चांगले. एकावेळी एकाच प्रकारचे फळ शक्यतो खावे. 

फलोपचार: 

शरीरातील आम्ल व अल्कली यांचा समतोल साधण्याचे काम फळे करतात. उपवास हा आजरा नाहीसा करण्याचा जुन्यात जुना असा अतिशय परिणामकारक नैसर्गिक उपाय आहे. उपवास करण्याचा उत्तम व सुरक्षित प्रकार म्हणजे फक्त फळ रसावर राहणे. याची प्रक्रिया म्हणजे संत्रे किंवा द्राक्षे, मोसंबी, अननस यांसारख्या फळांचा रस व पाणी निम्मेनिम घेऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे मिश्रण थोड्या थोड्या प्रमाणात दार दोन तासांनी पिणे. शरीरप्रक्रिया नियमित राहण्यासाठी ताज्या फळांतील जीवनसत्त्वे, खनिजे व Enzymes फार फायदेशीर ठरतात. 

महत्त्वपूर्ण टीप:फलाहारासोबत अन्न घेऊ नये. द्रव पदार्थात फक्त पाणी व लिंबू पाणी साखर न घालता घेतल्यास चालते. 

आहारातील फळांचे महत्त्व | The Importance of Fruits in a Healthy Diet Plan 

फळांमधील औषधी गुणधर्म: 

काही फळे काही आजारांवर औषधांचे काम करतात. फळशर्करा, कॅल्शिअम, लोह, Vitamin A, B Complex व Vitamin C जीवनसत्त्व यांचा हृदयाच्या उर्जेवर काही प्रमाणात परिणाम होतो. म्हणून सफरचंद, संत्र, लिंबू, व डाळिंब यांच्यामुळे ह्रिदयाभिसरण क्रिया नीट चालून ते वार्धक्यापर्यंतहि कार्यक्षम राहते. 

आंबा, सफरचंद, खजूर, या फळांचा आपल्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवरच सरळ परिणाम होतो. बोरांच्या जातीची फळे लोह, फॉस्फरस आणि क्षार यांनी परिपूर्ण असतात. आणि म्हणून रक्त तयार करण्यास आणि मज्जातंतू  बळकट करण्यास मदत करतात. कलिंगडाच्या रसाने मूत्रपिंड स्वच्छह ठेवण्याच्या कमी येतात. अननस आणि डाळिंब थंडावा आणि शांती देतात.  म्हणून उच्च रक्तदाब, अतिज्वर आणि नाकाचे व श्वसनलिकेचे आजार यांवर ती उपयोगी ठरतात. 

आहारात फळांचा सढळ वापर केल्याने मनाला निरोगी आयुष्य जगता येते. फळे रोगप्रतिकारक आहेत. ती आपल्याला तल्लख, उत्साही आणि कार्यक्षम ठेवून आयुष्यभर शर्थ देतात. म्हणूनच आपल्या आहारात फळांचा समावेश हा हवाच. 

Also Read: सकाळी लवकर उठण्याचे फायदे | Sakali lavkar uthnyache phayde – मराठी BlogWali (marathiblogwali.in)

Also Read: Fruit Diet: Benefits, Risks, and More (healthline.com)

Miraculous Benefits of Eating Fruits

This Post Has 2 Comments

Leave a Reply