You are currently viewing स्वराज्यरक्षक संभाजी Swarajya Rakshak Sambhaji Title Song Lyrics | Zee Marathi
Swarajya Rakshak Sambhaji Title Song Lyrics

स्वराज्यरक्षक संभाजी Swarajya Rakshak Sambhaji Title Song Lyrics | Zee Marathi

स्वराज्यरक्षक संभाजी शिर्षक गीत Swarajya Rakshak Sambhaji Title Song Lyrics | Zee Marathi

श्री शंभोः शिवजातस्य,मुद्रा द्यौरिव राजते | 

यदंकसे विन लेखा, वर्तते कस्य नोपरि || 

प्रसाद होऊनी, भवानी आईचा पुरंदरी

जणू प्रचंड दुर्ग जन्मला, 

दऱ्या, नभामधून, सप्त सागरामधून

घोष शंभू शंभू येऊ लागला. 

कणखर तरी हळवा, शिवबासमान भासतो,

मायभूमी ध्यास, श्वास भगव्यासी मानतो

धर्मशील शौर्यपती, आसनास छत्रपती

केसरी अतुल्य शोभतो

छावा शिवबाचा छावा || क्र || 

धर्मरक्षणा ज्वलंत, अतिमहाबली शौर्यवंत

श्वेतमानी मनमहंत, रुद्र सदाशिव अनंत

सुशास्त्र-नीती-कीर्तिमंत, शौर्यवंत, राजसी,

कुशाग्र बुद्धिवंत शोभला

प्रजाजनास रक्षण्या, स्वराज्यसिंधू राखण्या

पुनश्च तेज:सूर्य लाभला

छावा शिवबाचा छावा 

छावा संभाजी राजा || 1|| 

मनामनात गर्जना करकरात वंदना

कितीएक बांधवास जोडले,

जरी मरे जागुनी तनामनास झोकुनी

प्रजेस एकजूट बांधले.

कधी पाय वाकुनी सदा स्वराज्य जागृती

विजेसमान शंभु गरजला हा.

प्रजाजनास रक्षण्या, स्वराज्यसिंधू राखण्या

पुनश्च तेज:सूर्य लाभला.

छावा शिवबाचा छावा 

छावा संभाजी राजा || 2|| 

छत्रपती संभाजी महाराज कि जय ! 

केली अशी करणी, तडकली धरणी

काळ गेला शरणी, मुजरा तुझ्या चरणी

शंभूराजा मुजरा तुझ्या चरणी…!

राजे हर संभाजी .. रं हा जी…(2) 

धगधगता लाव्हा , स्वराज्याचा छावा 

संभाजी महाराज 

This is स्वराज्यरक्षक संभाजी Swarajya Rakshak Sambhaji Title Song Lyrics | Zee Marathi

राजमुद्रा: 

श्री शंभोः शिवजातस्य,मुद्रा द्यौरिव राजते | 

यदंकसे विन लेखा, वर्तते कस्य नोपरि || 

राजमुद्रेचा अर्थ: 

शिवपुत्र श्री शंभु राजे यांची राजमुद्रा सूर्याच्या तेजाप्रमाणे आकाशी शोभते आहे. 

लोकांच्या कल्याणाकरिता तिचा वापर सर्वत्र गाजणारा आहे. 

त्यासाठी ही मुद्रा सदैव प्रकाशमान आहे . 

आणि छत्रपतींच्या या राजमुद्रेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही.

स्वराज्यरक्षक संभाजी Swarajya Rakshak Sambhaji Title Song Lyrics | Zee Marathi

Credits: 

मालिका: स्वराज्यरक्षक संभाजी २०१७

गीतकार/Lyrics: नचिकेत जोग 

गायक/Singer: संदीप उबाळे 

संगीत/Music: सत्यजित रानडे 

दिग्दर्शक/Director: कार्तिक केंढे

कथा/Story: प्रतापराव गंगावणे

निर्माता/Producer: अमोल कोल्हे, जगदंब क्रिएशन

सौजन्य/Music Label: झी मराठी / Zee Marathi 

Links to listen full title song: 

Conclude: 

स्वराज्यरक्षक संभाजी हे योद्धा राजा संभाजी यांच्या जीवनावर आधारित एक भारतीय ऐतिहासिक

मालिका जी २०१७ मध्ये झी मराठीवर प्रकाशित झाली होती. या मालिकेचे दिग्दर्शन विवेक देशपांडे

आणि कार्तिक राजाराम केंद्रे यांनी केले असून लेखन प्रताप गंगावणे यांनी केले आहे.

जगदंब क्रिएशन्सच्या बॅनरखाली अमोल कोल्हे, विलास सावंत आणि सोनाली घनश्याम राव

यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे.

Also Read: Mangalagaur Song Full Lyrics Baipan Bhari Deva – मराठी BlogWali (marathiblogwali.in)

Wiki: Swarajyarakshak Sambhaji – Wikipedia

This Post Has 3 Comments

Leave a Reply