You are currently viewing गिरकी मराठी सिनेमा । Giraki – Twirl Marathi Movie Review 
गिरकी मराठी सिनेमा Giraki /Twirl Marathi Movie Review

गिरकी मराठी सिनेमा । Giraki – Twirl Marathi Movie Review 

गिरकी मराठी सिनेमा । Giraki – Twirl Marathi Movie Review

आज “गिरकी Twirl ” हा सिनेमा मुंबई मध्ये 20th Asian Film Festival ला पाहिला.

          कथानकाच्या सुरुवातीपासूनच गिरकी काय असेल याची उत्सुकता लागून राहते, paragliding करताना हवेच्या अचानक बदलेल्या वेगामुळे ती मुलगी एका घनदाट जंगलात पडते, इथून सुरु होणारी गोष्ट, जंगलात तीला मिळणारा एक सोबती आणि त्यांचा प्रवास अशी परंतु तुम्ही कितीही म्हणा मला एकटं राहायचंय, किंवा आम्ही दोघेच बरे वैगरे वैगरे, पण एका वेळेनंतर तुम्हांला आजूबाजूला माणसं दिसली गेली नाहीत तर तुम्ही hyper होता, म्हणजेच नाही म्हटलं तरी माणसं हवीतच, कारण जग हे ह्याच लोकांमुळे आहे, त्यामुळे जंगलात 2-3 दिवस बरं वाटेल पण त्यानंतर घरची ओढ लागेलच.

एवढ्या मोठ्या घनदाट जंगलातून चालताना आणि नदी ओलांडेपर्यंत एकही व्यक्ती दिसत नसताना अचानक नदीच्या पलीकडे एक व्यक्ती त्यांना दिसते आणि ते सुटकेचा निश्वास सोडतात, पण मात्र तीने विचारलेल्या एका प्रश्नामुळे गिरकी नाव का असेल ह्याचा प्रत्यय येतो. त्यामुळे तो प्रश्न कोणता? आणि या कथेचा आणि चित्रपटाचा आशय जाणण्यासाठी “गिरकी ” नक्की बघा.

        कथा, पटकथा, दिग्दर्शन खुप सुंदर, निसर्गाचं रम्य रूप घडवणारा प्रत्येक scene, प्रमिती आणि सुयश ह्या दोघांचा अत्यंत खराखुरा वाटणारा अभिनय आणि त्यांचे expressions म्हणजे कमालच! संपूर्ण चित्रपटात तीनच पात्र दोन actors आणि एक म्हणजे “निसर्ग “, तरीही शेवट्पर्यंत काय होईल याची उत्सुकता!

Pramitee Sangita Hari Narke You are Rocking as always  सगळ्यात दाद म्हणजे निर्मात्यांना, कारण इतका अतिशय वेगळा परंतु हल्लीच्या OTT च्या जगात अशा विषयाला पाठिंबा देऊन तो प्रेक्षकांसमोर आणणं हे कौतुकास्पद!

     नक्की बघा “गिरकी Twirl “

आणि संपूर्ण Team ला अनेक शुभेच्छा! आणि ह्या चित्रपटाला सगळ्या फेस्टिवल मध्ये खुप छान यश मिळूदे ही बाप्पाकडे प्रार्थना 🙏🏼😇

धन्यवाद!

Kavita Datir

Ganesh Shinde

Amit Sonawane

Pramitee Narke

Suyash Zunjurke

Third Eye Asian Film Festival 

          गिरकी मराठी सिनेमा । Giraki – Twirl Marathi Movie Review 

Details: 

मूळ नाव: गिरकी 

इंग्रजी नाव: Twirl 

वर्ष: 2022

धावण्याची वेळ: 95 मिनिटे

भाषा: मराठी

देश : भारत

दिग्दर्शक : कविता दातीर, अमित सोनवणे

निर्माते : गणेश शिंदे, कविता दातीर

कलाकार : सुयश झुंजुरके, प्रमिती

पटकथा : कविता दातीर, अमित सोनवणे

सिनेमॅटोग्राफर : रोशन मारोडकर

संपादक : अमित सोनवणे

साउंड डिझायनर: महावीर सबन्नावर

संगीतकार : सारंग कुलकर्णी

प्रॉडक्शन कंपनी : परफेक्ट ग्रुप

वर्ल्ड सेल्स : अमित सोनवणे

सारांश :

अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने पॅराग्लायडिंग/ paragliding करणारी मुलगी जंगलात उतरली. तिथून बाहेर पडण्यासाठी ती एकटीच चालत जाते, पण एका उध्वस्त आणि निर्जन किल्ल्यावर अडखळते. तिथे एका मुलाला भेटून तिला दिलासा मिळतो. किशोरवयीन मुले, ते एकमेकांना मनोरंजक संभाषणात गुंतवतात आणि एखाद्या गावात येईपर्यंत निसर्गात विलीन होतात. गिराकी (फिरणे) हा संस्कृतीपासून दूर जाण्याचा आणि त्यात परत उतरण्याचा प्रवास आहे.

संचालकांचे निवेदन/ संचालकांची नोट: 

काही अपवाद वगळता प्रत्येक दृश्यात नव्या जागेची मागणी होती. बाह्य असल्याने ते मानवी नियंत्रणाबाहेर असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून होते. त्यामुळे कमी बजेटमध्ये ‘गिराकी’चे चित्रीकरण आव्हानात्मक होते.

Also Read: स्वराज्यरक्षक संभाजी Swarajya Rakshak Sambhaji Title Song Lyrics | Zee Marathi – मराठी BlogWali (marathiblogwali.in)

Also Read: Pune International Film Festival (piffindia.com)

Giraki Pramitee’s movie

Leave a Reply