You are currently viewing सकाळी लवकर उठण्याचे फायदे | Sakali lavkar uthnyache phayde
Sakali lavkar uthnyache phayde

सकाळी लवकर उठण्याचे फायदे | Sakali lavkar uthnyache phayde

Benefits of Waking Up Early 

सकाळी लवकर उठण्याचे फायदे | Sakali lavkar uthnyache phayde

“लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्यसंपदा लाभे “! 

हे वाक्य प्रत्येकाने  आपल्या आई-वडिलांकडून विशेषतः

आजीकडून एकदातरी ऐकलंच असेल . पण ते असं का नेहमी म्हणतात ?  

याची काहीतरी कारणं असतीलच ना ? चला तर आज जाणून घेऊयात 

सकाळी लवकर उठण्याचे फायदे | Sakali lavkar uthnyache phayde

नंबर १ : सकाळी लवकर उठल्याने शरीरावरचा ताण कमी होतो. 

हो आणि तुमचा संपूर्ण दिवस आनंदात जातो. या सवयीमुळे 

तुम्हाला व्यायाम करण्यास वेळ मिळतो. व्यायाम केल्याने शरीरात 

रक्तसंचलन वाढते. त्यामुळे हृदयाची प्रक्रिया सुरळीत राहते, तर 

हृदयासंबंधित आजार होण्यापासून व्यक्ती दूर राहतात.

नंबर २ : सकाळी लवकर उठणारे लोक उशिरा उठणार्‍या 

लोकांपेक्षा उत्साही आणि कार्यक्षम असतात.

हे अगदीच खरंय ! लवकर उठणार्‍या लोकांची बुद्धी तल्लख असते. 

त्या व्यक्तीची सकारात्मक विचार करण्याची क्षमता वाढते.

सकाळी माणसाच्या शरीरात सकारात्मक ऊर्जा सर्वात जास्त असते.

 त्यामुळे सकाळी लवकर उठून तो त्याचा सदुपयोग करू शकतो.

नंबर ३ : सकाळी लवकर उठल्याने मन प्रसन्न आणि ताजेतवाने होते . 

सकाळी उठून मॉर्निंग वॉक, कसरत, जॉगिंग आदी व्यायाम करू शकता. 

त्यामुळे फिट आणि निरोगी राहता येते. आपले मन शांत असेल तर

निश्चितच आरोग्य चांगले राहते. आरोग्य उत्तम असल्याने त्याचा चांगला

 परिणाम आपल्या शरीरावर होतो.

नंबर ४ : कामे वेळेवर होतात . 

सकाळी लवकर उठल्याने तुमची दिवसभरातील सगळी कामे 

वेळेवर होतातच आणि त्यात तुम्हाला तुमच्यासाठी फ्री time सुद्धा

मिळतो ज्यात तुम्ही वाचू शकता किंवा तुम्ही कामाव्यतिरिक्त 

इतर कोणतीही activity करू शकता . 

नंबर ५ : सकाळी केलेला अभ्यास लक्षात राहतो . 

आपल्याला आई – आजी नेहमीच सांगतात सकाळी उठून 

अभ्यास करा ते तुम्हाला इतर कोणत्याही वेळेपेक्षा जास्त लक्षात राहील

 ते अगदीच खरं आहे . सकाळचं वातावरण प्रसन्न असल्यामुळे तुम्ही 

सकाळी जर अभ्यास किंवा वाचन केलंत तर ते तुमच्या long term

 memory मध्ये कोरलं जात . 

नंबर ६ : सतत लवकर उठल्याने तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारते . 

Quality of Sleep देखील तितकीच महत्त्वाची आहे . 

नंबर ७ : पचनशक्ती सुधारते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहते . 

  आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे ? पण विज्ञानाने हे सिद्ध केलंय कि , 

लवकर उठल्यामुळे तुमची पचनसंस्था योग्य रीतीने काम करते आणि 

त्यामुळे तुमच्या    शरीरातील पाण्याची पातळी प्रमाणात राहते . 

नंबर ८ : केसांची वाढ आणि त्वचेत सुधारणा होते . 

मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य असेल 

तर आपोआपच केसांचची वाढ  आणि त्वचेत सुधारणा होते . 

नंबर ९ : भुक चांगली लागते. 

सकाळी लवकर उठून व्यायाम केल्यामुळे तुम्हाला चांगली भुक लागते. 

सकाळी पुरेसा वेळ असल्यामुळे तुम्ही वेळेवर आणि पौष्टिक नाश्ता करू शकता.

 ज्यामुळे दुपारी आणि रात्री वेळेत भुक लागते आणि तुम्ही व्यवस्थित जेवता. 

ज्यामुळे तुम्ही जंकफूड आणि अहितकारक पदार्थ खाणे टाळता.

नंबर १० : कार्यक्षमता वाढते. 

रात्रभर पुरेशी झोप झाल्यामुळे मेंदूला आराम मिळतो. त्यामुळे 

सकाळी लवकर उठल्यावर तुमचा मेंदू अधिक कार्यक्षम होतो. एखादे 

काम करताना तुम्हाला थकवा अथवा कंटाळा येत नाही. जे काम करता 

ते पूर्ण लक्ष देऊन केल्यामुळे तुम्हाला लवकर यश मिळते. जर तुम्हाला

जीवनात लवकर यशस्वी व्हायचं असेल तर लवकर उठणं फायदेशीर ठरू शकतं.

असे अनेक फायदे जर आपल्याला होणार असतील तर 

यापुढे तुम्हीसुद्धा लवकर उठाल ना ? 

सकाळी लवकर उठण्याचे फायदे | Sakali lavkar uthnyache phayde

तुम्हाला याची सवय लागली तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा 

धन्यवाद !! 

Also Read: 21 Proven Benefits Of Waking Up Early – Succeed Feed

Also Read: Tips to Make Study Notes for Exams – मराठी BlogWali % % (marathiblogwali.in)

सकाळी लवकर उठण्याचे फायदे 
Benefits of Waking Up Early 

This Post Has 4 Comments

Leave a Reply