International Women’s Day (IWD)
आंतरराष्ट्रीय/ जागतिक महिला दिन (IWD) हा महिलांच्य
सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिकआणि राजकीय कर्तृत्वाचा
गौरव करणारा जागतिक दिवस आहे.
दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जाणारा IWD हा
वर्षातील सर्वात महत्वाचा दिवस आहे:
जागतिक महिला दिनानिमित्त तुमच्यासाठी खास भेट!
तुमच्या वाचण्यात कधी नाटकाचा एखादा प्रसंग ,
एखाद्या मालिकेचा एखादा सीन ,किंवा एखाद्या चित्रपटाचा
सीन आलाय का ? नसेल तर आजचा हा लेख एवं स्क्रिप्ट
तुम्हांला नक्कीच आवडेल. आज तसाच एक प्रसंग मी लिहिण्याचा
प्रयत्न करणार आहे ,माझ्या आजच्या स्क्रिप्टचा विषय खूपच नाजूक
पण तेवढाच प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे .
“आई व्हायचंय मला ” !
जागतिक महिला दिन | “आई व्हायचंय मला” 8 March | Women’s Day
पात्रांची नाव आणि ओळख –
नायिका – विशाखा पाटील (विशू) वय वर्ष – ४०
पोस्टग्रॅड्युएट: एम ए (मराठी साहित्य ),लेखिका
नवीन पुढारलेल्या विचारांची ,साधी ,सरळ , सुंदर ,
कुटुंबाला बांधून ठेवणारी ,२१ व्या शतकातील सुशिक्षित
स्त्री ,स्वतःची वैयक्तिक स्पष्ट मतं असणारी , प्रेमळ ,स्वभावाने
गोड ,अत्यंत निरागस ,सगळ्यांना सांभाळून घेणारी ,सामान्य गृहिणी ,
पण विचारपद्धती थोडी वेगळी असणारी,पीएचडी करण्याचं स्वप्न
आणि ते पूर्ण करण्यासाठीची तिची धडपड अशी ही आपली नायिका विशाखा !
नायक – रोहित पाटील -वय ४३
एमबीए (मार्केटिंग) , केलेला आणि एका मोठ्या फर्म मध्ये
मोठ्या पदावर काम करणारा , स्मार्ट ,यंग ,कुटुंबाची काळजी घेणारा ,
बायकोवर मनापासून प्रेम करणारा ,तिला समजून घेणारा ,
सपोर्ट करणारा ,थोडा मस्तीखोर ,मिळून -मिसळून वागणारा ,
थोडा रागीट ,स्पष्टवक्ता ,कामाशी एकनिष्ठ असलेला आपला रोहित
नायिकेचा पुतण्या – २८ वर्ष
एका नामांकित फर्म मध्ये आताच रुजू झालेला एक
स्मार्ट ,यंग पण पुढारलेल्या विचारांचा सिंगल मुलगा !
प्रस्तावना –
ही कथा एका विवाहित स्त्रीची ,जिच्या लग्नाला २० वर्ष होऊन
गेलीयेत पण मागे घडलेल्या अशा कोणत्या प्रसंगामुळे विशाखा
आजही तो विषय काढल्यावर खूप भावुक होते, काय होता तो
प्रसंग ,कसं घडलं सगळं, काय परिस्थिती होती आणि दोघांनी
एकमेकांना त्या काळात कशी साथ दिली ?
२१ व्या शतकातसुद्धा स्त्री कितीही शिकलेली असली ,तरी
आजची “आई” होण्याचं सुख हेच सर्व काही असतं असं
१०० पैकी ९८% महिलांचं मत नक्कीच असत . कारण ह्या
सारखा आनंद जगात दुसरा कोणताच नाही .
आता आई होणं म्हणजे फक्त शारीरिकदृष्ट्याचं नाही त्यानंतरही
बऱ्याच फेजेस असतात त्या पार पाडणं . आई होणं तितकंसं सोपं नव्हे .
मग ते फक्त शारीरिकरित्याच आणि मग बाळ झाल्यावर त्याच्या
सगळ्याच गोष्टी करता करता ,आपलं विश्व त्या बाळाभोवतीच फिरत .
जागतिक महिला दिन | “आई व्हायचंय मला” 8 March | Women’s Day
प्रसंग १ –
विशाखा आणि पुतण्या करण मधला – ह्या दोघांची इतकी
अफलातून chemistry आहे कि दोघ एकमेकांशी कोणत्याही
विषयावर अगदी सहजपणे बोलू शकतात . करण विशाखाचा मुलगाच आहे .
काकी – पुतण्याचं नातं कमी पण मैत्रीचं नातं त्या दोघात जास्त आहे .
करण विशाखाला छोटी आई म्हणतो .
जागतिक महिला दिन | “आई व्हायचंय मला” 8 March | Women’s Day
सदर प्रसंग रोहित अमेरिकेला काही कामानिमित्त गेला असताना ,
मागचा सगळं भूतकाळ विशाखा करणजवळ व्यक्त करताना ..
विशाखा – (करणच्या रूममध्ये कॉफी घेऊन येते , करण लॅपटॉपवर
त्याच काम करत बसलाय ) काय चाललंय , तुझी काम
कधी संपतात का रे बाबा ? अगदी काकांवर गेलायस तुझ्या ?
त्यांचं पण कधी लक्षच नसत बायको येते कधी आणि जाते कधी ,
तू तरी असं नको करुस रे,चार शब्द ह्या छोट्या आईशी बोलत जा .
करण – (लॅपटॉप बंद करत आणि हातातली सर्व काम बाजूला ठेवत ) ,
काय ग छोटी आई , मी तर नेहमीच तुझ्याशी बोलतो ना ,आपल्या मस्त गप्पा
चल, आजपण अशाच गप्पा मारुयात , मागे तू एक गोष्ट मला
सांगणार होतीस , तुला काकाचं दारू पिणं खूप खटकायचं ,
तुझ्याशी नीट न वागणं ,नुसतं काम आणि काम पण मग ह्यात
जीवापाड प्रेम कुठेय ? पण असा कोणता प्रसंग ज्यामुळे
तू आणि काका लहान बाळाचा किंवा कोणाच्या गरोदरपणाचा
विषय निघताच डोळ्यात खूप काही साठवून निघून का जाता ?
करण – काळचंच घे , डायनींग टेबलवर लीना(करणची बहीण)
तिच्या गरोदरपणाच्या अनुभवाबद्दल सांगत होती ,तेव्हा तू
अशी उठून का गेलीस ? घरात मी आईला , बाबांना विचारायचा
प्रयत्न केला पण कोणीच सांगायला तयार नाही , नक्की काय
आहे असं ‘छोटी आई ‘ जे तू इतकं मनात दाबून ठेवलंय ,प्लिज
आज मला तू हे सांगच
विशाखा – ( अंगावर थोडे शहारे ,आणि डोळे पूर्ण पाण्याने भरलेले ) –
तुला फक्त काकाचे दोषच दिसतात त्यांनी माझ्यावर केलेलं प्रेम नाही
पाहिलंस तू . दारू सोडायचा प्रयत्न ते करायचे पण मग अनेकदा
ऑफिसच्या कामातून आलेल्या नैराश्यातून पुन्हा दारू प्यायचे .
करण – म्हणजे काय तर स्वतःवर ताबा नाहीच .. (रागाच्या सुरात )
विशाखा – नाही करण ,नाही ,ह्यांनी ठरवून दारू सोडली होती ,
एक-दोन नाही चांगली चार वर्ष , आणि तेही फक्त स्वतःसाठी
नाही करण , माझ्यासाठी, आमच्या बाळासा….
(वाक्य अर्धवट आणि रडत करणला सांगताना )
दोघेही एकमेकांकडे बघत करण आश्चर्याने आणि विशाखा रडतच ,
२ मिनटं शांतात ..
विशाखा – हो , तुझे काका कितीही कामात व्यक्त्त असले तरी
संसार आमचा चाललाच होता , आम्ही हवा तेवढा वेळ नसू देत
एकमेकांना पण नवरा-बायकोचा जो वेळ द्यायला हवा तो आम्ही
एकमेकांना नक्कीच द्यायचो . आणि त्यात आम्हाला एकेदिवशी
कळलं कि , “मी गरोदर आहे ” ! आम्हाला दोघांनाही खूप आनंद
झाला , तुझ्या काकांना लहान मुलं खूप आवडायची आणि त्यात
हि बातमी कळल्यावर तर काय , त्यांचा आनंद गगनातच मावेना .
आणि माझं तर एकमेव स्वप्न होत आई होण्याचं ! आणि
ह्यांच्यानंतर तर मी माझं हे गुपित पहिल्यांदा तुलाच सांगितलं होत करण ,
(एकमेकांचा हात हातात घेऊन )
विशाखा – तेव्हा तू खूप लहान होतास , तुला कळलं कि नाही ,
मला नाही माहित ,बहुदा नसेल कळलं पण माझ्या चेहऱ्यावरचा
आनंद बघून तू खूप खुश झाला होतास , मी तुझ्या कानात गंमत
सांगितल्यावर इवल्याशा हातांनी तू मिठी मारली होतीस मला ,
करण – तुझं गुपित ?
विशाखा – करण, मी तुझ्या कानात सांगितलं होत की ,
मी तुला एक छोटं भावंडं आणणार आहे (थोडंसं दोघांच्या चेहऱ्यावर हसू )
मी सांगितल्यावर तू काय म्हणालास माहितीये , ए छोटी आई ,भाऊ
नको हा मला बहीण हवी . आणि अख्या घरभर तू हे सांगत सुटल्यास
कि छोटी आई मला बहीण आणणार आणि मग घरात कळलं कि
मी गरोदर आहे .
विशाखा – तुझ्या आईनंतर मी दुसरी स्त्री जिला हे सुख
अनुभवण्यास मिळालं होत . घरात सगळेच खूप खुश होते .
ताईंनी म्हणजे तुझ्या आईने माझं औक्षण केलं आणि
पुढचे ३ महिने माझी खूपच काळजी घेतली .
करणच्या चेहऱ्यावर हसू आणि तितकीच पुढचं सगळं
ऐकण्याची उत्सुकता होती ,
विशाखा – मी आई आणि हे बाबा होणार आहेत कळाल्यापासून
ह्यांनी दारू सोडली होती , रोज काम संपून घरी यायचे,
मला काय हवं नको ते बघायचे ,दर २ दिवसाआड मला बाहेर
फिरायला घेऊन जायचे , खूपच बदलले होते हे ,आणि ह्यांना
असं पाहून तर मी जास्तच खुश होते . गरोदरपणात बाईने
आनंदी असायला हवं म्हणजे बाळ पण हसरं होत हे वाक्य
ह्यांना इतकं पटलं होत ,कि ते मला कधी नाराज करायचेच नाहीत .
सगळं खूप छान चाललं होत , पण ना …
करण – मग पुढे ?.. पुढे बाळाचं काय छोटी आई ??
(विशाखा हुंदके टाकत रडतेय , करण सतत तिला विचारतोय
त्याच्याही डोळ्यात थोड्याशा वेदनादायी भावना )
करण – ए छोटी आहे , बाळाचं काय ,सांग ना ? काय झालं बाळाचं ??
विशाखा – पण काय करण ? सगळं होत्याच नव्हता झालं रे ?
त्यादिवशी जिन्यावरून उतरताना अचानक माझा तोल गेला ,
आणि मी धपकन घरंगळत खाली पडले , चुकी कोणाची ? कशी पडले ?
कोणाला काहीच माहित नाही . माझ्या आवाजाने घरातले सगळे बाहेर
आले आणि मला दवाखान्यात नेलं पण …
अतिकाळजी असेल ,अतिविचार असेल ,काहीतरी असेल पण
आम्ही आमचं बाळ गमावलं रे करण (खूप जोरात रडत हुंदके देत )
विशाखा करणला घट्ट मिठी मारून त्याच्या कुशीत रडतेय .
करण- शांत हो छोटी आई ! ,
विशाखा – त्यादिवशी दवाखान्यातून परत आले तेव्हा मी हे
मान्य करायलाच तयार नव्हते ,कि असं काहीतरी झालाय ,
डोळ्यातलं पाणी थांबतच नव्हतं , काहीच सुचत नव्हतं .
वेड लागलं होत मला . मी काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नव्हते करण ..
पण ह्यांनी खूप सावरलं मला , ह्यांनी खूप जपलंय रे मला करण ,
मी काही ऐकतच नाही म्हंटल्यावर हे समोर बसले आणि मला म्हणाले
विशू सगळं विसर .. विसर ..
(करणचा हात पकडून आणि खांदयावर डोकं ठेवून खूप रडत )
आणि विशू सगळं विसरली रे … सगळं विसरली .
मी ह्यांच्याकडे बघितलं तर हे स्वतःला सावरण्याचा इतका
प्रयत्न करत होते , मी विचार केला कि हे स्वतःला सावरतायेत ,
तर मी स्वतःला सावरायला नको का ?
करण ह्या सगळ्या गोष्टीमधून आम्ही पूर्णपणे बाहेर पडू असं
नाही वाटत मला . पण एकमेकांना सावरण्याचा प्रयत्न नक्कीच केला ना ?
अजून करतोय .
“राहून राहून इतकंच वाटत कि ,मी माझ्या बाळाला मारलं ..”!
(खूप जोरात हुंदके टाकत आणि पोटाला हात लावत हे वाक्य म्हणते )
करण – या छोटी आई ,नाही असं नाहीये गं
विशाखा – जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात ना ,
तेव्हा असं वाटतं कि देव ह्यासगळ्यचीच शिक्षा देतोय मला ,
करण मी त्याला मारलं
( जिवाच्या अंतःकरणातून रडत आणि करणला सगळं सांगताना )
करण – नाही , नाही असं नाही म्हणायचं .. छोटी आई प्लिज
(करणला घट्ट मिठी मारून दोघेही खूप रडतात )
प्रसंग २ – करणला सगळा भूतकाळ सांगून झाल्यावर
विशाखा तिच्या खोलीत येऊन अमेरिकेत असणाऱ्या रोहितला
फोन करून सगळंच सांगते . आताचा संवाद विशाखा आणि रोहितमधला
विशाखा – (डोळ्यात थोडे अश्रू ) आज करणसमोर सगळा
भूतकाळ सांगताना , मला ,मला पुन्हा-पुन्हा आठवत होत सगळं ,
पुन्हा एकदा भसाभसा नरजेसमोर सगळं घडत होत .
अगदी काळ-परवा घडल्यासारखं .. मला जाणवत होत ते माझ्या पोटातलं बाळ
आणि नंतर त्या रित्या पोटाची वेदना , वाटत होत कि ,
सगळं आता होतंय हे सगळं , जाणवत होती ती मला माझ्या
पोटात इवलीशी चाहूल , तुम्हाला आठवतंय आपण नावही
ठरवलं होत तीच ..
(रडत असताना थोडंसं मध्येच हसून ) वृंदा .. वृंदाच ना ?
तुम्हाला आवडायचं हे नाव . आपण तिला ए वृंदा अशी
हाक मारणार होतो , आणि ती आपल्याला आ
ई-बाबा म्हणेल मम्मी-पप्पा वैगरे नाही . ती आज असती तर केवढी असती हो ?
रोहित – विशू , आपलं ठरलंय ना ?
ह्या विषयावर नाही बोलायचं , हा विषय काढायचं नाही ,
ठरलंय ना आपलं मग .. विसरून जायचं सगळं
विशाखा – विसरलीये , तुम्ही म्हणायचे ना ,
विसू विसर सगळं , विसर ,विसर ..विशू सगळं विसरलीये ..
पण आज बोलू द्या ना मला ,प्लिज बोलू द्या ..
“मला आई व्हायचं होत हो “! अहो , खरंच मला मनापासून
आई व्हायचं होत , (हुंदके देत,रडत ,हलक्या स्वरात बोलताना )
मला अनुभवायचा होता तो त्रास ,ती वेदना ‘बाळंतपणाची ‘ !
तुम्हाला माहितीये , आई ,वर्षाताई आपल्या
घरातल्या सगळीच बायका म्हणतात ,त्या इवल्याशा
बाळाला कुशीत घेतलं ना की , कि नाही होत तो त्रास ,
नाही जाणवत ती वेदना ..
आपल्या नवऱ्याचा अंश नऊ महिने पोटात वाढवताना खूप छान वाटतं .
आपल्या जोडीदाराला अंशरूपाने स्वतःच्या शरीरात
जागा देण्याचा आनंद खूप छान असतो . मला वाटता
वाटता सगळं राहून गेलं हो … (मोठ्याने रडत )
रोहित – अगं विशू, आई आहेसच तू .. करण आईच म्हणतो
कि नाही तुला .. मग आणि वर्षावहीनीसुद्धा
तीच मुलं कस तुमच्यात वाटून घेतलंय बघ .
विशाखा – (थोडंसं स्मितहास्य ओठांवर आणून ) हो ना ,
करण तर बाळच आहे माझं ..
रोहित – आणि प्रगती(विशाखाच्या बहिणीची मुलगी )
मुलगी .. बघ देवाने तुला मुलगी पण दिली .
विशाखा – हो , म्हणजे मला जर खरच मुलगी
झाली असती तर ,देवाकडे अशीच मुलगी मागितली असती .
कधी काळजी करते ,कधी सांभाळते , कधी ओरडतेदेखील , हक्काने ..
रोहित – विशू जे काय झालं त्यात चूक कोणाची हे
विचार करणं सोडून देऊयात ,एक मूल तर आपण
गमावलं आता हि दोन मुलं जी आपल्याला सावरतायेत
त्यांच्यासाठी सगळं करूयात . मी लवकरच घरी येतोय .
५-६ दिवसांनी रोहित अमेरिकेहून घरी परतला आणि
विशाखाच्या आई होण्याच्या भावनेला त्याने ह्यावेळी
इतकं मनावर घेतलं कि इतक्या वर्षात त्याने जो निर्णय
नाही घेतला तो ,आता घेतला आणि एक अनाथाश्रमातून
मुल दत्तक घेण्याचा विशाखाच्या संमतीने घेतला .
अनेक कागदी फॉर्मॅलिटीज पूर्ण करून त्यांनी
७ महिन्यांच्या एका मुलील दत्तक घेतलंय ,
तीच नावदेखील त्यांनी “वृंदा” असच ठेवलं .
आज विशाखाला आई व्हायचा आनंद मिळतोय ,.
आणि बाकी घरातल्या प्रत्येक माणसाला वृंदासोबत
असणाऱ्या नात्याचा ! “आईपण ” नेहमी शारीरिकदृष्ट्याच नाही
तर ते मानसिक,आणि भावनिक रीतीने जगता आलं पाहिजे .
आई व्हायला वय ,वेळ,काळ लागत नाही .
आई होण्याचा आनंद हा जगातला सर्वात मोठा आनंद आहे
खरा हे आज विशाखाच्या रूपाने आपण पाहिलंच .
आज महिला दिनाबद्दल अशा सर्व आईंना खूप खूप प्रेम !
जागतिक महिला दिन | “आई व्हायचंय मला” 8 March | Women’s Day
Also Read: बंधन शूरांचे देश वीरांचे – मराठी BlogWali (marathiblogwali.in)\
Also Read: IWD: About International Women’s Day (internationalwomensday.com)