You are currently viewing परीक्षा संपली.. सुट्टीत काय ? | What to do in Holidays After Exam
What to do in Holidays After Exam?

परीक्षा संपली.. सुट्टीत काय ? | What to do in Holidays After Exam

हुश्श…!! संपली बाबा एकदाची परीक्षा. 

हेच वाक्य येत जेव्हा शेवटचा पेपर देऊन

 आपण वर्गाच्या बाहेर पडतो . 

  इतक्या दिवस डोक्यावर असलेल्या परीक्षेचं

 ओझं थोडं हलकं होतं कारण बरेच दिवस आपण हाच

 विचार करत राहतो कि अभ्यास कसा होईल ?

पेपर कसा जाईल ? इत्यादी पण त्यात शेवटचा 

पेपर कधी होईल याकडे लक्ष मात्र असतंच त्यामुळे

 परीक्षा संपली याचा आनंद हा वेगळाच असतो .

त्यादिवशी आणि त्यानंतर कित्येक दिवस  

मस्त मित्र-मैत्रिणीसोबत hangout , गप्पा ,मजामस्ती 

असा  सगळंच करतो .लहान मुलांना मामाच्या 

गावाला जाण्याची उत्सुकता असते उन्हाळ्याच्या 

सुट्टीची गंमत वाटते . पण हे काहीच दिवस जशी 

आपली म्हण आहे ना ” नव्याचे नऊ दिवस “! 

म्हणजे एखादि नवीन गोष्ट किंवा वस्तू नवीन 

असेपर्यंतच तिचं कौतुक वाटतं तसंच सुट्टीचं पण  

पहिला पहिला खुप मज्जा वाटते नंतर कंटाळा येत जातो 

आणि प्रश्न पडतो कि आता पुढे काय ? आता परीक्षा आणि सगळी पुस्तकं

संपल्यावर तुमच्या हातात भरपूर वेळ असेल. मला माहित आहे

की आपल्याला असे वाटते की सध्या आपल्याला झोपेची आवश्यकता

आहे, परंतु कधीतरी आपण कंटाळणार आहोतच आणि अस्वस्थ

होणार आहोत, मग अशावेळी तुम्ही काय करू शकता? 

संशोधनानुसार, बहुतेक विद्यार्थी सुट्टीत वेगवेगळे छंद जोपासून

आपली प्रतिभा शोधताना दिसतात. ते बरोबरच आहे!

तर मित्रांनो, या सुट्टीत असे कोणते छंद तुम्ही आत्मसात करू

शकता जे आपल्याला स्वत: चा अधिक चांगल्या प्रकारे विकास

करण्यास देखील मदत करू शकतील, ते जाणून घेउयात

आजच्या ह्या लेखामधून ! 

म्हणूनच मोकळ्या वेळेत तुम्ही काय करू शकाल 

 हे जाणून घ्या  आमचा हा लेख वाचा. 

आणि आम्हाला कमेंटद्वारे कळवा .

परीक्षा संपली.. सुट्टीत काय ? | What to do in Holidays After Exam

१ . तुमचे छंद जोपासा . || Pursue your Hobby.

शाळा सुरु असताना अभ्यासाव्यतिरिक्त काही

 करावं एवढा वेळच नसतो म्हणूनच आताच्या सुट्ट्यांच्या 

वेळेत तुम्हीतुमच्या आवडीनिवडी जपा . 

मग त्यात drawing ,painting, photography ,

 गोष्टी किंवा कविता लिहणे , पुस्तकं वाचणे , 

गाणी ऐकणे ,नाचणे ,slime बनवणं इत्यादी इत्यादी …

ज्या कलेत तुमचं मन रमत ते तुम्ही करावं . 

कारण अशा गोष्टी अभ्यासापेक्षा जास्त 

आपल्याला शिकवून जातात .

२. कुठेतरी बाहेर फिरायला जा. ||  Go out for a picnic. 

सतत घरात बसून कंटाळा येणं साहजिकच आहे , 

म्हणूनच कुटुंबासमवेत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत 

पिकनिकला जा .अशा जागांवर जा जिथे आधी 

तुम्ही कधी गेला नसाल कारण अनोळखी जागांना

 explore करताना मजा येते . एखादं नवीन शहर 

आणि त्याच्या अजिबाजूचा परिसर ,तसंच 

डोंगर -दऱ्यात ,समुद्रावर कुठेही तुम्ही जाऊ शकता . 

वेगळ्या हवेत आणि वातावरणात गेल्यावर तुम्हाला नक्कीच बरं वाटेल.  

३. तुमच्या आवडीची series किंवा movie पाहा. 

 Watch your favorite series or movie. 

पूर्वी मनोरंजनासाठी फक्त  टेलिव्हिजन आणि 

रेडिओ हि दोनचं  माध्यमं होती पण आता मनोरंजनासाठी 

अनेक माध्यमं उपलब्ध आहेत .

 म्हणजेच अनेक OTT वर आपण वेगवेगळ्या 

विषयांवर webseries बघू शकतो तसेच अनेक

Reality shows तसंच आताच 

Youtube हे सगळ्यात मोठं प्लॅटफॉर्म जिथे तुम्ही 

तुमच्या आवडीचं काहीही पाहू शकता. 

परीक्षा संपली.. सुट्टीत काय ? | What to do in Holidays After Exam

४. एखादी भाषा शिका. || Learn a language. 

 जगात जितकी वेगवेगळी माणसं आहे तितक्याच

 वेगवेगळ्या भाषा आहेत . तुम्हाला माहीत आहे का? 

 दर बारा कोसावर  भाषा बदलते . आपली मातृभाषा 

सोडून इतरही भाषा आपल्याला याव्यात सगळ्याच 

आल्या पाहिजे असं नाही पण हल्ली इंग्रजी भाषा 

सगळीकडेच वापरली जाते आणि तिचं महत्त्व आहे 

त्यामुळे ति शिकावी. तसेच फक्त परदेशात 

शिकण्यासाठी ,जॉबसाठी नव्हेच तर रोजच्या 

जीवनातही आपण Japanese , Russian, 

Spanish ,French यांसारख्या भाषा शिकू शकतो.  

या भाषांचे अनेक कोर्सेस ऑनलाईन उपलब्ध आहेत . 

५ . एकत्र मिळून जेवण बनवा. || Make food together. 

Cooking is an Art हे म्हणतात ते खरं आहे .

 एखाद्या रेसिपी च्या पुस्तकातून किंवा youtube 

वरच्या एखाद्या व्हिडिओमधून तुम्ही तुमच्या आईसोबत 

किंवा मित्र-मैत्रिणींसोबत जेवण बनवायला शिकू शकता . 

 नवं-नवीन पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करू शकता. 

६. पुस्तकं वाचा. || Read Books. 

अभ्यासाव्यतिरिक्त अनेक अशी पुस्तकं आहेत 

जी तुम्ही वाचू शकता . आपल्या मराठीत मुबलक

 साहित्य आहे, त्यापैकी तुम्ही काही नक्की वाचू शकता 

त्यामुळे तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल आणि

 पुस्तकं वाचण्याची गोडी तुम्हांला लागेल . 

परीक्षा संपली.. सुट्टीत काय ? | What to do in Holidays After Exam

७. आराम करा आणि स्वतःसाठी वेळ द्या. 

     Relax and make time for yourself. 

 बाकी सगळं होतंच राहील पण स्वतःसाठी 

वेळ देणं हे जास्त महत्त्वाचं आहे . 

MeTime जो आपण म्हणतो त्यात स्वतःबद्दल 

स्वतःच जाणून घेता आलं पाहिजे .पेपर कसा गेला ? 

मार्क्स किती मिळतील ?result कसा लागेल याचा 

जास्त विचार करू नका .मेंदूला फार ताण देऊ नये . 

आराम करा . 

जास्त स्ट्रेस घेऊ नका तुमचं काम तुम्ही छान करा 

आणि बाकी सगळं विसरून जा . 

८ : स्वयंपाक शिकणे आणि स्वतःहून करणे. |

Learning Cooking Skills

          जसं आपल्याला खायला आवडतं, तसंच ते बनवतादेखील

यायला हवं. अगदीच chief सारखं नाही पण आपण स्वतः आणि इतर

चार लोकं खातील इतकं तर नक्कीच जेवण बनवता यायला हवं, मग

ते तुम्ही मुलगा असो वा मुलगी ! सुरुवात अगदी सध्या सोप्या पदार्थापासून

करा, आजकाल YouTube वर बरेच असे channels आहेत ज्यात अगदी

सोप्या पद्धतीने dishes बनवल्या जातात, त्यामुळे ते videos बघून त्याखाली

दिलेली recipe वाचून तुम्ही नक्कीच try करू शकता. जेव्हा तुम्ही स्वतःहून

प्रयत्न कराल तेव्हा लगेचच जमणार नाही पण सतत practice करून करून

तुम्हीदेखील स्वयंपाक बनवण्यात कुशल व्हाल हे नक्की ! 

९ : लेखन शैली शिकणे । Learn Calligraphy

आपले हस्तलेखन सुधारण्याचा तसेच डिझाइनची कला तुम्ही शिकू शकता!

कॅलिग्राफी शिकण्यामुळे तुमचा दृष्टीकोन आणि मनाची काम करण्याची

पद्धतही बदलते. आपण कार्ड, कव्हर आणि बरेच काही लिहू शकता.

अभ्यासातून असेही दिसून आले आहे की मुले हाताने शब्द लिहिताना

शब्दाचे स्पेलिंग अधिक चांगल्या प्रकारे टिकवून ठेवतात. तर, कॅलिग्राफी

आणि हस्तलेखन शिकणे हा ललित मोटर कौशल्ये विकसित करण्याचा

आणि स्मरणशक्ती टिकवून ठेवण्याचा एक अविश्वसनीय मार्ग आहे. 

१०. शास्त्रीय संगीत ऐकणे आपल्या स्मरणशक्तीसाठी चांगले आहे.
अश्या बऱ्याच संशोधनातून सिद्ध झालं आहे की संगीत आपली

स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करू शकते. पण कसे? शास्त्रीय

संगीताच्या व्याकरणाला, म्हणजे लय आणि खेळपट्टीला गणिती पाया

असतो. त्यामुळे आपले मन अधिक रिलॅक्स आणि आनंदी वाटते.

आणि यामुळे मेंदूतील संज्ञानात्मक कार्ये सुधारण्यास मदत होते.

आणि आनंदी मेंदू अर्थातच निरोगी मेंदू असतो. ज्यामुळे सकारात्मक

आठवणी जागतात ज्यामुळे dopamine and neurocognitively

डोपामाइन आणि न्यूरोकॉग्निटिव्ह वाढण्यास मदत होते ज्यामुळे

मेंदू दीर्घकाळ निरोगी राहतो.

११. पोहणे । Swimming
जर तुम्हाला पोहायला येत नसेल तर तुम्हाला वर्गात प्रवेश घ्यावा

लागेल. परंतु जर आपण आधीच जलतरणपटू असाल तर आपल्याला

फक्त या सुट्टीत ते आचरणात आणणे आवश्यक आहे. पोहणे हा

एक छंद म्हणून स्वीकारणे हा सक्रिय राहण्याचा एक उत्तम मार्ग

आहे आणि नवीन स्ट्रोक शिकून आणि वेग आणि अंतराच्या बाबतीत

वैयक्तिक सर्वोत्तम सेट करून प्रगती देखील करतो. हा एक मजेदार

खेळ आहे जो आपल्याला मानसिक आणि शारीरिकरित्या तयार

करतो. आधी कुठून सुरुवात करावी याचा विचार करत आहात?

जगभरातील जवळजवळ प्रत्येक शहरात आणि गावात सार्वजनिक

तलाव आहेत, म्हणून पोहण्यासाठी जागा शोधणे कठीण नाही.

अशाप्रकारे सुट्टीत तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी करू शकता . 

जर तुम्हाला  आमचा हा लेख आवडला असेल तर 

नक्की लाईक करा आणि आम्हाला कमेंटद्वारे कळवा . 

धन्यवाद ! 

Also Read: Sahara Desert 25 Interesting facts in Marathi  – मराठी BlogWali (marathiblogwali.in)

Also Read: 17 Things to Do at Home or Outside After Exams Holidays (parentune.com)

Leave a Reply