अभ्यासात रस कसा निर्माण करावा ? Ways to Develop Interest in Studies
रोजच्या धकाधकीच्या जीवनात मुलांचा अभ्यासातील रस कमी होणे थोडे
स्वाभाविक आहे,
परंतु अभ्यासाची गोडी कशी लावावी, हे जाणून घेण्यासाठी हा
ब्लॉग नक्की वाचा.
बरीच मुलं अभ्यासात हुशार असतात त्यामुळे त्यांना सतत अभ्यास कर
अभ्यास कर असं सांगावं लागत नाही .
पण काही मुलांच्या सतत मागे लागावं लागतं कि अभ्यास कर रे बाबा ..
असं सांगून सांगून अनेक पालक
कंटाळत असतील आणि ते ऐकून अभ्यास न करणारी किंवा कमी
अभ्यास करणारी मुलंसुद्धा कंटाळत असतील .
पण आता फार टेन्शन घ्यायची गरज नाही कारण अभ्यासाची
गोडी स्वतःला कशी लावावी याबद्दल
काही टिप्स आम्ही तुम्हांला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील
आणि त्या सवयींची तुम्ही जर स्वतःला
सवय लावली तर नक्कीच तुम्हांलासुद्धा अभ्यासाची गोडी लागेल.
आणि आम्हांला comments मध्ये
नक्की सांगा तुम्हांला याचा वापर किती आणि कसा झाला .
अभ्यासाची गोडी कशी लावावी. | How to grow interest in Studies?
टीप नं १. Meditation म्हणजेच ध्यान किंवा मनन करणे .
अभ्यास सुरू करण्याआधी मन मोकळं करणं आणि टवटवीत / refresh
करणं खूप महत्त्वाचं आहे.
जोपर्यंत तुम्ही मनन करत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या अभ्यासावर
लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्यामुळे
अभ्यासाला जाण्यापूर्वी किमान ५ मिनिटे ध्यान किंवा चिंतन
करण्याची स्वतःला सवय लावा.
टीप नं २. वेळापत्रक तयार करा . Prepare a TimeTable .
तुम्हांला तुमचा daily homework पूर्ण करता येत नाही किंवा
आधीच्या विषयांची revision करायला वेळ मिळत नाही?
याचे कारण असे कि , तुम्ही तुमच्या वेळेचे योग्य नियोजन करत नाही .
योग्य आणि genuine timetable बनवा,
तुमच्या homework ला वेळ द्या व वर्गात काय शिकवलंय याचं revision करा .
म्हणजे तुम्हांला अभ्यास लक्षात ठेवण्यास मदत होईल .
टीप नं ३. आपल्या भविष्यासाठी त्याची प्रासंगिकता म्हणजेच relevance समजून घ्या.
ज्यावेळी तुम्हांला हे समजेल कि तुमच्या पुढच्या career मध्ये यांचा किती
आणि कसा उपयोग होणार आहे
हे कळेल त्याक्षणी मी तुम्हांला खात्री देते कि तुम्ही ती जबाबदारी म्हणून घ्याल .
तुमच्या उज्ज्वल भविष्याची आणि यशाची !
अनेक विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटते पण तुम्हाला त्याचे महत्त्व माहित आहे का?
हा विषय तुम्हाला वित्त,
वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि मूलभूत विज्ञानातील करिअरचा पाया आहे . .
तसेच, ते तुमचा मेंदू तीक्ष्ण करतो .
विज्ञान विषयाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे कारण तो तुम्हाला दैनंदिन
जीवनातील सर्वात जास्त पैलू, अन्न, ऊर्जा,
औषध, वाहतूक, विश्रांती आणि यासारख्या सर्व गोष्टींशी संबंधित माहिती देतो.
म्हणजेच प्रत्येक विषयाची सुसंगतता
समजून घेणे आणि त्या गोष्टीचा अभ्यास केल्याशिवाय तुमची स्वप्ने पूर्ण करणे
किती कठीण आहे हे समजून
घेतल्याने तुमची आवड आपोआप विकसित होईल.
अभ्यासात रस कसा निर्माण करावा ? Ways to Develop Interest in Studies
टीप नं ४. तुमचे ध्येय निश्चित करा . Set Your Goals.
प्रत्येक मुलं same brain नेच जन्मलेली असतात . पण कालांतराने त्याची
जशी वाढ होते ती त्यांच्या आजूबाजूच्या
अनेक गोष्टींवर अवलंबून असते . म्हणूनच आपले ध्येय ठरवणं आणि ते लिहून
ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे .
तुमची स्वप्न तुमच्या पालकांना आणि भावंडांना सांगा जेणेकरून तुम्हांला
त्यांचा पाठिंबा मिळेल .
टीप नं ५ . अभ्यासात मजा-मस्ती निर्माण करा . Develop Fun in your Studies.
तुम्हांला माहित आहे का अभ्यासापेक्षा एखादी चित्रपट किंवा कार्टून आपण
जास्त वेळेसाठी का बघतो ?
कारण आपण ते मनापासून enjoy करतो . बऱ्याच शाळा , कॉलेजेस मूवी
क्लिप आणि चित्राचा वापर करतात .
तुम्ही हे तुमच्यासाठी देखील वापरू शकता . म्हणजेच एखादा chapter
वाचताना त्यात असलेल्या
अनेक पात्रांना तुम्ही imagine करून , स्वतः एक पात्र , तुमचा मित्र दुसरा
पात्र असं करून गोष्ट लक्षात ठेवू शकता ,
मला खात्री आहे ह्याची तुम्हांला नाक्कीच मजा वाटेल .
टीप नं ६. तुमच्या मनाचा आवाज ऐका . Listen to your voice .
जेव्हा तुम्ही एखादा theoretical विषय वाचायला घेता तेव्हा
तुम्हांला पण झोप येते का ??
कारण आपण आपला आवाज ऐकत नाही. मनातल्या मनात वाचणं
थोडं कंटाळवाणं बनवतं आणि
ते जास्त वेळासाठी आपण लक्षात ठेवू शकत नाही . म्हणून मोठ्याने
वाचण्याचा प्रयत्न करा जेणेकरून
तुम्ही तुमचा आवाज ऐकू शकाल. हे तुम्हांला झोप टाळण्यासाठी आणि
अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करू शकते .
टीप नं ७ . स्वतः स्वतःचे स्पर्धक बना .
तुम्हांला माहित आहे का सचिन तेंडुलकर एकदा त्यांच्या practice ला
उशिरा गेले , तेव्हा त्यांच्या गुरूंनी
त्यांना विचारलं कि आज उशीर का झाला ? तेव्हा ते म्हणाले कि , मी
माझ्या मित्राला त्याच्या स्पर्धेमध्ये
जिंकण्यासाठी cheer करत होतो , हे ऐकून त्यांच्या गुरूंनी त्यांच्या
कानाखाली मारली . आणि एक
सल्ला दिला कि दुसऱ्यांना cheer कारणं चांगलं पण त्यासाठी स्वतःच्या
practice ला जर उशीर होत असेल तर ते मात्र चूक आहे .
स्वतःमध्ये अशी क्षमता विकसित करा की प्रत्येकजण तुमच्यासाठी
टाळ्या वाजवेल. ही त्याच्या यशाच्या
दिशेने एक सुरुवात होती आणि आज आपण त्याचे परिणाम पाहू शकता.
म्हणूनच स्वतःसाठी एक स्पर्धा तयार करा. जर इतर करू शकतात
तर मी का नाही ? असा प्रश्न सतत
स्वतःला विचारात राहा आणि त्यावर काम करा .
टीप नं ८: वास्तववादी ध्येय निश्चित करा.
अभ्यासाची आवड निर्माण करण्यासाठी वास्तववादी उद्दिष्टे निश्चित करणे
ही एक आवश्यक पायरी आहे. स्वत: साठी अल्पकालीन उद्दीष्टे निश्चित करून
प्रारंभ करा आणि ते साध्य आहेत याची खात्री करा. दीर्घकालीन उद्दिष्टांचे
लहान तुकड्यांमध्ये विभाजन केल्यास ते अधिक व्यवस्थापित केले जातील.
जेव्हा आपण प्रत्येक ध्येय पूर्ण करता तेव्हा स्वत: ला एक लहान ट्रीट किंवा
क्रियाकलाप देऊन बक्षीस द्या; यामुळे पुढे शिकण्याची प्रेरणा विकसित
होण्यास मदत होईल. म्हणून, वास्तववादी उद्दिष्टे निश्चित करणे हा आपल्या
अभ्यासात रस विकसित करण्याचा आणि आपल्या शिकण्याच्या उद्दीष्टांवर
लक्ष केंद्रित करण्याचा एक चांगला मार्ग आहे.
टीप नं ९: अभ्यास गटात सामील व्हा.
अभ्यास गटात सामील होणे हा अभ्यासाची आवड विकसित करण्याचा एक
चांगला मार्ग आहे. जेव्हा आपण एखाद्या अभ्यास गटाचा भाग असतो, तेव्हा
आपल्याभोवती समविचारी व्यक्ती असतात जे आपली शिकण्याची आवड
सामायिक करतात. हे वातावरण सहकार्य आणि चर्चेसाठी अनुकूल आहे,
जे आपल्याला सामग्रीची सखोल समज विकसित करण्यात मदत करू शकते.
याव्यतिरिक्त, अभ्यास गट आपल्याला चांगले वेळ व्यवस्थापन कौशल्य
विकसित करण्यात मदत करू शकतात. जेव्हा आपल्याला नियमितपणे
एखाद्या गटाशी भेटावे लागते, तेव्हा आपण वेळापत्रकावर चिकटून
राहण्याची आणि आपले काम वेळेत पूर्ण करण्याची शक्यता असते.
इतरांप्रती असलेली जबाबदारी देखील आपल्याला त्यांना निराश न
करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यास प्रेरित करेल.
टीप नं १०: प्रश्न विचारा.
शेवटी, प्रश्न विचारण्यास घाबरू नका. योग्य प्रश्न विचारल्यास एखाद्या
विषयाची आपली समज विकसित होण्यास मदत होते. आपण माहितीचे
विश्लेषण आणि मूल्यांकन करण्यास शिकत असताना हे आपले महत्त्वपूर्ण
विचार कौशल्य विकसित करण्यास देखील मदत करते.
आपल्याला एखाद्या विशिष्ट संकल्पनेत अडचण असल्यास, मदतीसाठी मोकळे व्हा.
मदतीसाठी आपल्या शिक्षकांना किंवा प्राध्यापकांना विचारा किंवा चर्चा
मंचात सामील व्हा जिथे आपण इतर विद्यार्थ्यांकडून उत्तरे मिळवू शकता.
असे केल्याने तुमची अभ्यासाची आवड वाढण्यास मदत होईल आणि
अधिक गुंतागुंतीचे विषय हाताळण्याचा आत्मविश्वास मिळेल.
ह्या सगळ्या टिप्स वापरून तुम्हांला तुमच्या अभ्यासात नक्कीच रस
निर्माण होईल आणि अभ्यास
करताना फार कंटाळादेखील येणार नाही .
असाच वेगळ्या विषयांवर टिप्स हव्या असतील तर तुम्ही आम्हांला ते कंमेंट्सद्वारे सांगू शकता .
Also Read:
Also Read: Tips to Make Study Notes for Exams – मराठी BlogWali % % (marathiblogwali.in)
Also Read: How to Develop Interest in Study – Tips for Students & Parents (studyandexam.com)