You are currently viewing भक्ती | Devotional Article | The Meaning of Bhakti
भक्ती | Devotional Article

भक्ती | Devotional Article | The Meaning of Bhakti

The Meaning of Bhakti | खरंच देव असतो का ?

कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात हि गणपती बापाच्या

आशीर्वादाने व्हावी , हा एकमेव उद्देश

आणि हेतू हा लेख प्रथम पोस्ट करण्यामागे ….भक्ती !!

भक्ती म्हटलं कि माझ्या डोळ्यासमोर येतो तो माझा लाडका गणपती बाप्पा ! 

      अर्थात प्रत्येकाची भक्ती ची व्याख्या वेग-वेगळी आहे . देव ,ईश्वर ,

अल्लाह , प्रार्थना ,नमाज ,

इत्यादी नावं आणि पद्धती !  देव मानणं न मानणं किंवा श्रद्धा असणं

न असणं हे प्रत्येक

व्यक्तीच्या विचारांवर आणि मानण्यावर आहे . माझं म्हणाल तर देवावर

श्रद्धा आणि भक्ती माझी आहे

आणि जसं मी आधी म्हटलं तसं भक्ती म्हटलं कि माझ्या डोळ्यासमोर

येतो तो लाडका जिवाभावाचा “बाप्पा “!

त्याचं मनमोहक आणि साजिरं  रूप डोळ्यात साठवून ठेवू तितकं कमीच आहे.

प्रत्येक शुभकार्याच्या सुरुवातीस आधी गणरायाला वंदन करूनच मग

पुढे काम करण्यास सुरुवात होते .

६४ कलेचा अधिपती ,बुद्धीची देवता , संकट -विघ्न दूर  करणारा

विघ्नहर्ता अशी त्याची ओळख ! 

अर्थात प्रत्येकाचा देव वेगळा आणि त्याला पुजण्याच्या पद्धती देखील

तितक्याच वेगळ्या आहेत .

The Meaning of Bhakti

आपण बऱ्याचदा ऐकलंय कि देव तुम्ही माणसात शोधा ,दगडाच्या

निर्जीव मूर्तीत देवाला पाहणं किती योग्य आहे .

आणि ते काही चुकीचं नाहीये  ,कारण ह्या लॉकडाउनच्या काळात

देव देव्हाऱ्यात नसून तो

रस्त्यावर पोलीस कर्मचारी ,सफाई कामगार , हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स,

नर्स ,वॉर्डबॉय च्या रूपात ,

तर एकमेकांना सहकार्य करणाऱ्या माणसांमध्येच देव आहे आणि तो

दिसलाय असं आपण म्हणूच शकतो . 

पण जरी मूर्ती दगडाची असली तरी त्याचं रूप ,सौंदर्य हे वेग-वेगळं आहे . 

आणि श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी . कारण देवाच्या नावाखाली

अनेक भोंदूगिरी आणि

अनेक प्रथा खपवल्या जातात हे अपल्याला माहीतच आहे . पण ह्या

सगळ्यावर कितपत विश्वास

आणि श्रद्धा ठेवावी हे मात्र आपल्याच हातात आहे . 

                संत तुकाराम महाराज एका अभंगात असं म्हणतात की ,

“ग्रंथ”  समजल्याशिवाय

“संत” समजणार नाही आणि “संत” समजल्याशिवाय “भगवंत ”

समजणार नाही . त्यामुळे ग्रंथ

किंवा असं धार्मिक काहीतरी वाचायला हवं जेणेकरून आपल्याला

भगवंत समजायला सोपं होईल . 

आपल्या महाराष्ट्राला संतभूमीचा लाभलेला वारसा फार मोठा आणि

अवर्णनीय आहे . 

 संत म्हणजे निस्वार्थ मनाने कोणतीही अपेक्षा न ठेवता देवासाठी

केलेली प्रार्थना ,तसेच

आपला उद्देश स्पष्ट ठेवून समाजाची मदत करणारी

एक जबाबदार व्यक्ती ! आणि

  संतांचं भक्तीस्थान म्हणजे पंढरीचा पांडुरंग हरी आणि

विठ्ठलभक्ती हेच  जीवनाचं सार . 

आपल्या महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले .  संत ज्ञानेश्वर

,संत तुकाराम , संत जनाबाई,संत बहिणाबाई

,संत मुक्ताई संत गोरा कुंभार ,संत सावतामाळी ,संत चोखामेळा ,

नामदेव महाराज,आधुनिक

संत रामदास स्वामी ,तुकडोजी महाराज ,गाडगे महाराज ,

गगनगिरी महाराज ,गजानन महाराज इत्यादी

तसेच सध्याचे वामनराव पै ,दयानंद सरस्वती असे अनेक संतांनी

समाजात असलेल्या अनेक अनिष्ठ प्रथा ,

तसेच जातीभेद ,वर्णभेद ,अस्पृश्यता याला कडाडून विरोध केला व

समाजप्रबोधनाचे कार्य केले . 

म्हणजे काय तर भक्ती करण्याचा मार्ग प्रत्येकाचा जरी वेग-वेगळा

असला तरी ,यातून मिळते

ती मानसिक शांतता आणि समाधान . 

     भक्ती हि मग आपल्या देशावर असणारी सुद्धा असते .

ज्याला आपण “देशभक्ती” म्हणतो .

पण नुसतीच बोलून न दाखवता वेळप्रसंगी देशासाठी योगदान देणं ,

ती खरी भक्ती ठरेल असं मला वाटत . 

जेव्हा आपण मनापासून एखाद्या शक्तीची पूजा करतो तेव्हा त्या शक्तीचा

थोडा तरी अंश आपल्यात समाविष्ट होत असतो. 

स्त्री चं महत्त्व अनन्यसाधारणाचं ! मग ते देवी – देवतांच्या काळातील

असो किंवा आता ! 

 The Meaning of Bhakti

शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया,किंवा

जगदंबा म्हणून गौरविले होते .

ह्या शक्तीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे आपणांस ज्ञात आहेतच,

त्यात उमा, गौरी, जगदंब,पार्वती,

ही देवीच्या सौम्य रूपांची नावे असून चंडी, भैरवी, दुर्गा, काली,

चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत . 

आपण नवरात्रीत नऊ शक्तींची पूजा करतो . 

प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।

तृतीयं चंद्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।

पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीतिच ।

सप्तमं कालरात्रिश्च, महागौरीतिचाष्टमम् ।।

नवमं सिद्धिदां प्रोक्ता, नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।

उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।

भक्ती हि वेग -वेगळ्या पद्धतीने अगदी मनापासून केली तर

नक्कीच मनास समाधान मिळेल . 

भक्ती हा विषय मुद्दामुन ह्यासाठी निवडावा वाटला कारण

बऱ्याचदा भक्तीच्या नावाखाली

लोकं खूप अंधश्रद्धा मनात ठेवतात ,आणि काही चुकीचे गैरसमज

असतात अर्थात प्रत्येकाचे विचार

वेगळे असल्याने आपण ते काही बदलू शकत नाही पण जो कोणी

हा लेख वाचेल त्याला मानसिक

समाधान नक्कीच मिळेल .

Ganpati Bappa Morya!!

हिंदू धर्म आणि भक्ती परंपरा: The Meaning of Bhakti

भक्ती, हिंदू धर्मात, भक्ताच्या वैयक्तिक देवाबद्दल आणि देवाबद्दल च्या

परस्पर तीव्र भावनिक आसक्ती आणि प्रेमावर जोर देणारी एक चळवळ

आहे. भगवद्गीते या हिंदू धर्मग्रंथानुसार भक्तीमार्ग किंवा भक्तीमार्ग हा

ज्ञानमार्ग (ज्ञानमार्ग) आणि कर्ममार्ग या इतर

दोन धार्मिक दृष्टिकोनांपेक्षा श्रेष्ठ आहे.

हिंदू धर्मातील प्रत्येक प्रमुख दैवत- विष्णू, शिव आणि देवीच्या विविध

रूपांची भक्ती परंपरा वेगळी आहे. विष्णूभक्ती ही विष्णूच्या अवतारांवर

(अवतारांवर) आधारित आहे, विशेषत: कृष्ण आणि राम. शिवाची भक्ती

पृथ्वीवरील त्याच्या वारंवार प्रकटीकरणाशी संबंधित आहे – ज्यात तो कोणीही,

अगदी आदिवासी शिकारी, दलित (पूर्वी अस्पृश्य म्हणून ओळखला जात होता)

किंवा मुसलमान म्हणून दिसू शकतो. देवींची भक्ती अधिक प्रादेशिक आणि

स्थानिक असते, जी मंदिरांमध्ये आणि दुर्गा, काली, शीतला (चेचकची देवी),

लक्ष्मी (सौभाग्याची देवी) आणि इतर बर्याच लोकांना समर्पित सणांमध्ये व्यक्त होते.

आणि भक्ती म्हणजे काय हेदेखील कळायला सोप्प पडेल . 

नंतरच्या वैदिक काळात वैदिक कर्मकांडांचे आंतरिकीकरण आणि

योगसाधना म्हणून तिचा उदय झाल्याने भक्ती चळवळ भारतात उदयास

आली. प्रतीकात्मकदृष्ट्या हे वैदिक कर्मकांडांशी खोलवर संबंधित आहे

आणि निसर्गाच्या बंधनातून सुटण्याचे साधन म्हणून प्राणी आणि मानवी

बळी आणि आत्म-मृत्यूची तपस्वी साधना देखील असू शकते. अशा प्रकारे

भक्ती (भक्ती) ही भगवंताला अर्पण केलेली अर्पण आहे. देवाची दया किंवा

कृपा (प्रसादम) म्हणजे या यज्ञाचे किंवा अर्पणाचे उरलेले किंवा फळ होय.

यज्ञाचे अवशेष किंवा यज्ञातून शिल्लक राहिलेले अन्न उपासकांमध्ये पुन्हा

वाटण्याची प्रथा आहे. याला प्रसाद किंवा देवाची कृपा म्हणून ओळखले जाते,

देवाच्या कृपेने स्पर्श आणि शुद्ध होणारे अन्न. जो कोणी ते खातो तो पापांपासून शुद्ध होतो.

अशा प्रकारे भक्ती ही अर्पण करण्याची एक यज्ञक्रिया आहे ज्यामध्ये आपण

स्वत: ला किंवा आपल्याकडे जे आहे ते यज्ञसामग्री किंवा अन्न म्हणून

अर्पण करून देवाची कृपा मिळवता.

आपल्या सर्वाना गणपती बाप्पा म्हटलं कि माझ्या डोळ्यासमोर येतं ते

त्याचं मनमोहक आणि साजिरं रूप ! गणपती हा भगवान शिव आणि देवी

पार्वतीचा पुत्र आहे. तो मनुष्य, हत्ती, उंदीर आणि साप या चार प्राण्यांचा

संगम मानला जातो. त्याचे वाहन उंदीर आहे. त्याला चार हात, मोठं पोट

आणि हत्तीचा चेहरा आहे. त्यांच्या हातात दोरी (उपासकांना सत्याकडे नेण्यासाठी),

कुऱ्हाड (भक्तांना चुकीची आसक्ती कापण्यासाठी) आणि लाडू

(भक्तांना बक्षीस देण्यासाठी) असतात. प्रत्येक शुभकार्याच्या सुरुवातीस

आधी गणरायाला वंदन करूनच मग पुढे काम करण्यास सुरुवात होते .

गणेशाचा जन्म: The Meaning of Bhakti

६४ कलेचा अधिपती ,बुद्धीची देवता , संकट -विघ्न दूर  करणारा विघ्नहर्ता

अशी त्याची ओळख ! परंतु ह्या गणेशाचा जन्म नेमका कसा झाला हे तुम्हाला माहित आहे ?

देवी पार्वतीला स्नान करायचे होते. तिला प्रवेशद्वारावर पहारा देणारे कोणीतरी

हवे होते आणि अंघोळ संपेपर्यंत कोणालाही आत जाऊ द्यायचे नाही. त्यामुळे

तिने चंदनाचा लेप अंगावर घेतला आणि मुलाचे रूप निर्माण केले आणि त्यात

प्राण ओतले. तिने त्या मुलाला (त्याच्या मुलाला) सांगितले की, तिच्यासाठी

पहारा द्या आणि कोणालाही आत जाऊ देऊ नका. काही वेळाने भगवान

शिव परत आले आणि त्यांनी त्या मुलाला पाहिले. तो मुलगा आपला च आहे

हे त्याला माहित नव्हते. मुलाने त्याला आत जाण्यास नकार दिला ज्यामुळे

शिव संतापला. त्यामुळे रागाच्या भरात त्याने मुलाचे डोके कापले.  पार्वती

अंघोळ करून बाहेर आली तेव्हा आपल्या पुत्राचा मस्तकविरहित देह पाहून

ती घाबरली आणि रागाने भरून आली. आपल्या मुलाला पुन्हा जिवंत न

केल्यास संपूर्ण सृष्टी नष्ट करू, अशी धमकी तिने दिली. म्हणून शिवाने नंदी

या बैलाला जाऊन त्याला दिसणाऱ्या पहिल्या प्राण्याचे डोके घेऊन येण्यास

सांगितले. त्याच्या शोधात नंदी प्रथम एका हत्तीवर आला आणि त्याचे मस्तक

शिवाकडे आणले आणि नंतर तो आपल्या मुलाच्या शरीरात सामील झाला.

त्याने त्याचे नाव गणपती (सर्व गणांचे स्वामी) ठेवले आणि कोणत्याही

प्रारंभापूर्वी त्याची प्रथम पूजा केली जाईल असे वरदान दिले.

गणपती बाप्पा मोरया  🙏 मंगलमूर्ती मोरया 🌼 

Also Read: Interesting Hindu Mythology Stories – TemplePurohit – Your Spiritual Destination | Bhakti, Shraddha Aur Ashirwad

Also Read: Mangalagaur Song Full Lyrics Baipan Bhari Deva – मराठी BlogWali (marathiblogwali.in)

Bhakti | Hinduism, Devotion & Rituals | Britannica

The True Meaning of Bhakti or Devotion | Sanskriti – Hinduism and Indian Culture Website (sanskritimagazine.com)

ganpati bappa

अस्वीकरण (Disclaimer) :
या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची

पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत मराठी ब्लॉगवली कोणतीही हमी देत ​​नाही.

अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

This Post Has 3 Comments

Leave a Reply