सोसल तेवढंच सोशल | Pros & Cons of Using social media
सोशल मिडिया म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येत ते
फेसबुक (Facebook) ,ट्विटर (Twitter) ,इंस्टाग्राम (Instagram) ,
जी-मेल (Gmail) ,हँग आऊट ,स्नॅपचॅट (Snap-Chat) आणि बरेच अँप ..
अर्थात हे जरी अँप असले तरी हेच आताच्या तरुणपिढीचे आणि इतर
वयोगटातील लोकांचे अविभाज्य घटक बनले आहेत . सोशल मीडियामुळे
अनेक जण मग ते जगाच्या पाठीवर कुठेही असले तरीही संपर्क होऊ लागलाय .
मग कुठलातरी यु.एस ,लंडन , नूझीलँड ,पॅरिस ,दुबईमध्ये राहणारे
काका,मामा,आत्या बोटाच्या एका क्लीकवर आले , तो/ती सध्या काय
करतात हे त्यांनी अपलोड केलेल्या स्टेट्स ,फोटोज अरुण कळणं
सहज शक्य झालंय . पण ह्यामुळे अनेक दूर असणारी माणसं जसे
जोडली गेली तसंच ह्याचा गैरवापरदेखील दिवसेंदिवस वाढला .
काहीवेळा अचानक एखादी अफवा वाऱ्यासारखी फेसबुक आणि
ट्विटरच्या माध्यमातून पसरते ,त्यावर मग शेकडोंच्या संख्येने प्रतिक्रियाही
पडतात आणि कोणतीही पूर्ण माहित नसताना अनेकजण स्वतःची मतं
मांडून मोकळी होतात ,मतं मांडणं हि काय चुकीची गोष्ट नाही पण
दुसऱ्यावर उगाच टीका करणं , समोरच्याची खिल्ली उडवणं किंवा
त्यांच्या वैयक्तिक आयुष्यवर बोलणं हे योग्य नाही . काही तर नेते मंडळी,
सेलिब्रिटी यांना लक्ष करून त्यांच्यावर टीका करतात ,यामुळे होत काय ,
एकत्र त्या व्यक्तीची वाह वाह होते नाहीतर मग बदनामी ,अन बरयाचदा
इतकं वाईट आणि घाणेरडं बोललं जात ,हि ह्या सगळ्याकडे नक्की कशा
पद्दतीने बघायचं हेच कळणं मुश्किल होऊन जात . अभिव्यक्ती स्वतंत्र ,
लोकशाही आहे म्हणून सोशल मीडियाचा इतका चुकीचा वापर करू
लहानपणापासून एक म्हण आपण नेहमीच ऐकतो , “अति तेथे माती ” !
आज सोशल मीडियाची अवस्था तशीच काहीशी झालीये . योग्य वापर केला
तर सोन्याहून पिवळं असा असणारा सोशल मीडिया आज अतिवापरामुळे
अर्थहीन झालाय कि काय अशी शंका येते . आज प्रत्येक वयोगटातील
मंडळी व्हाट्स अँप ,फेसबुक ,इंस्टाग्राम वर तासां-तास रेंगाळली दिसतात ,
अर्थात ह्यात मी पण आहेच पण मला माहित आहेत ,कशाचा वापर कुठे
आणि किती करावा .
या साइट्सवर जेवलीस का ? काय करतेस ? आज इकडे गेलेलो ,
उद्या तिकडे जाणार आहे ,आज हे खाल्लं ,आज नवीन शूज घेतले
अशा छोट्या आणि निरर्थक गप्पा मारून लोकं स्वतःचा तर वेळ वाया
घालवतातच आणि इतरांचाही वेळ त्यामुळे जातो . अर्थात समोरच्याला
त्याची ख्याली-खुशाली विचारणं चुकीचं नाही पण रोज -रोज तेच प्रश्न
आणि सगळं तेच विचारून कंटाळा कसा येत नाही ?हाच मोठा प्रश्न आहे .
वेळ हा वाहत्या पाण्यासारखा आहे ,एकदा निसटून गेला कि परत येत नाही .
सोशल मीडियावर वावरणं हे आजकालच्या पिढीचं जणू ध्येयच झालं आहे .
त्यामुळे अनेकजण चुकीच्या पाशात अडकले जातात .
म्हणजेच सोशल मिडीयाचा वापर करून ब्लॅकमेल करणं ,
अकाउंट हॅक करणं ,अर्थात सायबर क्राईम हे प्रकार हल्ली
खूप वाढलेले दिसतात . ह्या सगळ्यावर आळा घालणं आवश्यक आहे .
आणि आपणदेखील एक जबाबदार नागरिक
म्हणून योग्य तसा वापर करायला हवा .
आता बर ,फक्त सोशल मीडियाचा गैरवापरच होतोय
असं नाही त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी देखील केला जातोय ,
जस दूरवरची माणसं ह्याने जोडली गेलीत तसंच सोशल मीडिया
समाजात जनजागृतीचं करण्याचं काम ,समाजाबद्दलची कर्तव्यदक्षता
दर्शविण्याची काम ह्याद्वारे केली जातेय . अनेक सामाजिक आणि
शैक्षणिक संस्था ,एनजीओ ह्या सोशल मीडियाद्वारे कनेक्टेड आहेत .
आपण त्यांच्याशी सहजरित्या संपर्क साधू शकतोय आणि त्यांना
मदत करू शकतोय . प्रोडक्ट मार्केटिंगला देखील यामुळे
वाव मिळत आहे . सोशल मिडीयावर दिशाभूल करणाऱ्यांची
काही कमी नाही पण प्रत्येकाने आपण जन्माला आलोय तर
ह्या देशाला काहीतरी देणं लागतो असा विचार करून
सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी केला तर
अधिक बरं होईल असं मला वाटत .
Instagram reels आणि youtube shorts आणि पबजी हे महाभयंकर रोग !
होय ,माझ्यासाठी हे नुसतेच Entertaining आणि Gaming अँप नाहीत ,
हे आजच्या सर्वच वयोगटातील मी मुद्दाम सर्वच म्हणतेय कारण नेहमीच
तरुणपिढी ,प्रौढ असं म्हणून आपण चुका करतो . सर्व वयोगटातील लोकांना
जडलेली व्याधी आहे . किंवा आपण व्यसनदेखील म्हणू शकतो .
Instagram reels आणि youtube shorts ,हे खरंतर होत एक
मनोरंजनात्मक अँप ! पण ज्याप्रकारे त्याचा सध्या सर्रास वापर केला
जातोय ,वापर करणं चुकीचं मुळीच नाही ,पण किती आणि कशासाठी
करावा हेदेखील कळायला हवं ना ? सकाळी उठल्यापासून आता ब्रश
करतोय त्याचा व्हिडियो ,दुपारी जेवतोय ,आज इकडे गेलो त्याचा व्हिडियो ,
एखाद्या चित्रपटाचा एक डायलॉग घेऊन फक्त मूर्खासारखं तोंड हलवणं
(lipsink) आज गर्लफ्रेंड ने ब्रेकअप केला ,अनेक वैयक्तिक गोष्टींचे vlogs,
ह्याव नि त्याव ..
स्वतःलाच त्या मोबाईलच्या फ्रंट कॅमेऱ्यात बघून एकट्यानेच तोंडाचे
वेडे-वाकडे चाले करणे आणि मग ते अपलोड करणे आणि इतरांनी ते
बघणे हा ट्रेंड झालाय . मग त्यावर हजारो,लाखो Views,Likes,Comments
मिळवणे हे ध्येय झालंय . आणि मग इथे स्पर्धा पण सुरु होते ,कोणाचे
किती Followers आणि कोणाचा व्हिडीओ Trendingला कोणाला
कितीLikes वैगरे ,वैगरे .. अनेकजण एकमेकांच्या चढाओढीने अगदी
काहीही करण्यास तयार होतात . आणि यामुळे अनेक हाणामाऱ्या झालेल्या
आहेत हे मी ऐकलंय . म्हणजे माणूस एखाद्या अँपच्या आहारी इतका गेलाय
कि ,माणसात राहणंच विसरलाय . महागड्या गाड्यांसमोर ,रोज नव-नवीन
डिझायनर कपडे घालून ,नको तेवढा मेकअप करून फोटो काढणे
आणि त्या टिकटॉकवर दिवसाला १०-१० व्हिडीओ अपलोड करत बसणे
हेच ध्येय होऊन गेलंय . म्हणजे आयुष्यात दुसरं करण्यासारखं काही
उरलंच नाही . अनेक मुलं-मुली अभ्यास हा प्रकार असतो हेच विसरली .
लहानतला लहान मुलं ते मोठ्यातली मोठी माणसं ह्याच्या जाळ्यात
इतकी अडकलीयेत कि कांही सांगून उपाय नाही .
सेलेब्रिटी आपण टेलिव्हिजन ,चित्रपटात ,हल्ली नवीन आलेल्या वेब
सिरीज ह्यात असणाऱ्या आणि अभिनय करणाऱ्या नटाला म्हणायचो .
पण ह्या reels वर व्हिडीओ करणारी काही मंडळी सेलिब्रिटी झाली ,
म्हणजे बरीचशी मूळ त्यांना फॉलो करतात आणि त्यांच्या मागे सतत
फिरताना दिसतात . स्वतःला सोशल मीडिया ()म्हणवून घेणारी हि
लोकं अनेक ब्रॅण्डच्या जाहिराती करून पैसे कमवतात . मला हेच
कळत नाही , एखाद्या चित्रपटाचा एक डायलॉग घेऊन फक्त मूर्खासारखं
तोंड हलवणं (lipsing) ह्याला “अभिनय” म्हणतात का हो ? एखाद्या
नटाची नक्कल करणं वेगळं आणि हे reels वर जे करतात ते वेगळं .
reelsवर जे व्हिडीओ टाकून तुम्हांला अभिनय छान येतोय असं वाटतं
असेल तर तुम्ही खूपच चुकीचे आहात . अभिनय हा विषय खूप खोल
आहे , अभिनयासाठी तुमच्याकडे अनेक प्रकारची कौशल्ये असण्याची
गरज असते. जसे की, आवाजाची फेक, स्पष्ट उच्चार, देहबोली, भावनीक
आरेखन, उत्कृष्ठ कल्पनाशक्ती, आणि नाट्य (नाट्य स्वरूपात कल्पना)
सादर करण्याची क्षमता. हा विषय वेगळा जरी असला तरी ह्या विषयाशी
संबंधितच आहे .
पबजी PUBG हा शब्द रोज दिवसातून एकदातरी कानावर पडतो , आणि
हो ह्यात मी नक्कीच म्हणू शकते कि तरुणपिढी ह्या गेमच्या विळख्यात
अडकली गेलीये . गेम खेळणं हे देखील माणसाच्या मोरंजनासाठी असतात .
फावल्या वेळात काय करावं ?तर चला गेम खेळू .. हे असतंच , पण पबजी
ह्या गेम च्या बाबतीत याचं चित्र वेगळं आहे .
पबजी चा Fullform काय ?ह्या गेममध्ये नक्की आहे काय ?का एवढी
तरुणपिढी ह्या गेमकडे आकर्षिली गेलीये ? इत्यादी प्रश्न मला नेहमीच
पडतात ,आणि मी Google वर माहिती शोधण्याचा प्रयत्न केला . तर पबजी म्हणजे
PlayerUnknown’s Battlegrounds (PUBG) नावाप्रमाणेच Unknown
Battelground म्हणजे अनोळखी व्यक्तींशी युद्ध स्पर्धा ! हे गेमिंग अँप
बनवलं कोणी ? PUBG is an online multiplayer battle royale
game developed and published by PUBG Corporation, a
subsidiary of South Korean video game company Bluehole.
आणि आज PUBG Mobile has crossed 200 million downloads and
has achieved over 30 million daily active users.
ह्या खेळात नक्की काय करतात ? गेममध्ये, शंभर पर्यंत खेळाडूंनी बेटावर
पॅराशूट केले आणि स्वत: ला मारण्याचे टाळताना इतरांना ठार मारण्यासाठी
शस्त्रे व उपकरणे शोधून काढली. खेळाच्या नकाशाचे उपलब्ध सुरक्षित
क्षेत्र काळानुसार आकारात कमी होते, हयात असलेल्या खेळाडूंना
चकमकीच्या ठिकाणी भाग घेण्यास कडक भागात निर्देशित करते.
शेवटचा खेळाडू किंवा संघ उभे राहून फेरी जिंकतो आणि मग त्याला मिळतो
“चिकन डिनर ” ! “ Winner Winner Chicken Dinner“ !
अर्थात हा चिकन डिनर त्यांना काय खरोखर नाही मिळत पण
त्यासाठी धडपड जिवाच्या आकांताने केली जाते . घरात एक कोपरा
पकडून बसायचा आणि गेम चालू करून कोसावर दूर असणाऱ्या
त्या दुसऱ्या खेळाडूंशी बोलत बसणं , मागे नको येऊ,त्याला पकड,
ह्याला मारा , flare gun,bot,shoot,army etc etc असे एक ना अनेक
शब्द ते तर बोलतातच पण त्यांच्या बाजूला असणाऱ्या व्यक्तीच्या
कानावर पण पडतात . कधीकधी तर इकडे बसलेली व्यक्ती अशी
ओरडून त्या पलीकडच्या व्यक्तीला बोलते ,कि त्या व्यक्तीला आवाज
जावो न जावो हि गोष्ट नंतरची पण सध्या त्या व्यक्तीच्या बाजूला असणारी
व्यक्तीच इतकी घाबरते कि काय ,काय झालं ? हे विचारत बसते .
हे आमच्या घरातदेखील होत आणि म्हणूनच लिहतेय . बरं , हा गेम
फक्त मुलंच खेळतात असं नाही ,सर्वच क्षेत्रात स्त्रिया पुढे आहेत नाही का ?
मग ह्यात तरी मागे कश्या राहतील . मुलींची हा गेम खेंळण्याची संख्या
बऱ्याच प्रमाणात आहे . अर्ध्याहून अधिक लोकांना पबजी ह्या गेमचा
फुलफॉर्म च माहित नसावा पण खेंळण्यात मात्र एक्स्पर्ट !
मी तर सरळ सरळ म्हणेन कि हा आतंकवाद्यांच्या मानसिकतेचा
खेळ आहे . दुसऱ्याला मारण्यात कसला अघोरी आनंद मिळतो ,देव
जाणो पण हे हल्ली गेममुळे खऱ्या आयुष्यातही होऊ लागलंय .
काही तर गेम इतक्या गंभीरतेने खेळतात कि त्यातली हार सहन न
होऊन आत्महत्यादेखील करतात आणि अशा एक नाही बऱ्याच
केसेस भारतात झाल्यात . म्हणजे गेम इतका आपल्या जिवापेक्षा
महत्त्वाचा आहे ? हा प्रश्न पडतो . आता राहता राहिला प्रश्न हे ऍप्स
कोणी आणि कोणत्या देशाने तयार केलेत . दोन्ही ऍप्सचे मालक
किंवा कर्तेधर्ते म्हणूयात ते म्हणजे “चीन” !
ज्या कोरोना चा फ़ैलाव चीनमधून झाल्यावर सगळंच जग चीनला
शिव्या देण्यात ,आणि वाईटसाईट बोलण्यात व्यस्त आहेत .
पण ह्याने काय होईल ? करायचंच आहे तर जे तुम्ही वापरताय त्याची
माहिती घेऊन त्याचाच वापर थांबवला तर जिथून ते तयार झालेत त्यांची
अर्थव्यवस्था थोडी का होईना ढासळेल , पण हे आम्हांला कळणार कधी ?
आणि कळलं जरी तरी आम्ही त्याप्रकारे वागू का ? नाही, हे केलं तर मग
आमचं कसं होईल हा प्रश्न आहेच .
इतरांसाठी हे Gaming ,video sharing असले तरी माझ्यासाठी तो
माणसाला झालेला एक प्रकराचा रोग आहे ,किंवा मी त्याला दुसरं नाव
देईन “व्यसन” ! जे सुटणं अशक्य आहे जोपर्यंत प्रत्येकजण स्वतःहून
सोडवण्याचं प्रयत्न करीत नाही .
मी इतका मोठा लेख ह्यामुळेच लिहू शकले कारण मी स्वतः हे वापरत
नाही आणि पुढे चुकुनपण वापरणार नाही . जरी वरवर सगळं सरळ
आणि साधं अअसलं तरी ते नाहीये ,याची गंभीरता जाणून घेणं ह्या
appsच्या विळख्यात अडकलेल्या लोकांना येईल हे थोडं अवघडंच !!
म्हणजे हे जे social आणि gaming app च्या जगात अनेक लोकं
कशी बुडाली आहेत याचा प्रत्यय येतो. आणि त्यामुळे अनेकांवर
मानसिक परिणाम होत आहे.
नाण्याच्या दोन बाजूप्रमाणे सोशल मिडिया आहे ,जसा त्याचा
वापर चांगल्या कामासाठी होतोय ,तसा त्याचा गैरवापरही वाढतोय .
त्यामुळे वापर करावा पण त्याला काहीतरी मर्यादा हवीच .
म्हणूनच “सोसलं तेवढंच सोशल ” !
जर हा तुम्हांला लेख आवडला असल्यास नक्की तुमच्या मित्र- मैत्रिणींना share करा.
धन्यवाद !
Also Read: यशस्वी लोकांच्या सवयी । Habits of Successful People in Marathi – मराठी BlogWali (marathiblogwali.in)