बोर्डाचा पेपर लिहिताना ह्या ५ चुका करू नका | Mistakes to Avoid while Writing Board Exam.
तुमच्या परीक्षा चालू असतील आणि तुम्ही अनेक व्हिडीओ Youtube वर
पाहत असाल ज्यात तुम्हाला कसा अभ्यास करायचा , जास्त मार्क्स कसे
मिळवायचे याच्या अनेक टिप्स सांगतात आणि तुम्हांला आता त्या माहित
असतील पण आजच्या ह्या लेखात आम्ही तुम्हांला पेपर लिहताना तुम्ही कोणत्या
चुका करू नयेत याबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्हांला नक्कीच मदत करतील .
कारण बोर्डाचे पेपर लिहताना आपल्या हातून कोणतीच चूक होऊ नये असं
सर्व विद्यार्थ्यांना वाटत पण आपण घाईगडबडीत अनेक चुका करतोच आणि
आपल्याला कळतदेखील नाही कि ती चूक आहे .
बोर्डाचा पेपर लिहिताना ह्या ५ चुका करू नका | Mistakes to Avoid while Writing Board Exam.
टीप १ : हस्ताक्षर || Handwriting
पेपर लवकर लिहण्याचा नादात आपण आपली handwriting कशी येतेय
याकडे लक्ष देत नाही आणि घाईघाईत पेपर लिहून मोकळे होतो . पण
एकदा तुमचा पेपर जो चेक करतोय त्याच्या मानसिकेतेनुसार विचार करून बघा .
म्हणजेच आपलं पेपर कोण तपासतोय हे आपलयाला माहित नसत पण समजा
तुमचा पेपर चेक करायच्या आधी एखाद्या अशा मुलाचा पेपर तो examiner चेक
करत असेल ज्याचा हस्ताक्षर सुंदर , नीट आणि सुटसुटीत असेल त्याला तो छान
मार्क्सदेखील देईल पण त्यानंतर जर तुमचा पेपर आला आणि त्यात तुमचं अक्षर
अतीशय वाईट आणि एकदम जवळजवळ लिहलेलं असेल तर त्या examiner ला
ते बघूनच तुम्हांला मार्क्स द्यायची इच्छा नाही होणार म्हणजेच जितकं उत्तर बरोबर
असणं महत्त्वाचं आहे तसंच तुमची handwriting पण तितकीच महत्त्वाची आहे ,
म्हणून सुंदर आणि नीटनेटका पेपर लिहावा . हस्तलेखन हे एक आवश्यक कौशल्य
आहे. डीएमव्हीमध्ये फॉर्म भरताना प्रत्येक वेळी आपण त्याचा वापर करता, चिकट
नोटवर स्वत: ला स्मरणपत्र लिहिता किंवा वीज पुरवठा खंडित होण्याच्या वेळी
काहीही लिहिता. हस्तलिखित देखील कमी स्पष्ट मार्गांनी उपयुक्त आहे. हाताने
नोट्स लिहिल्यास आपल्याला चांगले शिकण्यास मदत होते. हस्तलिखित
नियतकालिके ठेवल्याने तार्किकदृष्ट्या परिस्थितीचा विचार करणे सोपे होते
आणि आपल्याला स्पष्ट निर्णय घेण्यास मदत होते.
BECAUSE HANDWRITING IS YOUR FIRST IMPRESSION IN FRONT OF EXAMINER.
टीप २ : प्रश्न-उत्तरे क्रमाने लिहण्याचा प्रयत्न न करणे . ||
Not trying to write questions and answers in order.
मित्रांनो , पेपर हातात घेतल्यावर आपण संपूर्ण पेपर बघतो आणि नेमकं
त्या पेपरमधला शेवटच्याच किंवा मधल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर येत असतं
मग त्यावेळी काय करणार ? अशावेळी तुम्ही जर ते उत्तर तुम्हाला योग्य येताच
असेल तर तुम्ही आधी लिहू शकता पण त्यानंतर त्या प्रश्नाच्या पुढच्या क्रमाने उत्तरं
लिहायला सुरु करायची आहेत . कारण जितक्या तुम्ही क्रमाने उत्तरं लिहाल तितकं
तुमचा पेपर तपासात असणाऱ्या व्यक्तीला सोयीचं पडेल आणि जितकी तुम्ही
प्रश-उत्तरांचा क्रम बदलाल तेवढं तुम्हांला आणि examiner ला जास्त वेळ पेपर
चेक करायला लागेल . म्हणून प्रश्न -उत्तरं क्रमाने च लिहा .
बोर्डाचा पेपर लिहिताना ह्या ५ चुका करू नका | Mistakes to Avoid while Writing Board Exam.
टीप ३: अनावश्यक उत्तरे || Unnecessary Answers .
काही मुलांना पेपर भरून दिसावा म्हणून काहीही उत्तरं लिहायची सवय असते
विशेषतः Theory पेपर मध्ये ! म्हणजे उत्तर येत नसेल तरी काहीही आपल्या
मनात येईल ते लिहण हि सवय असते पण तीच चूक आपण करू नये . उगाचच
मोठी उत्तरं दिसावीत म्हणून काहीही लिहू नये . examiner ने खरंचच तुमचं उत्तर
वाचलं तर तुमचे मार्क्स जाण्याची किंवा कमी होण्याची शक्यता असते . म्हणजेच
तुम्हांला प्रश्नांची उत्तरं त्यावर असणाऱ्या मार्कांवर अवलंबून लिहायची आहेत .
कधी कधी प्रश्नपत्रिका आपल्याला अनपेक्षित आणि अदृश्य प्रश्नांनी गोंधळून
टाकते परंतु याचा अर्थ असा नाही की आपण तो प्रश्न सोडून द्याल. आपण
पेपरमधील प्रत्येक प्रश्नाचा प्रयत्न केला पाहिजे कारण कधीकधी परीक्षक
आपल्याला प्रयत्न करण्यासाठी गुण देतो, आपल्याला कधीच माहित नसते,
जर त्याला/ तिला देखील माहित असेल की प्रश्न खरोखर अवघड होते आणि
तरीही विद्यार्थ्याने प्रयत्न केला. शांत आणि एकाग्र राहणे आपल्याला सर्व
प्रश्नांचा प्रयत्न करण्यात देखील मदत करेल कारण आपल्याला आत्मविश्वास
वाटेल ज्यामुळे लक्षात ठेवण्यास मदत होईल.
THE ANSWER’S LENGTH IS DIRECTLY PROPORTIONAL TO THE MARKS OF A QUESTION.
म्हणून अनावश्यक उत्तरं लिहणं टाळा .
बोर्डाचा पेपर लिहिताना ह्या ५ चुका करू नका | Mistakes to Avoid while Writing Board Exam.
टीप ४ : पूर्ण प्रश्न नीट न वाचणे . || Not Reading Questions Properly.
काही मुलं पेपर हातात येताच डायरेक्ट लिहायला सुरु करतात आणि प्रश्न लिहून
झाल्यावर त्यांना समजतं कि ह्याच पूर्ण उत्तर मला येताच नाही मग आता काय ??
म्हणून कधीही पेपर हातात आल्यावर आधी सगळं पेपर वाचून घ्या आणि ज्या प्रश्नच
उत्तर तुम्हाला नक्की येतंय ते लिहायला सुरुवात करा .
मानवी मेंदूला जे पाहायचे आहे ते पाहण्याची सवय असते आणि हे विशेषत:
परीक्षा कक्षाच्या उच्च दाबाच्या वातावरणात खरे आहे. जर आपण एखादा प्रश्न
पुरेसा काळजीपूर्वक वाचला नाही तर आपला मेंदू आपल्याला सहजपणे असा
विचार करण्यास फसवू शकतो की तो प्रश्न आपल्याला काहीतरी विचारत आहे
जो तो नाही – ज्यामुळे आपण एक पूर्णपणे वेगळा निबंध लिहू शकता जो
आपल्याला सेट केलेल्या वास्तविक प्रश्नाचे उत्तर देत नाही. आपण लिहिलेला
निबंध कदाचित उत्कृष्ट असेल – परंतु जर तो खरोखर प्रश्नाचे उत्तर देत नसेल
तर आपल्याला त्यासाठी जास्त गुण मिळणार नाहीत. प्रश्न अतिशय काळजीपूर्वक
वाचा आणि मग पुन्हा वाचा. प्रश्न नेमका काय विचारत आहे हे पूर्णपणे आत्मसात
करण्यात मदत करण्यासाठी, आपण आपल्याला ट्रॅकवर ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण
शब्दांना वर्तुळाकार किंवा अधोरेखित करू शकता – उदाहरणार्थ “तुलना
आणि विरोधाभास” यासारखे निर्देशात्मक शब्द.
टीप ५ : सबमिट करण्यापूर्वी चेक क्रॉस करू नका. ।। Do not Cross Check before Submit.
पेपर लिहिताना पूर्ण वेळ मिळत नाही पण पेपर सबमिट करण्याच्या १० मिनिटं
आधी तुमचा पेपर लिहून झाला पाहिजे उरलेल्या १० मिनिटात तुम्ही क्रॉस चेक करू
शकता पण जेव्हा examiner २ मिनिटे सांगतोय आणि तुम्ही तरीही क्रॉस चेक
करत असाल तर ते चूक आहे म्हणूनच सबमिट करण्यापूर्वी पेपर क्रॉस चेक करू नका .
बोर्डाचा पेपर लिहिताना ह्या ५ चुका करू नका | Mistakes to Avoid while Writing Board Exam.
परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा
मानला जातो. बोर्डाच्या परीक्षेत मिळालेले गुण विद्यार्थ्याची भविष्यातील
वाटचाल निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. बोर्डाच्या
परीक्षांमुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीती आणि तणाव निर्माण
होतो. त्यापैकी काहींना अत्यंत भीती वाटते तर काही तणावग्रस्त राहू
शकतात. वर्षभर परीक्षेच्या तयारीत घालवले असले तरी बोर्डाच्या
परीक्षेच्या दडपणामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा लिहिताना सामान्य चुका होऊ
शकतात. यशासाठी कठोर परिश्रम आणि सखोल तयारी आवश्यक
असली तरी परीक्षा हॉलमधील काही चुका टाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
ह्या ब्लॉगमध्ये दिलेल्या टिप्स नक्की वापरा आणि जर तुम्हांला त्या
उपयोगी पडल्या तर आम्हांला कंमेंट्स द्वारे कळवा.
बोर्डाचा पेपर लिहिताना ह्या ५ चुका टाळल्या तर तुम्ही नक्कीच पूर्ण पेपर वेळेवर
लिहू शकता आणि ह्या टिप्स तुम्हांला उपयोगी आल्या असतील तर आम्हांला कमेंटद्वारे कळवा .
Also Read: 10 mistakes to avoid while preparing for CBSE board exam 2024 – India Today
5 Tips On How To Write Perfect Answers In Board Exams (4ono.com)
Pingback: अभ्यासात रस कसा निर्माण करावा ? Ways to Develop Interest in Studies - मराठी BlogWali
Pingback: बोर्डाचा पेपर कसा लिहावा ?। How to Write in Board Exams? - मराठी BlogWali