You are currently viewing जगण्याचा अर्थ | Meaning of Life | Life Quote
जगण्याचा अर्थ | Quotes on Life

जगण्याचा अर्थ | Meaning of Life | Life Quote

जगण्याचा अर्थ | Meaning of Life | Life Quote

Life Quote Article | जगण्याचा अर्थ |Quotes on Life

खरंतर जीवन एक समीकरण असं मला तरी वाटतं . 

आपण जगण्याचा अर्थ किती सध्याप्रकारे लावतो ना ? 

बालअवस्था , तारुण्य,प्रौढावस्था ,मरण संपलं जीवन ! 

एवढंच असतं  का हो हे आयुष्य ? इतका सध्या सरळपणाने लावलेला 

अर्थ म्हणजे जीवन का ? या जगात यायचं ,नाव कमवायचं ,सतत झटत राहायचं . 

ना व्यव्स्थीत  आराम , ना पोटभर ,ना धड झोप ! फक्त काम ,काम आणि कामचं … 

हल्लीच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला स्वतःकडे पाहायलासुद्धा पुरेसा वेळ 

नसतो इतके आपण सर्व बुडालेलो असतो . इकडे प्रत्येकाला पैसे , नाव ,प्रसिद्धी 

कमवायची असते .आणि नावाचं म्हणाल तर अहो , प्रत्येकाला नाव मिळतचं की ! 

म्हणजे जन्माला आल्यानंतर आई-वडील आपलं बारसं करून ठेवतात नाव .. 

आपल्या प्रत्येकाकडे हे नाव असते पण ह्या नावाचा फारसा उपयोग नाही हे नाव 

तर केवळ व्यक्तीच्या ओळखपत्रासारखं झालं .परंतु खूप कष्ट करून ,मेहनत करून 

स्वतःच्या बळावर ,स्वतःच्या कलेवर मिळवलेलं नाव याला खूप महत्त्व असत .

    काही वेळा मेल्यानंतरही जे नाव प्रसिद्ध असत मग ते फक्त जयंती 

अथवा पुण्यतिथी पुरतचं का नसावं ? पण ते नाव ऐकायला तरी मिळतं , 

त्या नावाला मन-सन्मान असतो .तेच नाव कोणत्या बाजारात खरेदी करून 

मिळत नाही अथवा कोठेही ते विकलं जात नाही . यासाठी घ्यावी लागते ती 

मेहनत ,खूप सारे कष्ट ! हे जीवन एकदाच मिळतं .पण कितीतरी न सुटणारी 

कोडी कोणत्या ना कोणत्याप्रकारे एकमेकांशी जुडलेली असतात .ज्याला

 ती व्यवस्थितपणे सोडवता आली त्याच जीवन सार्थकी लागलं असं म्हणायला

 हरकत नाही . जीवन म्हणजे जगण आणि मरण यातलं अंतर किंवा यातील प्रवास म्हणा ..   

काही माणसं स्वप्नांचा पाठलाग करतात  , आपल्या कृतीतून जगण्याचे 

नियम बनवून यशस्वी होतात .नवीन गोष्ट शिकणं आणि तिचा सराव 

करणं हि साधना आहे ,साधनेत सातत्य हवे . सातत्याने सहजता येते . 

सहजतेतून पारंगतता मग जीवनाचे मुख्य मूल्य बनते . खरंतर “जीवन म्हणजे 

कल्पना आणि वास्तवाचा मेळ “..! आयुष्य हा एक प्रवास आहे ,त्याचे अदृश्य 

परिपूर्ण तत्व समजून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आनंदाचा साक्षात्कार ..

      आता आपण आपल्या पिकनिक च्यावेळी ज्या समुद्रपक्ष्याच्या इतक्या

 प्रेमात पडलो तो म्हणजे “सीगल” ! त्याचं जगणं साधं सरळ पण सामान्य होतं 

आपण आपलं आयुष्य कसं जगावं याचं खूप मोठं सार सांगून जात . त्याच्यासाठी

 उडणं आनंद होता . निर्दोष परिपूर्ण उडणं म्हणजे स्वर्गाचा अनुभव .  

कामात पारंगतता आली कि , मर्यादांच्या शृंखला गाळून -पडतात . 

याकरिता हवेत प्रचंड कष्ट, मेहनतीचा निरंतर ध्यास आणि आत्मबळाची 

साथ आणि हे सगळं घडतं फक्त कृतीच्या वर्तमान क्षणांत . म्हणूनच प्रत्यक्ष

 वर्तमानाचा क्षणच महत्वाचा आहे . आवडीचं काम करणं हेच खार स्वातंत्र आहे . 

यातून हाती येत अंतिम सत्य ! अज्ञानाची भीती दूर सारून नव्या गोष्टी शिकत गेलो 

कि ,जगणं सुंदर बनत जात .

जगण्याचा अर्थ | Meaning of Life | Life Quote

आपलं जीवन जगताना दुसऱ्याला आनंदी ठेवत चला .म्हणजे नकळतपणे 

आपल्या आयुष्यात आनंद येईलच यात काही शंका नाही. सद्यस्थिती बघता 

स्पर्धा ,मग ती कोणत्याही क्षेत्रातील असो वाढलेली आहे ,अश्या ह्या स्पर्धेच्या

 युगात आपला कितपत निभाव लागतोय हेसुद्धा पाहण गरजेचं ठरत. पुढे 

आपल्या  आयुष्यात कितीतरी कठीण प्रसंग येतील पण खचून न जात त्या 

प्रसंगांना खंबीरपणे सामोरे जाऊन त्यावर मात करून पुढे जाण्याची क्षमता आपली असली पाहिजे .

मनाला भावलेली एक सुंदर गोष्ट…

आता कमीपणा घेण्यातच सुख वाटतं. ‘ माझं चुकलं बोलून शांतपणे हसत

 माघारी फिरण्यात आनंद वाटतो. कुणाशी वाद घालत बसण्यात मजाच उरली नाही. 

पहिल्यासारखं, भले हरलो तरी चालेल पण एकाच विषयावर तोंडाला फेस येईपर्यंत 

तासनतास चर्चा आता करू वाटतं नाही. आपलं म्हणणं समोरच्याला पटवून देण्यापेक्षा

दोन पावलं मागे येण्यात शहाणपणा वाटतो. लोकं आपल्याला चुकीचं समजतील याचंही काहीच वाटतं नाही.

चूक बरोबर च्या पलीकडे पण एक जग असतं, जिथं फक्त शांतता असते. आधी 

दुनिया खूप पुढे चाललीये, लोकं फार वेगाने धावत आहेत, आपण या सगळ्यात

मागे राहू याची भीती वाटायची, टेन्शन यायचं, पण आता सावकाश चालणंच

 योग्य वाटतं. कदाचित दुनियेच्या मागे राहूनच दुनिया चांगल्या प्रकारे बघता 

येऊ शकते. आता पुढे जाणाऱ्याला वाट करून द्यायची आणि आपण आपलं

 कडेच्या साइड पट्टीवर निवांत चालत राहायचं. वाटेत सुख दुःख मिळतील.

हसायचं, रडायचं आणि चालत राहायचं..

जगण्याचा अर्थ | Meaning of Life | Life Quote

आकाश पेलताना – गोविंद पायनाईक

आकाश पेलताना हे मागे नाही सरायचे ,

तोडीत वार समोरचे तुला पुढे रे जायचे

साठीवरली काठी धावे तू का मागे सरायचे ,

तारण्याताठ्या जीव तुझे अवसान का रे गळायचे

छुपा खंजीर पाठीमागे ध्यानी हे ठेवायचे ,

अस्तनीच्या निखार्यांना वेळीच रे झाडायचे

जाऊदे होऊन आता पाय गच्च रोवायचे ,

भय कशाला धरायचे नि धैर्य का सोडायचे

पाय आपुला भक्कम असता ,का रे डळमळायचे ,

सत्यासाठी सत्यावर्ती पुरून येथे उरायचे

अवतीभवती निरखताना खरे खोटे ताडायचे ,

थांबला तो संपला रे ध्यानी हे ठेवायचे

वादळीवार्यासंगे जेथे कल्पतरू झुंजायचे ,

सागर कौतुकाने म्हणतो जिणे याला म्हणायचे

चिमुरडे हे रोपटे रे उभ्या कातळा फोडते ,

त्याची हिम्मत पाहून घे रे कसे इथे जगायचे

तुफान उठले चहुबाजुंनी धुवाधार पावसाचे ,

फडफड करीत शोधीत घरटे जिद्दी पाखरू यायचे

आकाश पेलताना हे मागे नाही सरायचे ,

तोडीत वार समोरचे तुला पुढे रे जायचे

  • गोविंद पायनाईक

Also Read: भक्ती | Devotional Article – मराठी BlogWali (marathiblogwali.in)

Also Read: भीती – जगातील सर्वात मोठे मोटिव्हेशन | Best Marathi Motivation on Life – Marathi Lekh

जगण्याचा अर्थ | Quotes on Life

This Post Has One Comment

Leave a Reply