मायेची मिठी | The HUG | Quotes on Hugs
मिठी मायेची , मिठी प्रेमाची ,मिठी आपल्या माणसांची !
मिठी जिला दुसरा शब्द आहे आलिंगन असा आहे . पण हा सहसा
रोजच्या वापरात येत नाही . मिठी हा प्रकार मानवी समाजात
सार्वभौमत्वाचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये दोन किंवा अधिक
लोक एकमेकांच्या गळ्यात, मागच्या बाजूला किंवा कंबरेवर
हात ठेवतात आणि एकमेकांना जवळ बाळगतात.
अर्थात ह्यात येणारे प्रकार मग-वेगवेगळे आहेत . आपण जन्माला
आल्यावर पहिल्यांदा असतो ते आपल्या जन्मदात्रीच्या कुशीत
आणि तीच घेते आपल्याला पहिल्यांदा घट्ट मिठीत . हि भावना
त्या बाळाला त्यावेळेस जरी उमजत नसली तरी आई मात्र ती पूर्णपणे
जगते . खूप आनंद झाला कि आनंदाने मारलेली मिठी ,खूप दुःख
किंवा वाईट वाटत असेल तर एखाद्याला मारलेली ती मिठी , अनेक
वर्षानंतर पुन्हा भेटल्यानंर मारलेली मिठी ,अनेक कारणं कधी तर
कारणाशिवायही मारलेली मिठी , अर्थात मिठी हि त्याच
व्यक्तींना मारली जाते जे आपल्या खूप निकट असतात .
पण हे नेहमीच खरं आहे असंही नाही ,कारण
एखाद्यावेळेस प्रवास करताना कोण लहान बाळ
खेळताना दिसलं ,किंवा रडत असेल तर आपण
नक्कीच त्याला मिठीत घेण्याचा प्रयत्न करतो . ते
येईलच कि नाही गोष्ट वेगळी पण त्यावेळी आपण
ओळख आहे कि नाही हे नक्कीच पाहत नाही .
जस आधी मी म्हटलं आईची मिठी हि आपली
पहिली मिठी , त्यानंतरच्या मग वेगवेगळ्या कारणांसाठी
वेगवेगळ्या लोकांनी एकमेकांना आलिंगन देणे हे होतंच राहत .
बऱ्याचदा आपण इतके घाबरलेलो असतो ,कि काहीच सुचत
नाही,नक्की काय करावं ? अशावेळी आपल्या जवळच्या
व्यक्तीच्या जवळ जाऊन त्यांना घट्ट मिठी मारणं आणि शांत
होणं ह्यापेक्षा उत्तम उपायच नाही . कळत्या वयात आल्यावर
आवडत्या आणि प्रेमाच्या व्यक्तीला मारलेली ती पहिली मिठी
खूपच स्पेशल असते . माझ्या मते मिठी हा प्रकार खरच खूप
स्पेशल आणि मस्त आहे .
मैत्री हे एक असं नातं जिथे बिनधास्त आपण कसेही
वागू शकतो ,कसेही बोलू शकतो आणि काहीही करू
शकतो ,आणि मिठी तर हा प्रकार सर्रास बिनघोर कसलीच
चिंता न करता केला जातो मिठीत असते आपलेपणाच्या
स्पर्शाची भावना जी खरच खूप आनंद देणारी असते .
पण कधीकधी जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न केला
जातो ,ज्यात स्पर्शाची जाणीव खूपच वाईट असते आणि ती
लगेच कळते . त्याचा अनुभव खूपच विचित्र आणि न
विसरण्यासारखा असतो आणि हे असं कित्येकदा होत .
मिठी हवी आपल्या प्रेमाच्या आणि जवळच्या व्यक्तीने
हक्काने मारलेली हवी .
मराठी प्रेरणादायी Quotes । Marathi Inspirational Quotes
खंबीर | Marathi Story | Goshta
त्या रात्री प्राजक्ताने विराजला गोड बातमी दिली ,
सांगितलं कि ,विरु , तू “बाबा ” होणार आहेस ! हे ऐकून
विरुच्या आनंदाला पारावार उरला नाही . प्राजुच्या चेहऱ्यावर
लाज तर होतीच पण तेज होत ते ती “आई”होण्याचं !
दोघांनी हि बातमी त्यांच्या घरच्यांना दिली. घरात चिमुकला
पाहुणा येणार म्हणून सगळेच खूप खुश होते . विरु नियमित
प्राजक्ताची काळजी घेई,प्राजक्ता आता ६ महिन्यांची गरोदर
होती .एका अनाहूत संध्याकाळी तिला फोन आला ,सांगितलं ,
विराज कार अपघातात मृत पावला . हे ऐकून तिला इतका
धक्का बसला,ती तशीच जमिनीवर कोसळली.घरचे खूप तिला
समजवण्याचा प्रयत्न करत होते ,पण ती त्या धक्क्यातून बाहेरच
येत नव्हती . तिला सतत दोघांनी घालवलेल्या सुखी क्षणांची
आठवण यायची . पोटात बाळ असल्याने घरच्यांना तिची
जास्त काळजी वाटू लागली. तिला या धक्क्यातून लवकरात
लवकर बाहेर काढणं गरजेचं होत .
कसेबसे ३ महिने निघून गेले ,प्राजक्ताने गोंडस मुलाला जन्म
दिला ,पण अजूनही ती तिच्या दुःखातून सावरली नव्हती ,
पण घरात विराजचे आई-बाबा थोडे खुश होते ,बाळाच्या
रूपाने विराजच परत आला असं सगळ्यांना वाटत होत .
अखेर महिन्यभाराने रिआनला कुशीत घेऊन प्राजक्ता
धायमोकलून रडली . पण मनाशी निश्चय केला ,कि
रिआनला एकटीनेच खूप कष्ट करून वाढवायचं ,त्याला
चांगलं शिक्षण ,चांगले संस्कार द्यायचे ,नुसतंच घरात न
बसता बाहेर पडून स्वतंत्र आणि “खंबीर ” राहायचं .!
आज २५ वर्षानंतर रिआन एका मोठ्या फर्ममध्ये मॅनेजर आहे ,
आणि प्राजक्तसुद्धा तिची नोकरी करते ,दोघेही एकमेकांची
काळजी घेतात .रिआनला असं कधीच वाटत नाही तो बापाविना
वाढलेला पोर आहे ,कारण प्राजक्ताने तिची सुखदुःख बाजूला
ठेवून मोठ्या खंबीरपणाने त्याला वाढवलं याची रिआनला जाणीव
आहे .अनेक संकटाना सामोरं जाऊन
आजही प्राजक्ता खंबीरपणाने उभी आहे !
मराठी प्रेरणादायी Quotes । Marathi Inspirational Quotes
परीघ / वेस | Marathi Quote | Periphery / Wes
वेस हा शब्द उच्चरला कि डोळ्यासमोर लगेच येते
ती “गावाची वेस ” ! गाव वर्तुळात पाहिलं पाऊल टाकण्याची
जागा म्हणजे “वेस” ! आता मी गणिताची विद्यार्थिनी असल्याने
वर्तुळ म्हटल्यावर वर्तुळाची व्याख्या नक्की काय ? हा विचार करते ,
भूमितीनुसार एका बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या व
एकाच प्रतलावर असणाऱ्या सर्व बिंदूंच्या संचाला वर्तुळ असे
म्हणतात.मग व्याख्येप्रमाणे म्हणायचं झालं तर म्हणजेच
अनेक लोकांच्या एकत्र पण काही अंतरावर राहणाऱ्या
संचाला आपण वर्तुळ म्हणतोय तर त्याची वेस हि
त्या वर्तुळाचा परीघ आहे .
गावच्या वेशी कुठे मातीच्या बुरुजाच्या ,तर कुठे दगडी
शिळापासून रचलेल्या ,आणि आताच्या काळातील काही
वेशी लोखंडी खांबापासूनच बनवलेल्या पाहायला मिळतात .
वेस हि गावची शोभा असते . अनेक सणा -समारंभाला
गावच्या वेसी सजवलेल्या आपण पाहतोच .
आता शहरा ठिकाणी अशा वेशी फारशा पहायला मिळत
नाहीत ,त्याजागी सेक्टर किंवा फेज असे प्रकार आले .
पण ह्याच वेशींच अस्तित्त्व टिकवून ठेवण्यासाठी अनेक
लोक प्रयत्न करत असतात . वेस हि महत्त्वाची आहे .
काळांतराने हीच वेस बहुतेक आपल्याला चित्रातूनच पाहावी लागेल .
ह्या लॉक डाउनच्या काळात अनेक मुंबईत राहणारे
कामगार जेव्हा त्यांच्या मूळगावी परतले तेव्हा त्यांच्यासाठी
त्यांच्याच गावच्या वेशी बंद करण्यात आल्या होत्या ,म्हणजे
गावच्या सुरक्षेसाठीच अनेक प्रशासनानी हा निर्णय घेतला
असावा पण ह्यामुळे मायभूमी जेवढी प्रिय आहे तेवढी
कर्मभूमीही प्रिय असायलाच हवी .मायभूमीही अभिमान
आहे तर कर्मभूमी स्वाभिमान आहे . पूर्वीच्या काळी
भूत-पिशाच्च ,जादूटोणा ,देवीचा कोप ,करणी या
अंधश्रद्धा होत्या ,आताही काही प्रमाणात कायमच आहेत.
या सगळ्यांची विल्हेवाट गावच्या वेशीबाहेरच लावली
जायची म्हणजे नारळ उतरवून तो बाहेर फोडणे वैगरे वैगरे ..
गावाला सुरक्षितता देण्याचे काम हि वेस करत होती .
आजही कोणतही शुभकार्य असेल तर गावच्या वेशीबाहेर
नारळ फोडण्याची प्रथा आहे . गावात लग्नकार्य असेल
तर नवरदेवाची मिरवणूक कडून नवरा जेव्हा वेशीवर
येतो तेव्हा नारळ आणि अंड फोडण्याची प्रथा आहे .
प्रथा ह्या माणसांनीच तयार केल्या आणि त्याच पालन
देखील तोच करतो पण ह्यासगळ्यच्या भानगडीत हे
विसरता काम नये कि ,प्रथा,रूढी ,परंपरा आपल्यासाठी
आहेत आपण त्यांच्यासाठी नाही .एखादी गोष्ट किती
प्रमाणत करावी आणि किती नाही हे माणूस ठरवूच शकतो .
गावाची वेस अनेक मराठी अलंकारात वापरलेली आहे .
“वेशीवरून ओवाळून टाकणे “हा शब्दप्रयोग
आपण कित्येकदा तरी ऐकतो .
याशिवाय अतिशयोक्ती अलंकाराचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ,
दमडीचं तेल आणलं ,
सासूबाईंचं न्हण झालं ,
मामंजींची दाढी झाली ,
उरलं तेल झाकून ठेवलं ,
लांडोरीचा पाय लागला ,
“वेशी”पर्यंत ओघोळ गेला ,
त्यात उंट पोहून गेला .. !
ह्या अलंकारात वेस हा शब्द वापरला गेलाय .
हे झालं गावच्या वेशीबद्दल पण वेशीचा दुसरा
अर्थ असाही होतो कि “मर्यादा” !
मग हि मर्यादा कसली ? रोजच्या जीवनात पाहायला
गेलो तर अनेक गोष्टींवर हि मर्यादा असते . बहुतेकदा
हि मर्यादा एका मुलीला ,स्त्रीला च आखून दिली जाते ,
म्हणजे हे करू नको ,असं बोलू नको ,असं नाही वागायचं ,
हे केलंस तर लोक काय बोलतील ? आपली मर्यादा ओलांडायची
नाही ह्या आणि अशा बऱ्याच गोष्टी ..
पण असं का ?ह्याचा कधी विचार केला गेलाय का ?
प्रत्येकवेळी एखाद्या स्त्रीलाच कसं ह्यासगळ्यसाठी समोर
जावं लागतं . पूर्वीच्या काली हे खूप होत पण हल्ली प्रमाण
खूप कमी झालंय . आताची स्त्री खंबीरपणे विरोध करतेय ,
प्रत्येक गोष्ट जाणून घेऊन मगच काय ते विचाराने करते .
अर्थात मर्यादा हव्यात पण कुठे आणि कशासाठी हेदेखील महत्त्वाचं आहे .
आता थोडं गणितातील परिघाबाबत बोलूयात , वर्तुळ म्हणजे
प्रतलातील एक वक्र असून तो शांकव कुलातील आहे.
त्याच्यावरील प्रत्येक बिंदू एका विशिष्ट बिंदूपासून ठराविक
अंतरावर असतो. या विशिष्ट बिंदूस ‘वर्तुळमध्य किंवा
वर्तुळकेंद्र’ म्हणतात व ठराविक अंतरास ‘त्रिज्या’ म्हणतात.
वर्तुळाची त्रिज्या अथवा व्यास माहीत असल्यास त्याचा
परीघ व क्षेत्रफळ यांची माहिती मिळते.
समजा :
r = त्रिज्या, c = परिघ, A = क्षेत्रफळ असेल, तर
परीघ = 2*Pi*r
क्षेत्रफळ = pi*r^2
शेवटी काय नाव आणि अर्थ जरी प्रत्येकाचे वेगळे
म्हणजेच वेस ,परीघ,मर्यादा तरी
हे सगळं ज्या-त्या परीने महत्त्वाचं आहेच .
जर हा लेख तुम्हांला आवडला असेल तर नक्की
तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा आणि आम्हांला कंमेंट्स द्वारे कळवा .
धन्यवाद !
Also Read: Marathi Motivational Quotes | Marathi Inspiration – मराठी BlogWali
Also Read: 101+ जबरदस्त प्रेरणादायक सुविचार | Best 101 Motivational Quotes in Marathi