You are currently viewing मराठी प्रेरणादायी Quotes । Marathi Inspirational Quotes 
Marathi Inspirational Quotes

मराठी प्रेरणादायी Quotes । Marathi Inspirational Quotes 

मराठी साहित्य आणि प्रसिद्ध लेखकांचे Quotes 

१. स्वतः स्वतःचे स्पर्धक बना. । Be your competitor.

तुमची स्पर्धा इतरांशी नंतर आधी स्वतःशीच आहे हे समजून घ्या 

आणि त्याप्रमाणे कामाला लागा . इतरांना प्रेरित करणं चांगलं पण त्यासाठी 

स्वतःची ध्येय विसरता कामा नये . तुम्हांला माहित आहे का सचिन तेंडुलकर

 एकदा त्यांच्या practice ला उशिरा गेले , तेव्हा त्यांच्या गुरूंनी त्यांना विचारलं

 कि आज उशीर का झाला ? तेव्हा ते म्हणाले कि , मी माझ्या मित्राला त्याच्या

 स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी cheer करत होतो , हे ऐकून त्यांच्या गुरूंनी त्यांच्या 

कानाखाली मारली . आणि एक सल्ला दिला कि दुसऱ्यांना cheer कारणं 

चांगलं पण त्यासाठी स्वतःच्या practice ला जर उशीर होत असेल तर ते 

मात्र चूक आहे . 

स्वतःमध्ये अशी क्षमता विकसित करा की प्रत्येकजण तुमच्यासाठी टाळ्या वाजवेल. 

ही त्याच्या यशाच्या दिशेने एक सुरुवात होती आणि आज आपण त्याचे परिणाम 

पाहू शकता.म्हणूनच  स्वतःसाठी एक स्पर्धा तयार करा. जर इतर करू शकतात 

तर मी का नाही ? असा प्रश्न सतत स्वतःला विचारात राहा आणि त्यावर काम करा . 

२. समुद्र: 

समुद्र म्हटलं कि डोळ्यासमोर येतो तो , चहुबाजूने अथांग 

पसरलेला निळाशार पाण्याचा साठा .. 

समुद्राकडून त्याची विशालता , सगळ्या गोष्टीना सामावून घेण्याची ताकद ,

 त्याचा शांतपणा आणि  वेळ पडली तर रौद्ररूप धारण करण्याची क्षमता 

अशा एक ना अनेक गोष्टी आपण त्याच्याकडून घेऊ शकतो . माणसाने देखील 

ह्या गोष्टी शिकल्या तर किती बरं होईल , ” मन मोठ्ठ असलं कि सारं काही 

सामावून घेता येतं ” . हे समुद्राच्या ह्या वैशिष्ठ्याबाबत खरं ठरतं . 

३. ” व्यक्ती तितक्या प्रकृती ” 

” व्यक्ती तितक्या प्रकृती ” आणि तितकेच प्रत्येकाचे वेग-वेगळे 

स्वभाव आणि वागण्याची पद्धत ! काही माणसांचं बोलणं कमी असतं पण 

मार्मिक , काही खूपच शांत , जेवढ्यास तेवढं , तर काही खूप बोलके आणि 

सगळ्यात लगेच मिसळून जाणारे तर काहींची व्यर्थ बडबड .. अनेक लोक 

अनेक त्यांच्या पद्धती , परंतु एकाच व्यक्तीला दोन्ही गोष्टींचा मेळ म्हणजेच 

कधी शांत आणि वेळ पडली तर रागही व्यक्त  करता यायला हवं.

प्रत्येकजण वेगळा आहे त्यामुळे आपली खुबी लक्षात घेऊन आपण स्वतःला 

तसं present केलं पाहिजे. resent करता यायला हवं  ज्या – त्या 

परिस्थितीनुसार माणसाला तस वागता आलं तर जगण्याची मजा काही औरच असेल . 

मराठी प्रेरणादायी Quotes । Marathi Inspirational Quotes 

४. पु. ल. देशपांडे 

भरलेला खिसा माणसाला “जग” दाखवतो ,

  पण रिकामा खिसा जगातील “माणसं ” दाखवतो .. 

ज्याला शंभर किलोच्या धान्याचं पोतं उचलता येतं ,

त्याला ते विकत घेता येत नाही आणि 

ज्याला विकत घेता येत त्याला ते उचलता येत नाही .. 

विचित्र आहे पण सत्य आहे असं पु. ल . म्हणतात . 

म्हणजेच जसा पैसा महत्त्वचा आहे तसंच माणसांना जपणं हेदेखील तितकंच महत्त्वचं आहे. 

५. माणसाला एखादी गोष्ट करायची असेलच ना …तर मार्ग सापडतो ,

आणि करायची नसेलच तर कारणे !! 

मोठी स्वप्न बघण्यात आणि ती पूर्ण करण्यात खुप फरक आहे 

आणि ज्यांना स्वतःची ध्येय पूर्ण करायचीच असतात त्यांना कितीही 

अडथळे आले तरीही त्यातून मार्ग काढता येतोच पण जर त्याच माणसाला 

ते करायचं नसेल तर मात्र त्याच्याकडे अनेक कारणं असतात म्हणूनच कारणे

 द्यावीत कि मार्ग काढावा हे आपल्या हातात आहे . 

६. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात .. 

एक :  वाचलेली पुस्तकं ,

दोन : भेटलेली माणसं !!

पुस्तक सर्वात जवळचा मित्र -नेहमी उपलब्ध  असणारा ,चांगला 

सल्लगार आणि सर्वात संयमी शिक्षक आहे म्हणूनच पुस्तकांशी केलेली मैत्री 

आपल्याला हुशार तर बनवतेच पण आयुष्यदेखील दाखवते . 

भेटलेली माणसं आपल्याला चांगले -वाईट अनुभव देतात . 

प्रत्येक माणसाच्या वागण्याची तऱ्हा वेगळी आहे त्यामुळे अनेक 

माणसांकडून कस वागावं ,कस बोलावं हे जस कळत त्याउलट 

कसं वागू -बोलू नये हेदेखील कळत. 

७. दिवसातून किमान एकदातरी स्वतःशी बोला, तसं केलं नाही तर 

जगातल्या एका चांगल्या व्यक्तीशी बोलण्याची संधी तुम्ही गमवाल.

८. रोज रोज प्रेम करतो म्हणणे म्हणजचे प्रेम नसते…तर आपल्या 

आयुष्यात कोणीतरी अशी व्यक्ती असणे जिच्यावर आपला इतका 

विश्वास असणे की तुम्ही त्यांना  कितीही दूर केलेत तरी, त्यांचे मन 

कितीही दुखावलेत तरीही ते तुमची साथ सोडणार नाहीत. ते केवळ 

तुमचेच होते, तुमचेच आहेत आणि तुमचेच राहतील. 

९. तासनतास एखाद्या व्यक्तीची वाट पाहणं यासारख्या यातना नाहीत, 

पण कुणीतरी आपली वाट पाहत आहे या जाणीवेसारखं दुसरं सुखही नाही. 

या जाणीवेतूनच माणसं धावत्या गाड्या पकडतात. – व. पु. काळे 

१०. जळणाऱ्या निखाऱ्याचं तापमान एखाद्या शेकोटीप्रमाणे निश्चित असतं.

      बसणाऱ्यानं शेकोटीपासून किती अंतरावर बसायचं, यावर सगळ्या गोष्टी 

अवलंबून असतात.ऊब हवी की चटके हवेत हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं !!

– व. पु. काळे 

खरंतर हे वाक्य माणसांच्या बाबतीत लागू पडतं म्हणजेच 

काही लोकं मुद्दामून एखाद्याला एखाद्याविषयी manipulate करतात . 

म्हणजेच साध्या सोप्या भाषेत आग लावायची कामं …  

अशा लोकांसोबत राहायचं कि त्या लोकांपासून लांब राहायचं हे आपलं आपण ठरवावं . 

मराठी प्रेरणादायी Quotes । Marathi Inspirational Quotes 

११. चांदणी कविता – शांता शेळके 

सायंकाळी क्षितिजावरती

मंदपणे मी करते लुकलुक

शांत राहुनी अपुल्या जागी

भवतालाचे बघते कौतुक!

अफाट वरती गगन पसरले

विशाल खाली पसरे धरती

मी सृष्टीची सुता लाडकी

चमकते क्षितिजावरती

  • चांदणी कविता – शांता शेळके 

१२. या दोन गोष्टींमुळे जग तुम्हांला ओळखतं ,

तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि 

तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब !!

  पण रुबाब हा तुमच्या जगण्यात , तुमच्या कामात असावा ना

 कि तुम्ही  घातलेल्या कपड्यात ! 

आणि संयम हि कमजोरी नसून ती ताकद आहे आणि ती सर्वांकडे असतेच असं नाही . 

म्हणूनच, 

 तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि 

तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब !!

१३. खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते , सुट्टी ही त्याच्यासाठी 

काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते . 

१४. #स्वाभिमान 

कोणीही आपला फायदा उचलेल इतका अधिकार कोणालाही 

कधीही देऊ नका. कारण यामध्ये सर्वात जास्त ठेच पोहचते ती स्वाभिमानाला.” !! 

“स्वाभिमानापेक्षा महाग जगामध्ये कोणतीच गोष्ट असू शकत नाही. 

कारण तो जपण्यासाठी सर्वात जास्त मेहनत करावी लागते.”

मराठी प्रेरणादायी Quotes । Marathi Inspirational Quotes 

१५. “आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक 

असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, 

पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ,लिखाण, 

नृत्य, अभिनय ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग 

तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.

  – पु. ल.देशपांडे “

१६. आयुष्याच्या पुस्तकात जेव्हा वाईट घटनांनी भरलेली पाने येतात , 

तेव्हा पुस्तक बंद न करता पाने उलटून नवीन प्रकरणाला सुरुवात करावी . 

म्हणजेच आपलं आयुष्य हे पुस्तकातल्या पानांसारखं आहे प्रत्येक नवीन 

पानावर वेगळं काहीतरी पण अर्थपूर्ण लिहलेलं पण नेहमी जे लिहलंय 

ते चांगलंच असेल असं नाही कधी वाईट घटनाही त्यात असतात तसं 

आपलं आयुष्य सुख आणि दुःख याने भरलेलं ! दुःख आलं म्हणून 

आयुष्यच संपलं असं नाही तेही कधीतरी जाणारच आहे आणि नवीन 

सुखाचे दिवसही येतीलच . म्हणूनच 

आयुष्याच्या पुस्तकात जेव्हा वाईट घटनांनी भरलेली पाने येतात , 

तेव्हा पुस्तक बंद न करता पाने उलटून नवीन प्रकरणाला सुरुवात करावी . 

१७. आनंदात मग्न असणारी , हसणारी माणसं वेगवेगळी दिसतात, 

मात्र दुःखाचा चेहरा सारखाच असतो .

       – व. पु. काळे 

१८. आपण कितीही स्वतंत्र असल्याचा आव आणला तरी जीवनाच्या 

एका विराट नाटकातील आपण पात्र आहोत , इथे सगळेच संवाद पदरचे घालून चालत नाही . 

        – पु. ल. देशपांडे 

मराठी प्रेरणादायी Quotes । Marathi Inspirational Quotes 

१९. चूक – सुधीर मोघे यांची कविता 

क्षणोक्षणी चुका घडतात , आणि श्रेय हरवून जातात 

आपल्याच रिकामी ओंजळी आपल्याला फार काही शिकवत असतात , 

कणभर चुकीलाही आभाळाएवढी सजा असते ,

चूक आणि शिक्षा यांची कधी ताळेबंदी मांडायची नसते , 

एक कृती , एक शब्द एकाच निमिष हुकत -हुकत .. 

उभ्या जन्माच्या चुकामुकीला तेवढं एक निमित्त पुरतं , 

अखेर हे सारं घडतं केवळ आपण काही शिकण्यासाठी 

आपण मात्र शिकत असतो पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी !! 

         — सुधीर मोघे !!

२०. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनचं कारणे असतात , 

एक : आपण विचार न करता कृती करतो किंवा 

दोन : कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो . !

म्हणूनच विचार आणि कृती कधी काय करावं हे कळलं तर 

आयुष्यातल्या अर्ध्या समस्या नक्कीच कमी होतील . 

बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोलावे . 

आणि कृती करतानादेखील ती आपण का करतोय हे समजून घेणं गरजेचं आहे . 

२१. भावनाप्रधान माणसं Emotional People 

जी माणसं भावनाप्रधान असतात , त्यांच्या

 स्वाभिमानाला जर जबरदस्त धक्का लागला 

तर दोनपैकी एक काहीतरी होतं .. काही माणसं गप्प बसतात ,

मनातल्या मनात कुढतात , 

आणि निवृत्तीचा मार्ग पत्करून सगळं आयुष्य एखाद्या 

बाभळीच्या झाडासारखं शुष्क घालवतात ; 

ह्याउलट काही माणसं चिडून उठतात , सारासार विचार गुंडाळून

 ठेवतात आणि मग सगळ्यांवर वार करीत सुटतात .. 

अशी माणसे एकेकाळी भावनाप्रधान होती , हे सांगून खरं वाटतं नाही . 

-व .पु .काळे 

Also Read: जगण्याचा अर्थ | Meaning of Life | Life Quote – मराठी BlogWali (marathiblogwali.in)

Also Read: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (marathi.gov.in)

This Post Has 2 Comments

Leave a Reply