लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी, ऐकतो मराठी,
जाणतो मराठी, मानतो मराठी..
मराठी भाषा गौरव दिनच्या मनस्वी शुभेच्छा !🚩
मराठी भाषा आमची मायबोली अर्थात आपली
मातृभाषा मायबोली म्हणजेच आपल्या आईच्या संगोपनातली भाषा !
आपली मराठी भाषा मुळात एक गुढ विषय आहे .
ज्याच्या खोलात गेल्यावरच त्याचा अर्थ उमजेल .
“मराठी भाषेची निर्मिती संस्कृतमधुन निर्माण झालेल्या
महाराष्ट्र प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली “. तशा
भारतांतल्या बहुतेक सर्व भाषा संस्कृत भाषेपासुन निर्माण झाल्या.
आपली मराठी भाषा सर्व महाराष्ट्राची जरी एक असली तरी
तिच दर बारा कोसावर बदलते . लेखी भाषा तीच असली
तरी बोलीभाषेत मात्र फरक पडतो .तिचे हेल वेगळे होतात.
परंतु गेल्या काही वर्षांत देशाच्या सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या
भाषांमध्ये मराठी कुठेतरी मागे पडत चालली असताना ,
आज पुन्हा सरकारनं जाहीर केलेल्या भाषा अहवालानुसार
तेलगू भाषेला मागे टाकत आपल्या मराठीने तिसरे स्थान
पटकावले आहे ,हे प्रत्येक मराठी प्रेमींसाठी आनंदाची बाब आहे.
मराठी भाषा गौरव दिन | Marathi Bhasha Din | Marathi Language Day २७ फेब्रुवारी
मराठी भाषा लवचिक आहे म्हणजे आपण जशी तिला
वळवू तशी ती बदलते. थोड्या फरकाने शब्दांचे अर्थ बदलतात .
कधी-कधी तर एकाच शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ निघतात व
अनेक गैरसमज वाढलेली उदाहरणही आहेत. मराठी भाषेला
अभिजात दर्जासाठी लोक चळवळ हवी .बारा वर्षांपूर्वी केंद्र
सरकारने तामिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला ,त्यानंतर
संस्कृत ,तेलगू ,कन्नड ,मळल्यालम आणि उडिया या भाषांनी
हा दर्जा पटकावला .अमृतातेही पैजा जिंकणारी मराठी हि
जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे . मराठीला हा दर्जा
मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेल्या रंगनाथ पठारे
समितीने सखोल संशोधन करून सुमारे पाचशे पृष्ठांचा
अहवाल तीन वर्षांपूर्वी सादर केला .जी भाषा रोजगार देते तीच टिकते .
उदा; इंग्रजी
हल्लीच्या तरुणपिढीवर इंग्रजी भाषेचा जास्त पगडा
असल्याचं दिसून येतं ,आणि एकीकडे काही अशीही तरुणमंडळी
आहेत ,जी कॉलेजस्तरावर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी वेगवेगळे
उपक्रम राबवतात . त्यापैकीच काही कॉलेजमधील वाचनालयातील
ग्रंथ ,कादंबरी ,तसंच इतर प्रेरणादायी पुस्तकं त्यांचं प्रदर्शन ,
किंवा वाचन दिवसांतर्गत एका विद्यार्थ्याने एक तरी मराठी पुस्तकं
वाचावं असे कार्यक्रम ,मराठीत वक्तृत्त्व स्पर्धा ,किंवा वर्गातच
विद्यार्थ्यांमध्ये गंमतशीर वादविवाद स्पर्धा अशाप्रकारे बहुतेक
कॉलेजेस मध्ये मराठी भाषा संवर्धनासाठी प्रयत्न केले जातात ..
वाचनसंस्कृती ,साहित्यप्रकाशन आणि ग्रंथविश्वाला मोठा हातभार लागेल .
मराठी ज्ञानभाषा म्हणून विकसित होईल .कोश वाङमयाच्या
बाबतीत मराठी जगातील दुसरी समृद्ध भाषा आहे .मराठीतील
वैचारिक व विनोदी साहित्य जागतिक तोडीचे आहे .हि फक्त
एका प्रांताची भाषा नसून ,ती महत्त्वाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय
भाषा आहे. “अभिजाततेचा सर्वाधिक महत्त्वाचा निकष आहे ,
भाषेची आणि साहित्याची श्रेष्ठता”..!
मराठी संवर्धनाची सध्या फार गरज आहे .
सद्यपरिस्थिती भाषा हे केवळ संवादाचं माध्यम न राहता
ते एकमेकांचे विचार जोपासण्याचं साधन झालं आहे .
त्यामुळे इतर भाषांची सरमिसळ केलेली कोणालाही चालणार नाही .
२७ फेब्रुवारी हाच दिवस मराठी भाषा गौरव दिन
म्हणून का साजरा केला जातो ?
२७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषिकांसाठी अभिमानाचा आहे.
वि.वा. शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर
यांच्या जीवनकार्याचा गौरव करण्यासाठी हा दिवस
मराठी दिन किंवा “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो.
वि.वा. शिरवाडकर हे कुसुमाग्रज या टोपण नावानेही प्रसिद्ध आहेत.
१९९९ मध्ये त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील मराठी भाषेची
समृद्धी आणि वारसा साजरा करण्यासाठी २७ फेब्रुवारी ही
त्यांची जन्मतारीख निवडण्यात आली.
मायबोली म्हणजे आपल्या आईच्या संगोपनातली भाषा ! लहान मुलं
जन्मल्यापासून आईजवळच असते तेव्हा ती ज्या भाषेत बोलते ती
मुलाची भाषा होणे स्वाभाविक आहे. आपल्या महाराष्ट्रातील मराठी
भाषा प्रत्येक प्रांताची निराळी आहे, म्हणजेच कर्नाटकाची कन्नड
अथवा तेलगू, पंजाबची पंजाबी भाषा, गुजरातची गुजराती भाषा,
अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या भाषा परंतु आपल्या महाराष्ट्रातल्या
आपल्या मातृभाषेत मात्र एक वेगळीच गोडी आहे. मराठी हि जरी आपली
भाषा असली तरी दार बारा कोसांवर भाषा बदलली जाते, तसेच लेखी
भाषा तीच असली तरी बोलीभाषेत मात्र फरक पडतो .तिचे हेल वेगळे
होतात. आपल्या नवी मुंबईतील आणि मुंबईतल्या काही भागांत अगदी
गॉड अशी आगरी भाषा, कोकणातील मालवणी आणि कोकणी,
घाटावरची म्हणजे देशावरचे वेगळी, घाटी भाषा , वऱ्हाडी भाषा, कोल्हापूरची
कोल्हापुरी भाषा, हि वेगळी असते.
मराठी भाषा लवचिक आहे. म्हणजे आपण जशी तिला वळवू तशी ती बदलते.
थोड्या-थोड्या फरकाने शब्दाचे अर्थ बदलतात. कधी-कधी तर एकाच
शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ निघतात व अनेक गैरसमजहि वाढलेली
उदाहरणे आहेत.
मुंबईची मराठी भाषा हल्ली खिचडी भाषा झाली आहे. शुद्ध मराठी
राहिलीच नाही मुळी ! तिच्यात हिंदी, मराठी, इंग्रजी यांची भेसळ
झाली आहे. हिंदी आणि इंग्रजी सिनेमे पाहून कदाचित अशी भाषा
झाली असावी , पूर्वी मराठीला राजभाषेचा मान नव्हता, पण आता
काही प्रमाणात आहे. खेड्यापाड्यातील रांगडी आणि अशुद्ध वाटणारी
म्हणजे अपभ्रंश असलेली भाषा हि असतेच. ती कशीही असो ती मराठीच
भाषा आहे. म्हणूनच प्रत्येक मराठी माणसाला ती आवडते. प्रत्येक
प्रांतातील भाषा वेगळी त्यामुळे थेतील लोकांची ती आवडीची हे साहजिकच !
आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान असतो पण आपली मायबोली
समजणाऱ्या या मराठी भाषेवर इंग्रजीचा खूप मोठा पगडा असल्याचं
दिसून येतं, म्हणजे हेच बघा ना, कॉलेजेस, एक्झिक्युटिव कंपन्यांमध्ये
ऐवजी इंग्रजी भाषेचं कंपल्शन असतं इंटरविव्ह असो किंवा तिथल्या
स्टाफचा एकमेकांशी संवाद असतो. तसंच अलिकडे तरुण मंडळीला
इंग्रजी भाषाच बोलावी, लिहावी लागते. साहजिकच त्या भाषेचे संस्कार
घडत असतात. त्या विकसित देशात आपल्या लोकांना द्रव्य प्राप्ती जास्त
प्रमाणात होते. त्यामुळे त्यांना तिकडेच रहाणे सुखाचे वाटते. त्यांचे आयुष्य
तेथेच जाते. त्यांच्या मुलांना मराठी येत नाही, ती तिथलीच होतात.
सर्वचजण नाही पण काही तिथेच स्थायिक होतात. त्यामुळे त्या मुलांची
मायबोली तिकडची होते. हा विषय ब्रेनड्रेन चा असला तरी मराठी
भाषेवर राहणीवर, आचार विचारात खूपच फरक पडतो.
मराठी भाषेला अभिजात दर्जासाठी लोक चळवळ हवी. बारा
वर्षांपूर्वी केंद्र सरकारने तामीळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला.
त्यानंतर संस्कृत, तेलगू, कन्नड, मल्याळम, आणि उडिया या भाषांनी
हा दर्जा पटकावला. अमृतातेही पैजा जिंकणारी मराठी ही जगातील
दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. मराठीला हा दर्जा मिळावा यासाठी
महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेल्या रंगनाथ पठारे समितीने सखोल
संशोधन करुन सुमारे पाचशे पृष्ठांचा अहवाल तीन वर्षांपूर्वी सादर केला.
जी भाषा रोजगार देते तीच टिकते. उदा; इंग्रजी महाराष्ट्र सरकारने
मराठी भाषेसाठी केवळ २५ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे
ही रक्कम अतिशय तोकडी आहे. त्यात तब्बल २० पटीने वाढ होईल.
मराठी ८०० विद्यापिठांमध्ये शिकवली जाईल. वाचनसंस्कृती, साहित्य
प्रकाशन आणि ग्रंथविश्वाला मोठा हातभार लागेल. मराठी ज्ञानभाषा
म्हणून विकसित होईल. कोश वाडमयाच्या बाबतीत मराठी जगातील
दुसरी समृद्ध भाषा आहे मराठीतील वैचारिक व विनोद साहित्य
जागातिक तोडीचे आहे. ही फक्त एका प्रांताची भाषा नसून ती
महत्त्वाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भाषा आहे.
अभिजाततेचा सर्वाधिक महत्त्वाचा निकष आहे, भाषेची अणि साहित्याची श्रेष्ठता.
मराठी संवर्धनाची सध्या फार गरज आहे. परदेशात राहिल्यामुळे
तेथील तरुणांना मराठीची, ग्रंथांची माहितीवार्ता नाही. संस्कारही
तिथलेच होत असल्याने त्यांना मराठी भाषेबदद्ल फारसं कौतुक वा
अभिमान वाटत नाही, उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलात तरी
हरकत नाही, पण काम झाल्यावर परत आपल्या भारतात या.
महाराष्ट्राला आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा करुन द्या.
परभाषा जरी अवगत झाली आणि परदेशात गेलात तरी
आपल्या मराठीला विसरु नका. प्रत्येक मराठी माणसाला
मराठी भाषा बोलता, लिहिता-वाचता आली पाहिजे, आपल्या
मराठीतसुद्धा खुप विषयावर लेखन झाले आहे.
शास्त्र-विज्ञान, ललित साहित्य खूप आहे. त्यामुळे आपल्या
मराठी भाषेचा मनात न्यूनगंड न ठेवता प्रत्येकाने मनाशी
पक्का निर्धार केला पाहिजे की मराठी बोलणारचं न तेही शुद्ध मराठी।
तरुणांना इंग्रजी भाषेची क्रेझ आहे म्हणजे आमचा असा समज
असतो की इंग्रजी भाषा आली की सर्वकाही येतं आपल्याला।
पण असा विचार करण्याच्या नादात ना धड मराठी बोलता येत
ना इंग्रजी! पण आम्हां तरुणांचा असाही समज आहे की त्या
व्यक्तीला इंग्रजी बोलता येतयं ना मग मला का नाही? हा
न्यूनगंड प्रत्येकाच्या मनात असल्याने आताची तरुणापिढी
इंग्रजीच्या प्रभावाखाली असल्याचं दिसुन येतं अन्
प्रत्येकाच्या मनातला हा न्यूनगंड जेव्हा कमी होईल तेव्हा
नक्कीच मराठी भाषेची स्थिती सुधारेल अणि खरंच जर
आपल्या मायबोली साठी आजच्या तरुणपिढीने शुद्ध मराठी
भाषेचा आग्रह धरला तर नक्कीच मराठी भाषेचं सर्वधन होईल
यात काही शंका नाही.
सदयपरिस्थितीत भाषा हे केवळ संवादाचं माध्यम न राहता ते
एकमेकांचे विचार जोपासण्याचं साधन झालं आहे. त्यामुळे इतर
भाषांची सरमिसळ केलेली कोणालाही चालणार नाही, त्यामुळे
प्रत्येक मराठी व्यक्तीला किंबहुना प्रत्येक इतर भाषीय व्यक्तीला
बोलीभाषेचं महत्त्व असणं गरजेचं आहे.
तुम्हांला माहित आहे का ?
एकदा एका भाजीविक्रेत्याने आपल्या कमाईतून ९०० मराठी
पुस्तके जतन केल्यामुळे तिला “भाषा संवर्धन” हा पुरस्कार देण्यात आला.
कुसुमाग्रज हे एक प्रसिद्ध मराठी कवी, नाटककार,
कादंबरीकार आणि मानवतावादी होते. त्यांचा जन्म
27 फेब्रुवारी 1912 रोजी पुणे येथे झाला आणि
10 मार्च 1999 रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.
शिरवाडकर हे मराठी साहित्यातील अग्रगण्य कवी मानले जातात.
आणि मराठी साहित्यातील त्यांच्या योगदानामुळे
त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार पद्मभूषण
आणि दादासाहेब फाळके पुरस्कारयांसह अनेक सन्मान मिळाले आहेत.
मराठी भाषा गौरव दिन | Marathi Bhasha Din | Marathi Language Day २७ फेब्रुवारी
Wishes to share with a Marathi speaker:
मराठी भाषा दिन शुभेच्छा Quotes:
१. लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
तुम्हा सर्वाना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा !
२. रुजवू मराठी, फुलवू मराठी कला बोलू फक्त मराठी
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
३. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या दऱ्या-खोऱ्यातील शिळा
सर्व मराठी भाषा प्रेक्षकांना अनेक शुभेच्छा !
#marathibhshadin #kusumagraj #vivashirvadkar #marathilaunguageday #marathibhasha
अशाच नव-नवीन विषयांवरील माहिती जाणून घेण्यासाठी
आमच्या वेबसाईटला नक्की भेट देत राहा.
धन्यवाद !
Also Read: मराठी प्रेरणादायी Quotes । Marathi Inspirational Quotes – मराठी BlogWali (marathiblogwali.in)