You are currently viewing Mangalagaur Song Full Lyrics Baipan Bhari Deva
Mangalagaur Song Full Lyrics Baipan Bhari Deva

Mangalagaur Song Full Lyrics Baipan Bhari Deva

मंगळागौर Lyrics In Marathi “बाईपण भारी देवा “! 

जय देवी मंगळागौरी (2-times) 

ओवाळीन सोनिया ताटी, रत्नांचे दिवे

माणिकांच्या वाती , 

हिरेयां – मोती ज्योती 

जय देवी मंगळागौरी (2-times) 

चल गं बाई खेळू या

मंगळागौर खेळू या, मंगळागौर खेळू या

गौराईचा खेळ बाई

आनंदात नाचू गाऊ, आनंदात खेळू या

मंगळागौर खेळू या गं , मंगळागौर खेळू या

हो हो, हो हो, हो हो, हो हो (2-times) 

पाणी लाटा गं, पाणी लाटा गं

पाणी लाटा, हो.. हो… 

सागर लाटा गं, सागर लाटा गं

सागर लाटा, हां.. हा… 

डोंगरमाथा गं, डोंगर माथा 

डोंगर माथा, हो.. हो

पाणी लाटा गं, पाणी लाटा गं, पाणी लाटा… 

दिंडा मोड गं पोरी, दिंड्याची लांब दोरी

दिंड्याखाली कोण गं उभी

माय माऊली मी तर उभी

कोण्या गावाला गेली सांग दादा

कोण्या वाटेन गेली सांग दादा

दिंड्या मोड गं पोरी, दिंड्याची लांब दोरी…

भोवर भेंडी भोवरा नाचे

भोवर भेंडी भोवरा नाचे

आठशे खिडक्या नऊशे दार, 

कुण्या वाटेन बा गेली ही नार 

तिचा सापडला चंद्रहार, तिचा सापडला चंद्रहार

हे….. 

सर सर गोविंदा येतो, 

मजवरी गुलाल फेकीतो (2-times) 

या बाई झिम्मा नाचा या

आमच्या वेण्या घाला या

एक वेणी मोकळी, 

सोनियची साखळी

घडव घडव रे सोनारा

माणिक मोत्यांचा डोलारा

डोलाऱ्याला खिडक्या, 

आम्ही दोघी बहिणी लाडक्या

लाड सांगू बापाला

पैसे मागू काकाला

गौर बसली नाहाया

शंकर आले पहाया

शंकर आमचे मेहुणे

दोन दिसांचे पाहुणे

हुशः… 

चल गं बाई खेळू या

मंगळागौर खेळू या, मंगळागौर खेळू या

गौराईचा खेळ बाई

आनंदात नाचू गाऊ, आनंदात खेळू या

मंगळागौर खेळू या गं, मंगळागौर खेळू या

हो हो हो हो,हो हो हो…. 

पिंगा गं पोरी, पिंगा गं पोरी

पिंगा गं पोरी, पिंगा

तुझ्या पिंग्यानं मला बोलवली

रात जागवली पोरी पिंगा

पोरी पिंगा गं, पोरी पिंगा गं, पोरी पिंगा गं, पिंगा

लेक माझी गं, सून तुझी गं

आहे देखणी गं, पोरी पिंगा

पिंगा गं पोरी, पिंगा गं पोरी, पिंगा गं पोरी, पिंगा

लेक माझा गं, जावई तुझा गं

आहे देखणा गं, पोरी पिंगा

पिंगा गं पोरी, पिंगा गं पोरी, पिंगा गं पोरी, पिंगा

हां हा!… 

नाच गं घुमा, कशी मी नाचू, नाच गं घुमा, कशी मी नाचू

या गावचा, त्या गावचा, माळी नाही आला

वेणी नाही मला कशी मी नाचू, 

या गावचा, त्या गावचा, शिंपी नाही मला , चोळी नाही मला 

कशी मी नाचू , नाच  गं घुमा कशी मी नाचू (2-times) 

फु बाई फु फुगडी , चम चम करतिया बुगडी (6-times) 

Music….. 

Mangalagaur Song Full Lyrics Baipan Bhari Deva

दिग्दर्शन : केदार शिंदे – Kedar Shinde

लेखिका वैशाली नाईक – Vaishali Naik 

निर्मिती : माधुरी भोसले – Madhuri Bhosale

बेला शिंदे- Bela Shinde & अजित भुरे- Ajit Bhure

छायांकन वासुदेव राणे

संपादन : मयूर हरदास

संगीत : सई-पियुष

Producer Company:Jio Studio, MVB Media

PVR पिक्चर्स द्वारा वितरित

Cast/ Starring:

Rohini Hattangadi

Vandana Gupte

Sukanya Kulkarni

Suchitra Bandekar

Deepa Parab

Shilpa Navalkar

Mangalagaur Song Video

Mangalagaur full song Audio

You can also read: Baipan Bhari Deva Title Track Full Lyrics  – मराठी BlogWali (marathiblogwali.in)

You can read here English article: Baipan Bhari Deva | Song – Mangalagaur | Entertainment – Times of India Videos (indiatimes.com)

This Post Has 4 Comments

Leave a Reply