You are currently viewing महाशिवरात्री विशेष | Maha Shivaratri 2024 ॐ नमः शिवाय 🙏
महाशिवरात्री विशेष | Maha Shivratri 2024 | ॐ नमः शिवाय 🙏

महाशिवरात्री विशेष | Maha Shivaratri 2024 ॐ नमः शिवाय 🙏

सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा !  

हर हर महादेव ॐ नमः शिवाय 🙏

महाशिवरात्री विशेष | Maha Shivaratri 2024 ॐ नमः शिवाय 🙏

आज महाशिवरात्र म्हणजेच अनेकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या 

भगवान शंकरांचा दिवस.. शिव शंकर म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर 

एक सुंदर छबी उभी राहते. इतर देव -देवतांपेक्षा शंकरांचं रूप अगदीच 

वेगळं आहे . डोक्यावर अर्धचंद्र , हातात त्रिशूल , संपूर्ण अंगभर भस्म, 

गळ्यात नाग आणि रुद्राक्ष , पायात कडा अशा सगळ्या आभूषणांनी 

सजलेलं हे रूप पण ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ आणि त्यामागचं सत्य

 खूप कमी लोकांना माहित असेल, म्हणून चला तर आज जाणून घेऊयात 

ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आजच्या ह्या लेखा मधून ! 

चंद्र – 

महादेवाच्या डोक्यावर अर्धचंद्र असतो, या चंद्राला 

शंकरदेवाचं मुकूट म्हटलं जातं. पुराणातल्या माहितीनुसार 

शंकरदेवाच्या त्रिनेत्रात एक सूर्य, एक अग्नी आणि एक चंद्रांनी 

निर्मित आहे. चंद्र म्हणजे व्यक्तीच्या मनातील चांगले विचार, 

सृष्टीच्या कल्याणासाठी पुढे चालत राहवं असं हा चंद्र दर्शवतो. 

चंद्राचं एक नाव सोमही आहे, म्हणजेच शांतीचं प्रतीक. त्यामुळे 

सोमवारी शिवपूजन, दर्शन आणि उपवास केले जातात.

नागदेव –

 शिवशंकराच्या गळ्यातील हार म्हणजे नाग. जो शंकरदेवाला 

अतिप्रिय आहे. जेव्हा अमृतमंथन झालं तेव्हा शंकरदेवानं अमृत 

कलशापूर्वी विषाला आपल्या कंठात ठेवलं आणि त्यानंतर त्यांनी 

विषारी नागाची माळा गळ्यात घातली. तसंच नाग हा तमोगुणी 

आणि संहारक वृत्तीचा आहे. त्यामुळे शिव यांनी तमोगुणाला आपल्या 

वशमध्ये ठेवलं आहे.  हा नाग म्हणजे भगवान शंकर यांचे भक्त वासुकी 

आहेत असं म्हंटल जात म्हणून त्या नागाला वासुकी नाग देखील म्हणतात . 

महाशिवरात्री विशेष | Maha Shivaratri 2024 ॐ नमः शिवाय 🙏

रुद्राक्ष –  

पौराणिक कथांनुसार भगवान शंकराने संसारातील 

लोकांच्या भल्यासाठी अनेक वर्षे तपश्चर्या केली. एकदा 

तपश्चर्या करत असताना ते खूपच दु:खी आणि निराश 

झाले यावेळी त्यांनी आपले डोळे उघडले असता त्यांच्या 

डोळ्यातून जे अश्रू खाली पडले त्यातून रुद्राक्षाच्या झाडाची निर्मिती झाली. 

याच कारणामुळे हिंदू धर्मात रुद्राक्षाची पुजा केली जाते. रुद्राक्षामुळे

 सकारात्मक ऊर्जा मिळते.  शिवपुराणात १४ प्रकारच्या रुद्राक्षांचा 

उल्लेख करण्यात आला आहे.

त्रिशूल – 

शिवदेवाच्या शृंगारात त्रिशूल खूप महत्त्वाचं आहे.

त्रिशूल सत, रज आणि तम गुणांनी प्रभावित आहे.सृष्टीविरोधात 

विचार करणाऱ्यांचा नाश या त्रिशूलाने केला जातो. ते गुण म्हणजे 

सत्व, रज, तम. ‘सत्वगुण’ म्हणजे शुद्ध वर्तन, ‘तमोगुण’ म्हणजे दृष्टपणा, 

कपट,‘रजोगुण’ महत्त्वाचं आहे. गीतेमध्ये रजोगुणाला ‘रागात्मकम्’  

ही विशेषणं लावली आहेत. 

भस्म –

 महादेव आपल्या संपूर्ण शरीरावर भस्म लावतात. 

भस्मामुळे नश्वरताचं स्मरण होतं. प्रलयकाळात संपूर्ण जगाचा विनाश होतो, 

मात्र राहतं ते फक्त भस्म. शरीराचीही हीच अवस्था होते. वेदांमध्.

ये रुद्रला अग्नीचं प्रतीक मानण्यात आलं आहे आणि भस्म करणं हे 

अग्नीचं कार्य आहे. त्यामुळे शिव शृंगारात भस्माला महत्त्व आहे.

पायात कडा – 

स्थिर आणि एकाग्रता दर्शवते. योगीजनही शंकरदेवासारखं 

एका पायात कडा घालतात. अघोरींमध्येही हे पाहायला मिळतं.

फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेनंतर चौदाव्या दिवशी महाशिवरात्री येते. 

भगवान शिवावर विश्वास ठेवणार् या लोकांसाठी हा मोठा दिवस आहे. 

ते दरवर्षी त्याची वाट पाहत असतात. हा दिवस विशेष आहे कारण तो 

शिव आणि शक्तीच्या एकत्र येण्याचे प्रतिनिधित्व करतो. 

ह्या वर्षी ८ मार्च २०२४ ला महाशिवरात्री आहे.

महाशिवरात्री मुहूर्त: 

शुक्रवार, ८ मार्च २०२४ रोजी महाशिवरात्री

निशिता काल पूजा वेळ – सकाळी १२.०७ ते १२:५६, ९ मार्च

कालावधी – ०० तास ४९ मिनिटे. 

महाशिवरात्री विशेष | Maha Shivaratri 2024 ॐ नमः शिवाय 🙏

महाशिवरात्रीचे महत्त्व :

ही रात्र शिव आणि शक्तीच्या अभिसरणाचे प्रतीक आहे, 

जी चेतना आणि उर्जेच्या मिलनाचे प्रतिनिधित्व करते. आध्यात्मिक 

उन्नती, अज्ञानावर मात आणि आंतरिक शांती प्राप्तीसाठी आशीर्वाद

 घेत भाविक भगवान शंकराला श्रद्धांजली अर्पण करतात.

शिव आणि पार्वतीचा विवाह: आख्यायिकांनुसार, महाशिवरात्री 

भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या खगोलीय विवाहाचे प्रतीक आहे.

अंधारावर मात करणे : सांकेतिकदृष्ट्या रात्र म्हणजे आपल्यातील 

अज्ञान आणि नकारात्मकतेच्या अंधारावर मात करणे.

आम्ही आशा करतो कि ह्या माहितीमुळे तुमच्या ज्ञानात 

नक्कीच भर पडली असेल ,हर हर महादेव !!   

धन्यवाद !!

Also Read: भक्ती | Devotional Article | Bhakti – मराठी BlogWali (marathiblogwali.in)

Also Read: महाशिवरात्री: ‘असे’ करा शास्त्रशुद्ध शिवपूजन; पाहा, योग्य पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता – Marathi News | mahashivratri 2024 know about shubh muhurat and vrat puja vidhi of mahadev lord shiva on mahashivratri | Latest bhakti News at Lokmat.com

Maha Shivaratri

This Post Has One Comment

Leave a Reply