You are currently viewing ओडिशातील भीषण रेल्वे अपघाताचे नेमकं कारण काय?
Odisha Train Accident

ओडिशातील भीषण रेल्वे अपघाताचे नेमकं कारण काय?

Balasore: How did three trains collide in Odisha? | India train crash Odisha accident

भारतातील सर्वात भीषण रेल्वे अपघातांपैकी एक असलेल्या ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात

एकापाठोपाठ एक तीन गाड्यांची धडक होऊन शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण रेल्वे अपघातात

२८० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आणि ९०० हून अधिक जखमी झाले, या पार्श्वभूमीवर ओडिशा सरकारने

आणि मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शनिवारी एक दिवसाचा शोक जाहीर केला आणि सांगितले की,

या दिवशी कोणतेही राजकीय उत्सव आयोजित केले जाणार नाहीत. राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाने अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही घोषणा केली आहे.

ओडिशातील भीषण रेल्वे अपघाताचे नेमकं कारण काय?

भरधाव वेगाने तिसऱ्या मार्गावर विरुद्ध दिशेने येणारी बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस कोरोमंडल

ह्या रुळावरून घसरलेल्या डब्यांना धडक झाली असून यात प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला आहे.

कोलकात्यापासून २५० किमी दक्षिणेला आणि भुवनेश्वरपासून १७० किमी उत्तरेला बालासोरमधील बहानागा

बाझर स्थानकाजवळ शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना

यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात एका मालगाडीचाही समावेश होता.  सिग्नलची समस्या

असल्याचे बोलले जात आहे. मालगाडीला रस्ता देण्यासाठी पॅसेंजर ट्रेन थांबवण्यात आली असावी.

मात्र सिग्नल सदोष असल्याने गाडी एकमेकांवर आदळली आणि काही डबे रुळावरून घसरले.

त्यातील एक डबा दुसऱ्या पॅसेंजर ट्रेनच्या रुळावर पडल्याने मोठा अपघात झाला.

ए1, ए3 डब्यातील लोक पळून गेले परंतु बी 7 कोचनंतरच्या लोकांना रुळावरून घसरल्याने मोठा फटका बसला आहे

आणि अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी रात्री रेल्वे रुळावरून घसरल्याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

आणि असे सांगितले कि, आमचे लक्ष बचाव आणि मदत कार्यावर आहे. जिल्हा प्रशासनाच्या मंजुरीनंतर जीर्णोद्धार सुरू होईल.

त्याची सविस्तर उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असून रेल्वे सुरक्षा आयुक्तही स्वतंत्र चौकशी करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF)

मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

शनिवारी ओडिशा रेल्वे दुर्घटनेतील मृतांसाठी जगभरातून शोक व्यक्त करण्यात आला.

तैवानच्या राष्ट्राध्यक्ष साई-इंग वेन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो,

युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग आणि भारतातील

अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी रेल्वे दुर्घटनेतील मृतांसाठी शोक व्यक्त केला आहे.

देव त्यांच्या कुटुंबाला हे दुःख झेलण्याचं बळ देवो

Also Read: India train crash: More than 260 dead after Odisha accident – BBC News

How did three trains collide in Odisha?

Also Read: Sahara Desert 25 Interesting facts in Marathi  – मराठी BlogWali (marathiblogwali.in)

Leave a Reply