Independence Day inspirational soldier story
हि कथा एका शूरवीर पत्नी आणि त्याच माऊलीची , कथा
सत्यपरिस्थितीवर जरी वाटत असली ,
तरी कथेतील सर्व पात्र ,घटना,कथेचा विस्तार संपूर्णतः काल्पनिक आहे,
कांही साम्य आढळ्यास
निव्वळ योगायोग समजावा .
माझं एमए मराठीचं दुसरं वर्ष,आणि त्याच वेळेस किशोरच्या
लष्कर भरतीच प्रशिक्षणसुद्धा
चालू होतं.आमचं लग्न होऊन नुकतंच वर्ष झालं होत .त्यात आमचं
आठ माणसांचं एकत्र कुटुंब .
ह्यांचं अमाप देशावरचं प्रेम ,आणि मला उच्च शिक्षणाची ओढ हि गोष्ट
काहीशी १९८५ सालची. एकमेकांवरचा
विश्वास आणि अफाट प्रेम आम्हांला आमची स्वप्न पूर्ण करण्यास
मदत करत होत . एकेदिवशी ह्यांच्यासाठी
लष्कर खात्यातून पत्र आलं पत्र घरच्या सगळ्या सदस्यांसमोर
वाचून दाखवलं ,त्यात त्यांची
लष्करात “सुभेदार मेजर “पदावर भरती झाल्याचं कळलं ,बातमी
ऐकताच ह्यांच्यासह ,घरातील सगळ्यांनाच
आनंद झाला . पण आई थोड्या साशंक होत्या ,शेवटी आईचंच मन ते,
ज्यात मुलाचं सुख त्यात माझंच
या माताने त्यांनीसुद्धा शुर मातेप्रमाणे ह्यांना हसत परवानगी दिली.
१५ दिवसानंतर किशोर सीमेवर
जाण्यासाठी घरातून निघाले,आई आणि माझ्या डोळ्यांत
आनंदाश्रू पण तितकीच भीती
अशा मिश्रित भावना होत्या ,पण कोणतीही आडकाठी न करता
ह्यांना आम्ही निरोप दिला.
सीमेवर देशसंरक्षणासाठी आपला नवरा त्याचं काम चोख करतोय
याचा भलताच
अभिमान मला होता .दर २० दिवसांनंतर ह्यांचं एक माझ्यासाठी
आणि संपूर्ण घरासाठी
एक पत्र असायचं ,ज्यात त्यांच्या खुशहालीबद्दल ते आम्हाला कळवत .
३-४ महिन्यानंतर एकदा त्यांचं घरी येणं व्हायचं .
असंच बघताबघता वर्ष सरलं .
त्याच काळादरम्यान सीमेवर “सियाचीन युद्ध ” चालू होत,आणि एका कातरवेळी,
गडचिरोलीजवळच्या लष्करांच्या छावणीवर काही आतंकवाद्यांनी
हल्ला केलाय ,ज्यात बरेचशे सैनिक
जखमी,काही शहीद झाल्याची बातमी कानावर आली,हे ऐकून
आमच्या काळजात धडकीच भरली,
संपूर्ण कुटुंबाचं चित्त थाऱ्यावर नव्हतं .१८एक तासांनी छावणीवरून
कर्नलांचा फोन आला , त्यांनी सांगितलं ,
की आतंकवाद्यांच्या चकमकीत किशोरच्या हाताला गोळ्या लागल्यात,
कदाचित त्यांचा हात
निकामी झाला असावा अशी डॉक्टरांना शंका आहे,आम्ही उद्याच
त्यांना घरी पाठवतोय .
भर तारुण्यात किशोरने हात गमावला होता ,पण देशासाठी
आपल्या माणसांसाठी
काहीतरी आपण केलंय ह्याचा आनंद त्यांना पुन्हा काम करण्यासाठी
नवी उमेद देत होता,आणि
त्यातच आम्हांला कळलं लवकरच आम्ही आई-बाबा होणार आहोत ,
ह्या बातमीमुळे
दोन्ही कुटुंब आणि आम्ही दोघे खूप खुश होतो. ५-६ महिने होईपर्यंत
किशोर माझ्यासोबतच होते ,
बाळावर गर्भसंस्कारही शूरवीरांच्या गोष्टी वाचल्यामुळे तसेच होत
आणि तेव्हा नुकतंच
माझं एमएची परीक्षा देऊन झाली होती ,पुन्हा किशोरांची सीमेवर
जाण्याची वेळ आली,
बाळाच्या चाहुलीने मी आनंदी होतेच पण हे पुन्हा जातील यामुळे थोडी
नाराजहि,किशोर गेल्यावर भर्रकन ३ महिने निघून गेले .
१९८७ला मी माझ्यातल्या अंकुराला जन्म दिला.आणि त्याचं
नावही अंकुर असंच ठेवलं.
बंधन शूरांचे देश वीरांचे | Independence Day Soldier Story
बाळाच्या जन्माची बातमी ऐकताच किशोर सीमेवरून रजा
काढून घरी येण्यास निघाले
तेव्हाच त्यांना कळलं कि त्यांची सुभेदार पदावरून बढती होऊन
लेफ्टनंटपदी झाली आहे ,
हि आनंदाची बातमी घेऊनच ते मला आणि बाळाला पाहायला आले ,
त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ,
बाळाच्या पायगुणानेच बढती झालीये,आणि बाळाला कुशीत
घेऊन बापासारखाच
तुही देशासाठी काम करायचं हे असं बोलणं झालं. त्याचदरम्यान
मीसुद्धा एमची परीक्षा
उत्तीर्ण झाल्याचं कळलं ,”द्विगुणित आनंद ” ..
अंकुर बघताबघता १६ वर्षाचा झाला,आणि किशोरसुद्धा त्यांच्या
कामामध्ये अधिकाधिक
तरबेज होत चाललेले,आता मेजर पदावर होते ,वडिलांचं
बघूनच अंकुरलासुद्धा
सैनिकी शिक्षणाचं वेड घेरू लागलं ,शेवटी माझं आईच मन
आधी माझा नकार होता पण त्याचा
या गोष्टीमधला रस वाढत पाहून त्यालासुद्धा सैन्यातच भरती
होण्यासाठी वडिलांनी भरती प्रशिक्षण दिल
आणि वयाच्या २२व्या वर्षीच अंकुरसुद्धा सैन्यात भरती झाला.
आतातर बाप-बेटा असे दोघेही देशसेवेत मग्न होते.
आणि मीसुद्धा एका शाळेत मुख्यध्यापिका म्हणून काम करत आहे .
एका अनाहूत संध्याकाळी छावणीवरून फोन आला,किशोर
आतंकवाद्यांच्या हल्ल्यात शहिद झाले ,
हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली मेजर
किशोर गजानन पाटील अमर राहे
अशा घोषणा देत त्यांना संपूर्ण लोकांनी श्रद्धांजली वाहिली.
एका शहीद सैन्याची पत्नी,आणि
सैन्यात सध्या असलेल्या मुलाची आई म्हणून मला बराचश्या
ठिकाणी सत्कारासाठी बोलावत असत,
तेव्हा मी तिथे असलेल्या प्रत्येक माउलीला हेच आव्हान करायचे
कि त्यांनीही खंबीर बनून
आपल्या मुलांना सैन्यात पाठवावं,आज अंकुरचं लग्न होऊन
त्याला मुलगी आहे आणि
तो मेजर जनरल पदावर कार्यरत आहे ,त्याच्या पत्नीचीहि त्याला
तेवढीच साथ मिळतेय आणि
माझा आशीर्वाद कायम त्याच्या पाठीशी आहे,आज वडिलांना
त्याचा खूप अभिमान वाटला
असता कारण त्यांच्यापेक्षाही उच्च पदावर आणि अजूनही
देशसेवेत अंकुर कार्य करतोय .
बंधन शूरांचे देश वीरांचे | Independence Day Soldier Story
त्या दोघांचं ब्रीदवाक्य, “देशसेवा हीच खरी आम्हां सैन्यांची ताकद !
” सविता किशोर पाटील एका शहीद
जवानाची पत्नी,आणि सैन्यात असणाऱ्या तरुण मुलाची आई
म्हणून मला माझाच अभिमान वाटतो.
खरे शुरवीर मी याचि देही याची डोळां पाहिले .
तात्पर्य: माणसाची सेवा हीच ईश्वरसेवा आहे” हे एक कालातीत आणि
गहन तत्त्वज्ञान आहे जे उच्च हेतूची सेवा करण्याचा मार्ग म्हणून इतरांना
मदत आणि सेवा करण्याच्या महत्त्वावर जोर देते.
बंधन शूरांचे देश वीरांचे | Independence Day Soldier Story
Service to the nation is true service to God. म्हणजेच देशसेवा हीच
खरी ईश्वरसेवा हे विवेकानंदानी आपल्या देशातल्या सैनिकांसाठी योग्य
वापरले आहे. याचा प्रत्यय अशा गोष्टी वाचल्या ऐकल्या कि येतं. १९०६ साली
वयाच्या २७व्या वर्षी त्यांनी इंडियन नॅशनल कॉन्फरन्सला हजेरी लावली. तेथे
त्यांनी धाडसाने ‘हिंदू’ऐवजी ‘भारतीय’ अशी दुरुस्ती मांडली. हिंदू हा शब्द त्या
काळी अल्पसंख्याकांनी स्वीकारला होता. एखादे किंवा दुसरे नामकरण म्हणजे
कोणतेही उद्गार नव्हते. सहिष्णू हिंदू धर्म आणि कॅथलिक व उदारमतवादी
इस्लाम या सर्वश्रेष्ठ वैशिष्ट्यांचे सुसंवादी मिश्रण असलेल्या संस्कृतीत बुडालेल्या
सरोजिनी नायडू यांच्या संवेदनशील मनाला केवळ ‘भारतीय’ हा शब्दच मान्य
होता. तिची दुरुस्ती मंजूर झाली तरच आपण नॅशनल कॉन्फरन्समध्ये सहभागी
होऊ, असे त्यांनी हळुवारपणे पण स्पष्ट शब्दांत प्रतिनिधींना सांगितले.
टाळ्यांच्या कडकडाटात ते वाहून नेण्यात आले. भारतीय राजकारणात
गांधीजींच्या आगमनापूर्वीची ही गोष्ट आहे. मातृभूमीच्या सेवेत स्वत:ला,
मनाला आणि आत्म्याला समर्पित करण्याचे प्रेमळ आमंत्रण आणि आव्हान
म्हणून तिने ते स्वीकारले. सरोजिनी यांची सौंदर्यदृष्टी अतिशय उत्तम होती आणि
त्या उत्तम रेशीम आणि दागिन्यांच्या निवडीसाठी ओळखल्या जात होत्या.
बंधन शूरांचे देश वीरांचे | Independence Day Soldier Story
पण तिने सर्वस्व सोडले.फ्रान्स, डेन्मार्क, स्वीडन आणि स्वित्झर्लंडसह
जगभरातील सुमारे ८० देशांमध्ये लष्करी किंवा नागरी अशा काही प्रकारच्या
सार्वजनिक सेवा कार्यरत आहेत, असे सायमन जेनकिन्स यांनी ‘द गार्डियन’मध्ये
नमूद केले आहे. हे “श्रीमंत आणि गरीब तरुणांचा दृष्टीकोन व्यापक करते
आणि त्यांना सार्वजनिक सेवांच्या संपर्कात आणते. यामुळे विद्यापीठातील
वर्षे वाया घालवण्यापेक्षा थेट कामावर जाण्यास प्रोत्साहन मिळू शकते.
बंधन शूरांचे देश वीरांचे | Independence Day Soldier Story
सैनिकांच्या आणि त्यांच्या शौर्याच्या कहाण्या वारंवार फ्रंट लाईनपासून
सेल्युलॉइडपर्यंत प्रवास करतात, ज्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी
त्यांनी केलेल्या अडचणी आणि बलिदानाची झलक आपल्याला मिळते.
भारताच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून खऱ्या आयुष्यातील
सैनिकांना मनापासून अभिवादन !
Also Read: Independence Day (yourstoryclub.com)
Also Read: 10 Tips to Save Electricity at Home in Marathi – मराठी BlogWali (marathiblogwali.in)
You can here Independence day song: Independence Day Songs in Hindi, Download 15 August Songs MP3 Online Free on Gaana.com
Celebrate India’s Independence Day – Playlist – Apple Music
बंधन शूरांचे देश वीरांचे | Independence Day Soldier Story
Pingback: जागतिक महिला दिन | “आई व्हायचंय मला” 8 March | Women’s Day - मराठी BlogWali