You are currently viewing Tips to Make Study Notes for Exams
Tips to Make Study Notes for Exams in Marathi

Tips to Make Study Notes for Exams

नोट्स तयार करण्याच्या काही टिप्स in मराठी 

अरे यार ..! परीक्षा जवळ आलीये आणि माझा अभ्यासच 

अजून पूर्ण नाही झाला अशा तक्रारी सगळ्याच मुलांच्या असतात . 

शेवटच्या मिनिटापर्यंत अभ्यास काही पूर्ण होत नाही .

आणि How to take study notes for exam in Marathi हा तुम्हाला नेहमी प्रश्न पडतच असेल ?

नोट्स काय करायच्या आहेत ? 

आपल्याकडे पुस्तक आहे ना त्यातूनच वाचू किंवा एखाद्या मित्राच्या

नोट्स कॉपी करू असं आपल्याला खूपदा वाटलं असेल ना  आणि म्हणूनच तुम्ही  

नोट्स बनवणं टाळतात आणि मग ऐन परीक्षेच्या वेळी त्यांची तारांबळ उडते . 

पण स्वतःच्या नोट्स असतील तर नक्कीच हा प्रॉब्लेम कोणाला येईल असं

 मला वाटत नाही .त्यासाठी आम्ही तुम्हाला  स्वतःच्या नोट्स स्वतः कशा तयार 

करता येतील आणि त्या किती effective असतील. यासाठी हा

नोट्स तयार करण्याच्या काही टिप्स in मराठी blog 

नक्की वाचा आणि आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींना जरूर share करा.  

फ्रेंड्स नोट्स बनवायच्या आधी तुम्हांला आधी हे समजून घेतलं 

पाहिजे कि नोट्स म्हणजे नेमकं काय ? नोट्स चा अर्थ असा कि जो 

काही तुमचा अभ्यासक्रम आहे त्याला त्याचा अर्थ न बदलता  तुमच्या 

भाषेत पण संक्षिप्त रूपात लिहणं . तुमचा नोट्स लिहितानाच ३०-४०%

 अभ्यास पूर्ण होतो कारण ज्यावेळी तुम्ही नोट्स लिहीत असता त्यावेळी

 तुमच्या long term memory मध्ये ते कोरलं जात . ज्यामुळे तुम्ही revision 

करायला घेता तेव्हा अर्धी माहिती आपोआप आठवायला लागते . 

Let’s understand How to take study notes for exam in Marathi.

टीप नं १ : तुमचे लिहायचं सर्व सामान एकत्र करा . ||

 Gather all your writing material. 

नोट्स बनवताना तुमची सर्व स्टेशनरी एकत्रित करून तुमच्या जवळ ठेवा .

 त्यात तुमचा पेन , पेन्सिल , वही किंवा पेपर्स / कोरे कागद , हायलायटर इत्यादी . 

कडा अभ्यासाला बसलो आणि नंतर कळलं कि अरे हे घ्यायचं विसरूनच गेले, 

तर उठून ते घ्यायला जाणं ह्यात मूड जातो आणि अभ्यासावर नीट लक्ष केंद्रिंत 

करू शकत नाही म्हणूनच नोट्स बनवताना सगळी स्टेशनरी आधीच जवळ घेऊन ठेवावी . 

टीप नं २ : नोट्स कशा बनवणार आहात म्हणजेच source काय हे ठरवा . 

Decide Source of Content 

फ्रेंड्स तुम्हांला नोट्स कशा बनवायच्या आहेत म्हणजेच नोट्स बनवण्याचा 

source कोणता असेल हे आधी ठरवा . म्हणजेच तुम्हाला नोट्स जेव्हा वर्गात शिक्षक

शिकवत आहेत तेव्हाच तयार करायच्या आहेत कि तुम्हांला त्या तुमच्या पुस्तकातून 

नंतर लिहायच्या आहेत . फक्त लक्षात ठेवा आपल्याला नोट्स ह्या संबंधित

 विषयवार आणि परीक्षेच्या महत्त्वाच्या अभ्यासक्रमातूनच नोट्स बनवायच्या आहेत . 

टीप नं ३ : नोट्स तयार करण्याची प्रक्रिया || Process to Note Making 

१} त्या विषयाचा आढावा घेणं  म्हणजेच Overview . 

ह्यात तुम्हांला तुमच्या विषयांच्या टॉपिक मधला overview घ्यायचा आहे . 

जेणेकरून संपूर्ण chapter मध्ये नेमकं काय आहे ते कळेल . 

२} पुस्तकात दिलेल्या माहितीला सक्रियपणे वाचायचं आहे . 

३} तुमच्या शब्दात नोट्स बनवायच्या आहेत . 

टीप नं ४ : संकल्पना आणि महत्त्वाच्या शब्दाकडे लक्ष केंद्रित करा . ||

 Focus on Concept & Keywords . 

तुम्हांला माहित आहे का ,तुमच्या पुस्तकातला २०% भागच फक्त 

महत्त्वाची संकल्पना आहे बाकी सगळं त्याच स्पष्टीकरणच असतं त्यामुळे 

तुम्हांला महत्त्वाची concept समजून घेऊन  त्यातले पॉईंट्स म्हणजेच keywords 

लिहून घ्यायचे आहेत . 

टीप नं ५ : तुमच्या नोट्स संक्षिप्त करा. || Concise your notes. 

मुलांना प्रॉब्लेम तेव्हाच येतो जेव्हा ते नोट्स ला concise करत नाहीत

 आणि नुसते पेजेस च्या पेजेस भरत जातात . पण आपल्याला हि चूक करायची

 नाही कारण आपला मुळात हेतूच हा आहे कि आपल्याला नोट्स यासाठी

 बनवायच्या आहेत कि ज्या वाचताना आपला वेळ वाचेल आणि सगळ्या 

concepts देखील आपल्याला समजतील . त्यामुळे नोट्स ह्या concise च हव्या . 

अशाच आणखीन Tips to Make Study Notes for Exams खालीदेखील

 आहे त्या नक्की वाचा. 

टीप नं ६ : तुमच्या नोट्स colorful बनवा . || Make your notes colorful. 

फ्रेंड्स तुम्हांला असा प्रश्न विचारला कि तुम्हांला कोणता चित्रपट बघायला आवडेल? 

black & white or color?? तुमचं उत्तर अर्थात color हेच असेल याची

 मला खात्री आहे . तसंच आपल्या नोट्सचं आहे . जितक्या जास्त नोट्स 

colorful तितकं वाचायला सोपं आणि बघायला सुंदर !! नोट्स हायलायटरने 

किंवा स्केच पेनाने थोड्या colorful बनवा . 

Make your notes colorful. 

टीप नं  ७ : स्मरणात ठेवा || Memorization.

आतापर्यंत तुमच्या नोट्स बनवून झाल्या असतील आता येतो 

महत्त्वाचा भाग तो म्हणजे केलेल्या नोट्स स्मरणात ठेवणं . आता मी अशाप्रकारे नोट्स लक्षात ठेवते . 

१} ओळी-ओळीने वाचायची पद्धत 

 ह्या पद्धतीत तुम्हाला फक्त तुम्ही तयार केलेल्या नोट्स ओळी ओळीने 

दर २-३ दिवसांनी वाचायच्या आहेत . 

२} गोष्ट स्वरूपात लक्षात ठेवा . 

तुम्ही लिहलेल्या नोट्स एखाद्या गोष्टीच्या स्वरूपात विचार करून लक्षात ठेवा.

Conclusion : 

ह्या सगळ्या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या नोट्स जास्त चांगल्या पद्धतीने

बनवू शकाल याची आम्हांला खात्री आहे .असाच वेगळ्या विषयांवर टिप्स हव्या 

असतील तर तुम्ही आम्हांला ते कंमेंट्सद्वारे सांगू शकता . 

Also Read: 10 Tips to Save Electricity at Home in Marathi – मराठी BlogWali (marathiblogwali.in)

Also Read: 14 Tips to Make Study Notes – [Study Hacks] (wellguider.com)

This Post Has 2 Comments

Leave a Reply