You are currently viewing How to study Math? | गणिताचा अभ्यास कसा करायचा ? 
How to study Maths

How to study Math? | गणिताचा अभ्यास कसा करायचा ? 

Tips for Solving Math Problems | How to study Math?

गणित हा असा एक विषय …! जो काही मुलांचा अत्यंत आवडीचा पण 

अनेक मुलांना गणित हे नाव घेताच डोक्याला आठ्या पाडणारा विषय ? असं का ? 

अनेक वेगवेगळे विषय आपण शिकतो पण गणित ह्या विषयाचं नाव जरी निघालं 

तरी काही विद्यार्थी मात्र खूप घाबरतात इंग्रजीत ह्याला Math Phobia असं म्हणतात . 

पण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या की , तुम्ही गणित विषयाचा अभ्यास कसा

 कराल How to study Math? आणि जो काही अभ्यास तुम्ही केलाय तो तुम्ही लक्षात कसा ठेवू शकाल . 

जर ह्या  टिप्स तुमच्या उपयोगी पडत असतील तर आम्हांला कमेंट्सद्वारे सांगायला विसरू नका . 

टीप नं १ : गणितासाठी  वेगळी Notebook तयार करा . 

Maintain Separate Notebook for Math . 

गणित असो किंवा इतर कोणताही विषय प्रत्येक वेगळ्या विषयाला वेगळी 

वही असणं गरजेचं आहे . हि सगळ्यात बेसिक पण तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे . 

टीप नं २ : सराव हि गुरुकिल्ली आहे. | Practicing is the Key . 

गणित हा एक असा विषय आहे ज्यासाठी तुम्हाला तुमचे ज्ञान परीक्षेच्या 

प्रश्नांवर लागू करणे आवश्यक आहे, याचा अर्थ तुम्हाला संकल्पना समजून घ्याव्या लागतील. 

आणि सोडवलेल्या प्रश्नांची सतत प्रॅक्टिस करणे . नवीन वेगवेगळी गणिते सोडवण्याचा सराव करत राहणे . 

कंटाळा येतोय किंवा आवडत नाही म्हणून सराव नाही केला तर गणित हा विषय तुम्हांला नेहमीसारखाच

कठीण जाईल म्हणून सराव महत्त्वाचा ! 

टीप नं ३ : Formula Sheet हा तुमचा सगळ्यात चांगला मित्र आहे . 

Formula Sheet is your good friend . 

गणित म्हटलं कि सूत्रे हि आलीच नाही का ? पण प्रत्येक वेगळ्या chapter मध्ये 

वेगळी सूत्रे असतात आणि ती नेहमीच लक्षात राहतील असं नाही म्हणूनच एकदाच सूत्रांची 

यादी करून एका पानावर किंवा अशा डायरीमध्ये लिहून ठेवावीत जी तुम्ही कुठेही आणि 

कधीही वापरू शकाल . म्हणूनच formula sheet तयार करणं जास्तच उपयोगी पडेल . 

टीप नं ४ : विशिष्ट सूत्रांचं Derivations समजून घ्या . 

Understanding the Derivations of certain Formulas . 

काही सूत्रांची Derivation  केवळ उपयुक्तच नाही तर अर्थपूर्णही आहे.  

कारण काही प्रश्न hard  सूत्रांच्या मूळ आणि मूलभूत गोष्टींबद्दल तुमचे ज्ञान तपासतात.

टीप नं ५ : तुमच्या पाठयपुस्तकातील उदाहरण प्रश्नांचा सराव करा . 

Practice on Example Questions on Textbooks . 

सतत गणितं सोडवल्याने तुम्हांला  ते गणित कसं सोडवावं हे कळत 

आणि सरावाने सूत्र आणि पद्धती दोन्हीही लक्षात ठेवण्यास मदत होते . 

टीप नं ६ : गणितात प्रभूत्त्व महत्वाचे आहे . 

Mastery is important in mathematics 

गणित हा एक विषय आहे जो पूर्वीच्या आणि विद्यमान ज्ञानावर आधारित आहे. 

मागील अध्यायांच्या मजबूत पायाशिवाय, आपणास पुढील अध्यायात ते तयार करण्यासाठी 

संघर्ष करावा लागेल. म्हणूनच, गणिताच्या बाबतीत संकल्पनांवर प्रभुत्व मिळवणे महत्वाचे आहे. 

मागच्या concepts लक्षात घेतल्या तरच नवीन येणाऱ्या concepts तुम्हांला कळतील . 

टीप नं ७ : गणितात असणाऱ्या सर्व शंका लगेच दूर करा . 

Clear all your Doubts . 

गणितात शंका येणं सोपं आहे. तुमच्या शंका निर्माण होऊ देऊ नका, 

त्या आल्याच त्या दूर करा. जितक्या लवकर तुम्ही तुमच्या शंकांचे निरसन कराल, 

तितक्या लवकर तुम्ही त्या विषयांवर चांगले व्हाल. तुमच्या वर्ग शिक्षक, मित्रांना किंवा 

एखादं app वापरून किंवा Youtube वरचे videos पाहून त्या तुम्ही सोडवाव्यात . 

टीप नं ८ : Word Problem वर जास्त लक्ष केंद्रित करा . 

Word Problem सोडवताना तुम्ही CUBES पद्धतीचा तुम्ही वापर करू शकता . 

  1. CUBES म्हणजेच 

            C : Circle the number . 

म्हणजेच गणितात दिलेल्या संख्येला गोल करा . 

U : Underline the question & important information 

  प्रश्नाला आणि महत्त्वाच्या माहितीला अधोरेखित करा . 

  B : Box the KeyWord .

मुख्य शब्दाला पेनाने बॉक्स करा . 

  E : Evaluate . 

सूत्र लिहा आणि आणखी कोणत्या स्टेप्स बाकी आहेत ते बघा . 

  S : Solve .

आणि शेवटी गणित सूत्र वापरून पद्धतशीर सोडवा आणि तुमचा निष्कर्ष लिहा . 

वरच्या सर्व टिप्स तुम्ही गणिताचा अभ्यास करताना वापरल्या तर तुम्हांला गणित ह्या विषयाची गोडी नक्कीच लागेल.

ह्या टिप्स तुम्हीही नक्की वापरून बघा आणि तुम्हांला जर ह्या टिप्स चा वापर झाला असेल तर आम्हांला कॉमेंट्सद्वारे नक्की कळवा 

धन्यवाद !! 

Also Read: 14 Ways to Study Math – wikiHow

Also Read How to Take Notes? : Tips to Make Study Notes for Exams – मराठी BlogWali % % (marathiblogwali.in)

How to study Math
How to study Maths

Leave a Reply