You are currently viewing यशस्वी लोकांच्या सवयी । Habits of Successful People in Marathi
Habits of Successful People

यशस्वी लोकांच्या सवयी । Habits of Successful People in Marathi

यशाच्या शिखरावर पोहचलेल्या लोकांच्या सवयी in Marathi

सवय ही एक सातत्यपूर्ण गोष्ट आहे जी एकदा आपल्याला लागली कि मग ती सोडणे कठीण आहे.

मग ती कसलीही सवय असू शकते,  उठण्यापासून, दिवसभर सतत  का असेना किंवा अनेक वाईट

गोष्टीच्या सुद्धा सवयी अनेकांना असतात मग त्यात व्यसनाधीन होणे इत्यादी येतं . परंतु आपल्याला प्रश्न

पडत असतो कि यशाच्या शिखरावर पोहचलेल्या लोकांच्या सवयी नक्की कोणत्या असतील ?

Here are some Habits of Successful People in Marathi. तर अशा

अनेक दैनंदिन सवयी आहेत ज्या यशस्वी लोकांमध्ये सामान्य आहेत. यशासाठी या सवयी आणि त्यांचे

महत्त्व समजून घेतल्यास आपल्या अद्वितीय ध्येय आणि आकांक्षांवर अवलंबून असतो . या सवयी नक्की 

काय आहेत आणि त्या आपल्या स्वत: च्या जीवनात कशा वापराव्य आणि यशासाठी सवयी का महत्वाच्या

आहेत याबद्दल तुम्हांला वाचता येईल . 

सवय १ : सर्वप्रथम तुमची ताकद आणि तुमची कमजोरी काय आहे याच विश्लेषण करा .

|Analyze your strengths and weaknesses

कोणतीही परीक्षा देताना मग ती शाळेतली असो किंवा आणखी कोणती सगळ्यात महत्त्वाचं ! तुम्ही तुमची

strategy तयार करा जेणेकरून तुमची कमजोरी तुमच्या ताकदीत बदलेल .  आपली बलस्थाने आणि कमतरता

म्हणजेच strengths and weaknesses काय आहेत हे पाहा.  आपण रिफ्लेक्टिव्ह बेस्ट सेल्फ (आरबीएस)

Reflected Best Self (RBS) exercise व्यायाम करू शकता. हे आपल्याला आपली बलस्थाने शोधण्यात

मदत करण्यासाठी इतरांना आपल्याबद्दल काय वाटते हे शोधण्यात मदत करते. सुरुवात करण्यासाठी

आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूतील लोकांचा विचार करा. काम, जुन्या नोकऱ्या आणि माजी प्राध्यापक

किंवा शिक्षक तसेच मित्र आणि कुटुंबातील लोकांचा समावेश करा.

सर्व वेगवेगळ्या क्षेत्रात विचारण्यासाठी लोकांचा विचार केल्याने आपल्याला आपल्या व्यक्तिमत्त्वाचे मूल्यांकन

बर्याच पातळ्यांवर आणि बर्याच परिस्थितींमध्ये करण्यास नक्कीच मदत होईल. 

सवय २ : वेळचं योग्य नियोजन || Time Optimization 

 आपल्याला माहीतच आहेच “हातून गेलेली वेळ परत येत नाही ”  . हि सगळ्यात महत्त्वाची सवय आहे.

बरीच मोठी आणि आयुष्यात यशस्वी झालेली लोकंदेखील वेळच्या बाबतीत अगदी पक्की असतात.

वेळेचं नियोजन फक्त परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे असं नाही रोजच्या आयुष्यात पण तेवढंच महत्त्वाचं आहे . 

तुमच्या दिवसातल्या activities वरून तुमचं वेळापत्रक बनवा .वेळापत्रक बनवा म्हणजे संपूर्ण वेळत्यात

तुमची इतर कामं ,आणि hobbies यांचा समावेश करा जेणेकरून तुम्हांला फार कंटाळा येणार नाही .

वेळ व्यवस्थापन हे एक महत्त्वपूर्ण कौशल्य आहे जे बर्याच यशस्वी लोकांनी त्यांची उत्पादकता जास्तीत

जास्त करण्यासाठी आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी आत्मसात केले आहे. कार्यक्षम वेळेचे व्यवस्थापन

व्यक्तींना कमी वेळेत अधिक साध्य करण्यास, विलंब कमी करण्यास, आत्मविश्वास वाढविण्यास आणि

त्यांच्या करिअर किंवा शिक्षणात प्रगती करण्यास अनुमती देते. यशस्वी लोकांच्या सवयींचे निरीक्षण करून,

आपण मौल्यवान अंतर्दृष्टी मिळवू शकतो आणि आपल्या स्वत: च्या जीवनात या वेळ व्यवस्थापन धोरणांचा समावेश करू शकतो.

सवय ३ : स्वतःला शिस्त लावा .|| Discipline is a must . 

जर तुम्ही शिस्तप्रिय नसाल तर तुम्ही तुमचं ध्येय कधीच गाठू शकत नाही . 

शिस्त हि एक अशी प्रेरक शक्ती आहे जी तुम्हांला तुमचं कठीणातलं कठीण ध्येय गाठण्यासाठी मदत करू शकते .

जर तुम्ही शिस्तप्रिय नसाल , तुमचा दिवस पूर्ण वाया जातो आणि याचा परिणाम म्हणजे काम पूर्ण होत नाही ,

मग सगळी कामं एकत्र अंगावर पडतात आणि त्यामुळे कामाचा तणाव येतो त्यामुळे शिस्त हि महत्त्वाची आहेच . 

जीवनातील सर्वात यशस्वी व्यक्ती शिस्तप्रिय असतात. जीवनातील समस्या आणि आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपण वापरत असलेल्या मूलभूत साधनांनी शिस्त बनलेली असते. स्कॉट पेक  Scott Peck यांनी आपल्या ‘द रोड लेस ट्रॅव्हल्ड’ The Road Less Traveledया पुस्तकात म्हटले आहे की, “शिस्तीशिवाय आपण काहीही सोडवू शकत नाही.” म्हणजेच “without discipline we can solve nothing.” 

सवय ४ : निष्ठा || Strong Dedication . 

प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच .कोणीही हुशार आणि अलौकिक बुद्धिमत्ता घेऊन जन्माला येत नाही .

एखाद्या कामावरची निष्ठा आणि मनापासून त्यात केलेले प्रयत्न आपोआपच आपल्याला मोठं करतात . पण त्यासाठी

तुमच्या आतल्या आगीला सतत चालना द्या आणि तुम्हाला जे साध्य करायचं आहे त्यासाठी तुमचं मन समर्पित करण्याची

सवय स्वतःला लावा . समर्पित होण्याचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे वचनबद्ध राहणे आणि आपल्या ध्येयापर्यंत

पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम करणे. हे केवळ स्वारस्य किंवा गुंतण्यापेक्षा जास्त आहे; हे एखाद्या कारणासाठी किंवा

ध्येयाप्रती दृढ बांधिलकी आहे, जे अडथळ्यांना सामोरे जाताना सतत प्रयत्न आणि कठोरतेने दर्शविले जाते.

समर्पण म्हणजे हार न मानता आपल्या ध्येयाच्या मागे जाणे, ज्यासाठी ड्राइव्ह, फोकस आणि मजबूत कार्य नैतिकता आवश्यक आहे. 

Habits of Successful People in Marathi

सवय ५ . स्वतःला सतत प्रेरणा देत राहा . || Self-Motivation 

दुसरे देवो अगर न देवो पण स्वतः स्वतःला नेहमी प्रेरणा द्या . जेव्हा तुम्हांला तुमचं काम तुम्हांला हव्या त्या दिशेत जात नसेल

किंवा तुम्हांला  कधी खूप उदास वाटत असेल त्याचवेळी स्वतःच स्वतःला प्रेरणा देण्याची गरज आहे .

तुमच्या मेंदूला चांगल्या गोष्टींची सवय लावा . जसं आपल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी अन्नाची गरज असते

तसंच आपल्या मेंदूला चांगल्या विचारांची सवय लावणंदेखील गरजेचं आहे . एवढंच लक्षात ठेवायचं कि

तुम्ही इथे जिंकायला आला आहात , त्यासाठी बाकीच्या गोष्टी तुमच्यावर परिणाम करतीलच पण त्याकडे

फार लक्ष देऊ नये . जीवनात विलक्षण यश मिळवणारे लोक अत्यंत स्वयंप्रेरित असतात. ते उत्कट जीवन जगतात,

ते आपल्या ध्येयावर अथक परिश्रम करतात आणि काहीही झाले तरी ते नेहमीच पुढे जात असतात.

सवय ६ : लवकर निर्णय घेणे आणि हळूहळू अंमलात आणणे .

Quick to make decisions and Slow to Change Them.

जलद निर्णय घेणारे असणे अनेक फायदे आणि फायद्यांसह येते.  जलद निर्णय घेणारे असण्यामुळे स्वत: सह

आणि इतरांसह सतत गती मिळू शकते. झटपट घेतलेल्या निर्णयांमुळे आत्मविश्वासही दिसून येतो. 

जे आपले विचार बदलतात ते पटकन स्वत:ला गाठींमध्ये बांधलेले आढळतील. कल्पना बदलणे,

जुन्या पद्धतींकडे परत जाणे, योजनांमध्ये बदल करणे हे सर्व स्वत: साठी आणि आपल्या संघासाठी

गोंधळ वाढविण्याचे जलद मार्ग आहेत. आधीच कृतीत असलेले निर्णय बदलल्याने वेळ, मानवी भांडवल

आणि पैसा यासारख्या संसाधनांना त्वरीत खाऊ शकते. त्यामुळे तुमची निर्णय घेण्याची क्षमता कि चांगली असावी .

एकाच गोष्टीवर विचार करण्यात फार वेळ घालवू नये . 

सवय ७ . तुमचे छंद जोपासा. || Cultivate your hobbies. 

तुमच्या आवडीचं काम म्हणजेच तुमच्या hobbies जोपासा . खरंतर तुमचे छंद मग ते लिखाण असो ,

गाणी ऐकणं किंवा म्हणणं असो किंवा एखादा खेळ खेळणं असो त्यासाठी वेळ द्या म्हणजे दिवसभरातील

तणाव दूर करण्यास मदत होईल . आणि जेव्हा आपण आपल्या आवडीचं काम करतो तेव्हा तुम्ही फ्रेश होता

आणि पुढे मनासारख काम करण्यास उत्साह येतो आणि आत्मविश्वास देखील वाढतो . 

These are some Habits of Successful People in Marathi.

 अशाच अनेक टिप्स आणि माहितीसाठी आमच्या मराठी Blogwali website ला नक्की भेट राहा .

आणि तुमच्या मित्रमंडळींना देखील हा लेख share करा . धन्यवाद !  

Also Read: 9 habits of highly successful people (cnbc.com)

Also Read: सकाळी लवकर उठण्याचे फायदे | Sakali lavkar uthnyache phayde – मराठी BlogWali (marathiblogwali.in)

Habits Of All Successful People!

This Post Has One Comment

Leave a Reply