Ganpati Bappa Morya!!
कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात हि गणपती बापाच्या आशीर्वादाने व्हावी , हा एकमेव उद्देश
आणि हेतू हा लेख प्रथम पोस्ट करण्यामागे ….भक्ती !!
Devotional article Bhakti
भक्ती म्हटलं कि माझ्या डोळ्यासमोर येतो तो माझा लाडका गणपती बाप्पा !
अर्थात प्रत्येकाची भक्ती ची व्याख्या वेग-वेगळी आहे . देव ,ईश्वर ,अल्लाह , प्रार्थना ,नमाज ,
इत्यादी नावं आणि पद्धती ! देव मानणं न मानणं किंवा श्रद्धा असणं न असणं हे प्रत्येक
व्यक्तीच्या विचारांवर आणि मानण्यावर आहे . माझं म्हणाल तर देवावर श्रद्धा आणि भक्ती माझी आहे
आणि जसं मी आधी म्हटलं तसं भक्ती म्हटलं कि माझ्या डोळ्यासमोर येतो तो लाडका जिवाभावाचा “बाप्पा ” !
त्याचं मनमोहक आणि साजिरं रूप डोळ्यात साठवून ठेवू तितकं कमीच आहे.
प्रत्येक शुभकार्याच्या सुरुवातीस आधी गणरायाला वंदन करूनच मग पुढे काम करण्यास सुरुवात होते .
६४ कलेचा अधिपती ,बुद्धीची देवता , संकट -विघ्न दूर करणारा विघ्नहर्ता अशी त्याची ओळख !
अर्थात प्रत्येकाचा देव वेगळा आणि त्याला पुजण्याच्या पद्धती देखील तितक्याच वेगळ्या आहेत .
आपण बऱ्याचदा ऐकलंय कि देव तुम्ही माणसात शोधा ,दगडाच्या निर्जीव मूर्तीत देवाला पाहणं किती योग्य आहे .
आणि ते काही चुकीचं नाहीये ,कारण ह्या लॉकडाउनच्या काळात देव देव्हाऱ्यात नसून तो
रस्त्यावर पोलीस कर्मचारी ,सफाई कामगार , हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स,नर्स ,वॉर्डबॉय च्या रूपात ,
तर एकमेकांना सहकार्य करणाऱ्या माणसांमध्येच देव आहे आणि तो दिसलाय असं आपण म्हणूच शकतो .
पण जरी मूर्ती दगडाची असली तरी त्याचं रूप ,सौंदर्य हे वेग-वेगळं आहे .
आणि श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी . कारण देवाच्या नावाखाली अनेक भोंदूगिरी आणि
अनेक प्रथा खपवल्या जातात हे अपल्याला माहीतच आहे . पण ह्या सगळ्यावर कितपत विश्वास
आणि श्रद्धा ठेवावी हे मात्र आपल्याच हातात आहे .
संत तुकाराम महाराज एका अभंगात असं म्हणतात की , “ग्रंथ” समजल्याशिवाय
“संत” समजणार नाही आणि “संत” समजल्याशिवाय “भगवंत ” समजणार नाही . त्यामुळे ग्रंथ
किंवा असं धार्मिक काहीतरी वाचायला हवं जेणेकरून आपल्याला भगवंत समजायला सोपं होईल .
आपल्या महाराष्ट्राला संतभूमीचा लाभलेला वारसा फार मोठा आणि अवर्णनीय आहे .
संत म्हणजे निस्वार्थ मनाने कोणतीही अपेक्षा न ठेवता देवासाठी केलेली प्रार्थना ,तसेच
आपला उद्देश स्पष्ट ठेवून समाजाची मदत करणारी एक जबाबदार व्यक्ती ! आणि
संतांचं भक्तीस्थान म्हणजे पंढरीचा पांडुरंग हरी आणि विठ्ठलभक्ती हेच जीवनाचं सार .
आपल्या महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले . संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम , संत जनाबाई,संत बहिणाबाई
,संत मुक्ताई संत गोरा कुंभार ,संत सावतामाळी ,संत चोखामेळा , नामदेव महाराज,आधुनिक
संत रामदास स्वामी ,तुकडोजी महाराज ,गाडगे महाराज , गगनगिरी महाराज ,गजानन महाराज इत्यादी
तसेच सध्याचे वामनराव पै ,दयानंद सरस्वती असे अनेक संतांनी समाजात असलेल्या अनेक अनिष्ठ प्रथा ,
तसेच जातीभेद ,वर्णभेद ,अस्पृश्यता याला कडाडून विरोध केला व समाजप्रबोधनाचे कार्य केले .
म्हणजे काय तर भक्ती करण्याचा मार्ग प्रत्येकाचा जरी वेग-वेगळा असला तरी ,यातून मिळते
ती मानसिक शांतता आणि समाधान .
भक्ती हि मग आपल्या देशावर असणारी सुद्धा असते . ज्याला आपण “देशभक्ती” म्हणतो .
पण नुसतीच बोलून न दाखवता वेळप्रसंगी देशासाठी योगदान देणं ,ती खरी भक्ती ठरेल असं मला वाटत .
जेव्हा आपण मनापासून एखाद्या शक्तीची पूजा करतो तेव्हा त्या शक्तीचा थोडा तरी अंश आपल्यात समाविष्ट होत असतो.
स्त्री चं महत्त्व अनन्यसाधारणाचं ! मग ते देवी – देवतांच्या काळातील असो किंवा आता !
शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया,किंवा जगदंबा म्हणून गौरविले होते .
ह्या शक्तीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे आपणांस ज्ञात आहेतच, त्यात उमा, गौरी, जगदंब,पार्वती,
ही देवीच्या सौम्य रूपांची नावे असून चंडी, भैरवी, दुर्गा, काली, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत .
आपण नवरात्रीत नऊ शक्तींची पूजा करतो .
प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चंद्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।
पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीतिच ।
सप्तमं कालरात्रिश्च, महागौरीतिचाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदां प्रोक्ता, नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।
उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।
Devotional article Bhakti
भक्ती हि वेग -वेगळ्या पद्धतीने अगदी मनापासून केली तर नक्कीच मनास समाधान मिळेल .
भक्ती हा विषय मुद्दामुन ह्यासाठी निवडावा वाटला कारण बऱ्याचदा भक्तीच्या नावाखाली
लोकं खूप अंधश्रद्धा मनात ठेवतात ,आणि काही चुकीचे गैरसमज असतात अर्थात प्रत्येकाचे विचार
वेगळे असल्याने आपण ते काही बदलू शकत नाही पण जो कोणी हा लेख वाचेल त्याला मानसिक
समाधान नक्कीच मिळेल .
आणि भक्ती म्हणजे काय हेदेखील कळायला सोप्प पडेल .
गणपती बाप्पा मोरया 🙏 मंगलमूर्ती मोरया 🌼
Also Read: Mangalagaur Song Full Lyrics Baipan Bhari Deva – मराठी BlogWali (marathiblogwali.in)
Pingback: नवे शैक्षणिक धोरण २०२३ - मराठी BlogWali
Pingback: जगण्याचा अर्थ | Meaning of Life | Life Quote - मराठी BlogWali
Pingback: महाशिवरात्री विशेष | Maha Shivaratri 2024 ॐ नमः शिवाय 🙏 - मराठी BlogWali