बोर्डाच्या पेपरचा अभ्यास लक्षात ठेवण्याच्या Techniques। How to Remember Everything You Study for Board Exam
तुमच्या नोट्स तयार असतील , तुम्ही पेपरसाठी आधीच
अभ्यास करायला घेतला असेल नाही का ? पण हे परीक्षेला १०-१२ दिवस
बाकी असतील तेव्हा पण नेमकं उद्याच पेपर आहे आणि तरीही तुमचा हवा
तास अभ्यास झाला नसेल तर तुम्ही काय कराल ? घाबरून जाऊ नका
आम्ही तुमच्यासाठी अशा काही टिप्स घेऊन आलो आहोत ज्या तुम्हांला
पेपरच्या १ दिवस आधी अभ्यास करून तुम्ही चांगले मार्क्स कसे मिळवू
शकता याबद्दल सांगू, चला तर फार वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात .
जर ह्या टिप्स तुम्हांला खरंच उपयोगी पडल्या तर आम्हाला कमेंट्स द्वारे नक्की कळवा .
बोर्डाच्या पेपरचा अभ्यास लक्षात ठेवण्याच्या Techniques । How to Remember Everything You Study for Board Exam
टीप नंबर १ : Method of LOCI:
हि एक विचारशक्ती वाढवण्याची strategy आहे ,
जी दिलेल्या माहितीची आठवण वाढवण्यासाठी आणि दृश्यस्वरूपात
ते लक्षात ठेवण्यासाठी वापरली जाते . आता आपण ह्या पद्धतीचा
आपल्या अभ्यासात कधी आणि कसा वापर करू शकतो ते पाहुयात .
जेव्हा तुम्हाला वस्तूंची यादी म्हणजेच list of items बनवायचं असेल
किंवा क्रमाने कोणते पॉईंट्स लक्षात ठेवायचे असतील तेव्हा हि
पद्धत वापरली जाते .
ह्या पद्धतीचा वापर करताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अशा
एका जागेचा विचार करायचा आहे ज्याच्याशी तुम्ही पूर्णपणे familiar आहात .
उदाहरण समजा जस कि तुमचं घर :
त्यात सर्वप्रथम घरात एन्ट्री आहे ,
मग लिविंग रूम , मग थोडं पुढे किचन , उजव्या बाजूला एक बेडरूम ,
डाव्या हाताला लहान मुलांची रूम .
आता मी तुम्हांला ५ गोष्टीची नावं सांगतेय ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत ,
टोमॅटो , ब्रेड , अँपल , पेन ,सॉफ्ट टॉय
आता तुम्हांला imagine करायचं आहे , कि जसे तुम्ही घरात येत
तसं तुमच्यावर टोमॅटोची बरसात होते , फक्त टोमॅटो हा शब्द
लक्षात न ठेवता ती situation imagine करायची आहे .
आता पुढे तुम्ही लिविंग रूमकड़े जाण्यासाठी निघत तेव्हा
समजा तुमच्यासमोर ब्रेड ची एक भिंत आहे , तिला पार
करून तुम्हाला पुढे जायचा आहे . तसंच थोडं पुढे किचनकडे
गेलात तर आई तिथे अँपल जुस बनवतेय ,पण तिथूनच पुढे
उजव्या बाजूलाबेडरूम मध्ये गेल्यावर बाबा काहीतरी त्यांचं
ऑफिसच काम पेनाने करतायेत . तिथूनडाव्या हाताला गेलात
तर त्या रूम मध्ये लहान मुलगी एका सॉफ्ट टॉय ने खेळतेय .
अशाप्रकारे तुम्हाला एक तुमचीच गोष्ट तयार करायची आहे .
म्हणजेच किचेन , बेडरूम , लिविंगरूम हे सगळं clue सारखे
काम करतील आणि तुम्हाला वस्तू लक्षात ठेवायला मदत होईल .
आणि लिस्ट जर जास्त मोठी असेल तर तुम्ही घराऐवजी एक
असा रस्ता निवड जो तुम्हाला पूर्णपणे परिचित असेल . मोठी
मोठी नेते मंडळी बुलेट पॉईंट्स लक्षात ठेवण्यासाठी ह्या पद्धतीचा
वापर करतात तुम्हीसुद्धा करून बघा .
टीप नंबर २: Mind Mapping
Mind Mapping हि अशी Technique आहे , जी शेवटच्या क्षणी
तुम्ही केलेला अभ्यास लक्षात ठेवण्यास उपयुक्त ठरते . Mind Map
म्हणजेच जिथे तुम्ही आधी केलेला अभ्यास तुम्हला जितकं समजलंय
त्यानुसार लिहिता किंवा एखाद्या चित्राच्या रूपात ते draw करता .
आणि मला माहित आहे हे काही शेवटचे क्षण आहेत ज्यात तुम्ही जास्त टेन्स होता
आणि जास्त टेन्शन असलं कि विसरायला हे होतच म्हणून ते टाळण्यासाठी
तुम्हाला तुमच्या मनाला रिफ्रेश करण्यासाठी थोडं माईंड मॅप चा उपयोग होतो .
टीप नं २ : तुमची उत्तरं स्पष्ट करा . ।। Explain Your Answers .
तुम्ही नुसतं वाचण्यात आणि तुम्ही वाचलेलं कोणाला तरी explain
करण्यात फरक आहे . वाचून तुम्ही समजा तुमच्या मित्राला ते उत्तर
explain करत असाल तर ते उत्तर तुमच्या आणि समोरच्या व्यक्तीच्या
सुद्धा लक्षात राहतं . म्हणून तुम्ही वाचलेली उत्तरं explain करा .
टीप ३ : नोट्स Review करा . || Review your Notes
तुम्ही आधी केलेल्या नोट्स असतील तर त्या review करा
आणि वाचा पण त्याही नसतील तर ऐन वेळी तुम्ही शॉर्ट नोट्स
तयार करू शकता त्यासाठी chapter मधले keypoints आणि
महत्त्वाचे शब्द अधोरेखित करून ते लिहून काढावे म्हणजे
वाचताना ते जास्त सोपं पडेल .
बोर्डाच्या पेपरचा अभ्यास लक्षात ठेवण्याच्या Techniques। How to Remember Everything You Study for Board Exam
टीप नंबर ३: Chunking Method:
जेव्हा तुम्हाला खूप माहिती लक्षात ठेवायची असेल ,
तेव्हा ह्या पद्धतीचा वापर केला जातो. माणसाची शॉर्ट टर्म मेमरी
एकावेळी ३ ते ४ पॉईंट्स लक्षात ठेऊ शकते . आता समजा
मी तुम्हांला 9 वेगवेगळी नावं सांगेन ती तुम्हांला लक्षात ठेवायची आहेत,
मोगरा, आंबा, टोमॅटो, पालक, अँपल, गुलाब, कमळ, वांगी, केळी
आता इतकी नावं लक्षात ठेवणं थोडं कठीण आहे पण आपण ह्या
सगळ्यांना त्यांच्या नावा आणि गुणधर्मनुसार वेगळं करूयात
म्हणजेच chunks तयार करूयात.
सगळ्यात पहिली फुलं मोगरा ,गुलाब आणि कमळ
हे लक्षात ठेवायचं हा झाला पहिला chunk
नंतर केळी , आंबा आणि अँपल हा दुसरा chunk
मग दोन्ही chunks ना एकत्र लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा ,
त्यानंतर तिसरा chunk म्हणजेच टोमॅटो , पालक, आणि वांगी
हे लक्षात ठेवून आता पुन्हा तिन्ही chunks एकत्र बोलून पाहावेत .
अशाप्रकारे एक एक chunks लक्षात ठेवून शेवटी ते जोडून
सगळं एकत्र लक्षात ठेवलं कि ते सोपं पडत . हि पद्धत मोबाईल
नंबर पाठ करण्यासाठीदेखील वापरली जाते .
समजा ९९३७८१४२३७ हा नंबर आहे त्याला आपण
९९३ – हा पहिला chunk
७८१ – हा दुसरा chunk
४२३७ – हा तिसरा chunk
अशा ३ chunks मध्ये divide करून बरीच लोकं
मोबाईल नंबर पाठ करतात .
असं नाही कि नेहमी ३ chunks असले पाहिजेत जशी माहिती
आणि लिस्ट आहे त्याप्रमाणे आणि आपल्या सोईनुसार chunks
कमी जास्त करून आपण आपली उत्तरही chunks मध्ये लक्षात ठेवू शकतो .
टीप नंबर ४ : Mnemonic Techniques :
Mnemonic ह्या पध्द्तीने तुम्ही एका क्रमाने लिस्ट
लक्षात ठेवू शकता . लहानपणी आपल्याला इंद्रधुनष्याचे रंग
लक्षात ठेवायला आपण जी पद्धत वापरायचो ती म्हणजेच Mnemonic Technique .
” जातानाही पानी पी ”
म्हणजे जांभळा , तांबडा , नारंगी , हिरवा , पारवा ,निळा ,पिवळा
म्हणजेच कोणत्याही लिस्ट मधल्या सगळ्या नावांची पहिली
अक्षर घेऊन एक नवीन नाव तयार करावं ते लक्षात ठेवणं जास्त सोपं होत .
केमिस्ट्री मधल्या पेरियॉडिक टेबल मधले पहिले ८ chemical
नाव आपण अशाप्रकारे लक्षात ठेवू शकतो .
हा हि ली बे बो का ना ऑ (Ha , He , Li, Be,B,C,N,O)
हायड्रोजन , हेलियम , लिथियम , बेरियम
, बोरॉन , कार्बनडायॉकसाइड , नायट्रोजन , ऑक्सिजन
ह्या पद्धतीने केल्यावरसुद्धा तुम्हाला तुमची उत्तरं लक्षात ठेवणं सोपं जाईल .
बोर्डाच्या पेपरचा अभ्यास लक्षात ठेवण्याच्या Techniques। How to Remember Everything You Study for Board Exam
टीप नंबर ५: आराम करा आणि सकारात्मक रहा ||
Relax and Stay Positive .
सतत अभ्यास करून तुम्ही थकता आणि हे साहजिकच आहे
पण त्यातही स्वतःसाठी वेळ देऊन थोडं आराम करा .
आणि सतत positive विचार करत राहा . म्हणजेच मला हे येतंय
आणि मी हे करणारच त्यामुळे मनाला शांत वाटत आणि म्हणतात ना
आपण जे चिंतितो तेच होत म्हणून सतत positive राहा .
ह्या सगळ्या टिप्स पेपरच्या १ दिवस आधी वापरल्यात तर
नक्कीच तुम्हांला पेपर चांगला जाईल आणि मार्क्स देखील चांगले मिळतील.
जर तुम्ही पण ह्यांपैकी कोणत्याही पद्धतीचा वापर केला तर तुम्हाला
याचा नक्की फायदा होईल . आणि ऐन परीक्षेच्या वेळी जे उत्तर
लिहताना विसरायला होत ते होणार नाही .
धन्यवाद !!
बोर्डाच्या पेपरचा अभ्यास लक्षात ठेवण्याच्या Techniques।How to Remember Everything You Study for Board Exam
Also Read: 15 Memory Techniques For Studying to Memorize Fast (oswalpublishers.com)
Also Read: बोर्डाचा पेपर कसा लिहावा ?। How to Write in Board Exams? – मराठी BlogWali (marathiblogwali.in)
Pingback: अभ्यास करताना ह्या चुका टाळा | Avoid Bad Study Habits | Mistakes to Avoid While Studying #studytips. - मराठी BlogWali