|Marathi Motivational Quotes
ओळख | Olakh | Introduction
जन्माला येणारा प्रत्येक लहान जीव त्याची ओळख घेऊन येतो .
पण पुढे ह्या समाजात वावरताना
त्याला त्याची वेगळी ओळख निर्माण करावीच लागते .
आता ओळख म्हणजे नक्की काय ?
जी नावाने किंवा नावाची असते तीच ओळख का फक्त ?
नाही मी तर म्हणते , नावाची ओळख फार काही कामाची नाही .
माणसाची ओळख व्हावी त्याच्या कामाने ,त्याच्या स्वभावाने ,इतरांशी
असणाऱ्या त्याच्या वागण्यामुळे !
so, ह्याने होत फक्त एवढंच कि आपण समोरच्या मनात स्थान मिळवू शकतो ,
ना कि त्या व्यक्तीच्या डोक्यात ..
पण समोरच्या व्यक्तीच्या मनात स्थान आपण मिळवू शकू नंतर ,पण स्वतःच्या
नजरेत स्वतःची ओळख मात्र कायम वरच्याच पातळीवर असली पाहिजे तेव्हाच
आपण इतरांना आपल्यात सामावून घेऊ शकतो .
परंतु जेव्हा माणूस स्वतःच्याच नजरेत पडतो किंवा स्वताच्याच ओळखीची जर त्याला
लाज वाटत असेल तेव्हा मात्र आयुष्य जगणं खूप कठीण होऊन जाईल . त्यामुळे
स्वतःच्या नजरेतील स्वतःची ओळख कायम महत्वाची !
therefore,
बाहेरील जगात वावरताना आपल्याला अनेक माणसं दिसतात , पण प्रत्येक
डोळ्यांना दिसणाऱ्या व्यक्तीची आपली ओळख असतेच असं नाही .
दिसणं आणि भेटणं वेगवेगळं आहे .
so, त्यामुळे आपल्याला भेटलेल्या व्यक्तीची ओळख मात्र आपल्याला असते पण ती ओळख काही
मिनिटांची, काही तासांची , काही महिन्यांची किंवा काही वर्षांची का असेना
पण ती ओळख मात्र असते .
ओळख व्हायला फार वेळ लागत नाही . आयुष्यात अनेक माणसं येतात आणि जातातही
पण काहीच माणसं मनात वेगळं घर करून राहतात . प्रत्येक नव्याने प्रथम भेटणारी
व्यक्ती आपल्यासाठी अनोळखीच असते ,पुढे मग बोलून ,भेटून ओळख वाढते आणि
मग संवाद होतो आणि बऱ्याच महिन्यांच्या किंवा वर्षांच्या ओळखीने आपण समोरच्या
व्यक्तीचे गुण ,दोष त्याची क्षमता सगळंच ओळखायला लागतो .
so,
ओळख आणि ओळखणं ह्या उपमा म्हणा किंवा शब्द
वेगवेगळे आहेत .
जसं आधी मी उल्लेख केला कि ओळख म्हणजे नावाचीच नव्हे तर आपल्या
कामाची किंवा स्वभावाची पण ,
ओळखणं हे समोरील व्यक्तीच्या वागण्यावर आपलं मत असू शकत . किंवा जवळची
अथवा ज्ञात असलेली व्यक्ती जेव्हा आपल्या अपेक्षेबाहेर वागते तेव्हा आपण त्या
व्यक्तीला किती ओळखलंय हे कळत आणि मग “ओळख आणि ओळखणं ” यातला फरक समजतो .
व. पु काळेंच एक वाक्य आहे यावर ,
हातभर अंतरावर असलेली आणि जवळची वाटणारी व्यक्ती सुद्धा आपल्यापासून
कितीतरी मैलो दूर आहे याची तेव्हा जाणीव होते . तेव्हा ओळखणं ह्या शब्दाचा अर्थ कळतो .
शेवटी एकच , नावाची ,स्वभावाची ओळख छोटी असली तरी चालेल पण ती स्वतःचीच असावी .
Marathi Motivational Quotes | Marathi Inspiration
सुख -दुःख | Sukh-Dukh | Happiness – Sorrow
Basically, सुख-दुःख ह्या मानवी जीवनात नाण्याच्या दोन बाजूप्रमाणे आहे . एक जर छापा(Head)
आहे तर एक काटा(Tail) . एकवीना दुसरा अपूर्णच ,तसंच काहीसं मानवी जीवनातील
सुख-दुःखाचं . सुखामागून दुःख आणि दुःख सारून पुन्हा सुख हे येणारच आहे .
आता प्रश्न हा पडतो कि , सुख-दुःख ह्या संकल्पना नक्की आहेत तरी काय ?
का माणूस नेहमी सुखाच्या मागे सतत धावत असतो ?
“मला सांगा सूख म्हणजे नक्की काय असतं ?
काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं !”
ह्या गाण्याच्या ओळी आपण नेहमीच ऐकतो ,
पण पाप-पुण्याचा हिशोब करून जर सुख
अनुभवता आलं तर मग सगळेच प्रश्न सुटतील .
मुळात सुख आणि दुःख ह्यांना स्वतःच असं अस्तित्त्व नाही .
Basically,
सुख-दुःख ह्या माणसाच्या अनुभूतीचे आणि मानसिक स्थितीचे परिणाम आहेत .
काहींसाठी जी परिस्थिती दुःखाची असते ,तीच परिस्थिती काहींसाठी आनंदाची
आणि सुख घेऊन आलेली असते . so, बऱ्याचदा अनुकूल परिस्थितीत सुख आणि
प्रतिकूल किंवा वाईट परिस्थतीत दुःख आहे हे मानण्याचा माणसाचा स्वभाव झालाय.
वि .स .खांडेकर यांनी त्यांच्या ययाती ह्या कादंबरीत सुख-दुःखाचं वर्णन अगदी सहज
सोप्या शब्दात केलंय, “मानवी मनाची आणि जीवनाची गुंफण मोठी विलक्षण आहे .
त्यामुळं “सुख “हा अनेकदा मृगजळाचा शोध ठरतो . सुख हि दुःखाची छाया आहे कि,
दुःख हि सुखाची सावली आहे ,हे कोडं अजूनही माणसाला उलगडलेलं नाही . “!
मृगजळ म्हणजे आभास किंवा अदृश्य अशी एखादी गोष्ट ,जी आहे असं फक्त वाटणं .
सुख जवळ आहे म्हणता-म्हणता कधी दुःखाची सावली त्यावर येऊन पडेल हे सांगू शकत नाही .
आपले दुःख जितके अधिक खोल जाईल तितकेच आनंदी होण्याची शक्यता जास्त आहे.
हे दोन्ही एकमेकांवर समान प्रमाणात अवलंबून आहेत . दुःख आहे म्हणूनच सुखाची किंमत
आपण करू शकतो आणि सुख अनुभवतोय म्हणूनच दुःखला देखील सामोरं जाण्याचं सामर्थ्य
माणसात येऊ शकत . फक्त सुखाचाच शोध घेता-घेता त्याच्या मागे पडलो तर हाती काहीच
लागणार नाही येत ती फक्त निराशा . वेळेनुसार सुख-दुःख एकामागोमाग येतीलच .
आपण कोणत्या वेळी कसा संयम दाखवतो हे महत्त्वाचं आहे . जीवनाचा आणि ते
जगण्याचा आनंद सुख-दुःख दोन्हीत आहे .
Marathi Motivational Quotes | Marathi Inspiration
अपेक्षा | Apeksha | Expectation
अपेक्षा हि आपल्याला नेहमी दुसऱ्या व्यक्तीकडूनच असते . खरंतर ती जास्त
आपल्या आवडत्या ,जवळच्या, प्रियजनांकडून च असते .
अपेक्षा असते समोरच्याने
आपल्या मनासारखं वागण्याची ,
अपेक्षा असते काही घेण्याची ,
अपेक्षा असते समोरील व्यक्तीने
आपल्याला विचारण्याची ,
अपेक्षा असते अशा एक ना अनेक गोष्टींची !
इतरांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपण स्वतःकडूनच प्रथमतः अपेक्षा
ठेवल्या तर अनेक गोष्टी किती सहज आणि सोप्या होतील .
उगवणारा प्रत्येक नवीन दिवस हा मनात नवीन अपेक्षा घेऊन येतो ,पण दिवसभरात
ती अपेक्षा पूर्ण झाली तर खरी, नाहीतर दिवसा अंती माणूस एक अनुभव घेऊनच बाहेर पडतो .
अपेक्षांचं ओझं माथी बाळगण्यापेक्षा बेधुंद ,निश्चित होऊन जगण्यात मजा आहे .
बऱ्याचदा नको असलेल्या अपेक्षा वाढल्या ,कि हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते .
कारण आधी मी जसा उल्लेख केला ,तश्या अपेक्षा ह्या आवडीच्या व्यक्तींकडून करतो
आपण आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत तर मग हताश होऊन जातो .
म्हणून अपेक्षा स्वतःकडून च ठेवा आणि त्या स्वतःच पूर्ण करायच्या मागे लागा ,
आयुष्य खूप सुंदर होईल .
Marathi Motivational Quotes | Marathi Inspiration
Marathi Motivational Quotes
आठवणी | Aathvani | Memories
Basically,
आठवणी नक्की आहेत काय ? मागे सरून गेलेल्या चांगल्या -वाईट काळाचा साठा !
जो मनाच्या खोल कोंदणात रुजून असतो . आणि मग अचानक अशी एक वेळ येते ,
आणि ह्या सगळ्या आठवणींचा घोळका मनात रेंगाळायला लागतो .कधी ,कुठे,कोणाची,
कशासाठीहि आठवण येईल सांगता येत नाही . चांगल्या असो अथवा वाईट मग माणूस
जाणते-अजाणतेपणे त्यात रमून जातो .
आयुष्याचा ह्या वळणावर अनेक लोकं आपल्याला भेटत असतात ,सगळ्यांनाच आपण
ओळखतो असे नाही पण त्यातही ज्या लोकांशी गट्टी होती ,मग आपण त्या
नात्याला सुंदर असं नाव देतो
“मैत्री ” ! ओळख होते ,मैत्री वाढते ,त्यांच्यासोबतच अनेक क्षण आपण जगतो पण
हेच मित्र-मैत्रिणी कधी-कधी आयुष्यभर पुरतीलच असं नाही .
जसं म्हणतात नातेवाईक किंवा तुमचं कुटुंब निरंतर तुमच्या सोबत असेल बाकी कोणी
असो नसो आई-वडील नक्कीच आयुष्यभर आपल्या मागे खंबीर उभे असतात .
पण ज्यांच्याशी मैत्री जुळलीये ते मित्र सोयरे मध्येच साथ सोडतात ,आणि मग
त्त्यांच्यासोबत घालवलेल्या मजेशीर क्षणांची आणि वाईट गोष्टींच्या उराशी बाळगून राहतात त्या फक्त आठवणी !
काही वेळेस ह्याच आठवणींमुळे त्रासदेखील होतो ,पण समजून उमजून आठवणी
कधी विसरता येत नाही . आपण हास्याने घालवलेले ते आवडत्या व्यक्तीसोबतचे
क्षण आठवणीने जेव्हा पुन्हा ताजे होतात तेव्हा डोळ्यात अश्रू येतात आणि वाईट
किंवा दुःखाच्या प्रसंगात जे अश्रू गाळलेले ते आठवले कि मात्र पुन्हा चेहऱ्यावर
नकळत स्मितहास्य येत .म्हणजे काय विचार करायचो आपण तेव्हा हे आठवूनच मन हसत .
आठवणी असतात कुटुंबासोबत घालवलेल्या वेळेची ,
आठवण असते जीवनाच्या साथीदारासोबतच्या गोड क्षणांची ,
आठवण असते कॉलेज कट्ट्यावरच्या मित्र-मैत्रिणींच्या
मनमोकळ्या गप्पांची ,
आठवण असते लोकल मध्ये भेटलेल्या
नवीन व्यक्तीची ,
आठवण आहे सुख-दुःखाची साठवण !!
Hence,
“आठवणी आठवाव्या लागत नाही ,आपोआपच त्या आठवत असतात
पालटुन गेलेल्या सुंदर जीवनाचे ,सुंदर क्षण भेटीस पाठवत असतात. “!!
finally
आठवण स्पर्श जरी देत नसली तरी ती भास देते .
होऊन गेलेल्या अनेक क्षणांची चाहूल मनाला देऊन जाते .
मराठी प्रेरणादायी Quotes । Marathi Motivational Quotes – मराठी BlogWali (marathiblogwali.in)
another
finally
Pingback: Marathi Motivational Quotes | Marathi Inspiration - मराठी BlogWali